ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय.

Submitted by vijaykulkarni on 20 March, 2015 - 15:39

गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. विशेषतः पुण्या मुंबईबाहेर आणी आय टी व्यतिरिक्त इतर क्षेत्रात नोकरी करणार्‍या मुलांच्याबाबतीत तर जास्तच. शेती किंवा भिक्षुकी करणार्‍या मुलांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. नुकत्याच झालेल्या एका विवाह मेळाव्यात सत्तर मुले आणी तीन मुली आल्या होत्या.

या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.

१ ब्राह्मण मुलांनी स्वजातीयच मुलगी हवी हा आग्रह सुरुवातीलाच सोडून देणे. काही वर्षे ब्राह्मण मुलगी शोधण्यात गेल्यावर धोबी का कुत्ता अशी गत झालेली अनेक मुले पहाण्यात आहेत.

२ मुस्लिम समाजाप्रमाणे मेहेर ची प्रथा सुरु करणे.

इतर दूरगामी उपायांचे व सूचनांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्राह्मणेतर शेती व्यवसाय करणार्‍यांना असा प्रॉब्लेम येतो का? थोडक्यात, हा व्यवसाय निगडीत प्रश्न आहे की एका विशिष्ट समुदायाचा प्रश्न आहे?

भिक्षुकी बद्द्ल पूर्णवेळ व्यवसाय म्हणून अजिबात माहिती नाही. त्याबद्द्ल थोडे लिहाल (समस्या समजायला) तर बरे पडेल. घरी जेव्हा कधी काही पूजा इ झाल्या त्या स्त्री-पुरोहितांनी सांगितल्या. असा व्यवसाय आज ही पुरूष पूर्णवेळ (नो अदर डे जॉब) म्हणून करतात का आणि त्यात कुटूंबाचे पोट भरते काय?

प्रत्येकाच्या विहिरी ... स्वजातीयच, मुलगीच, लग्नच.. आपली विहीर आणि पोहोरा कुठे टाकायचा ते ठरवायचं. आपल्याहून मोठं अंथरूण दिसतंच आणि आपण तोकडेच पडतो, ते मान्य करून ठिगळ जोडायची तयारी मात्र ठेवायची. ठिगळच ती, मूळ धाग्यात बेमालूम मिसळेपर्यंत कधीमधी अस्तित्त्व दाखवणारच. हे होई पर्यंत नवीन ठिगळ तयार. तलम गोधडीला कसली आल्येय उब! म्हणून त्याचही गुणगान गायचं. Happy

असा व्यवसाय आज ही पुरूष पूर्णवेळ (नो अदर डे जॉब) म्हणून करतात का आणि त्यात कुटूंबाचे पोट भरते काय?
>>>
हो करतात.
कुटुंबाचे पोट भरते.

मोठ्या शहरात भिकुक्षी करून कुटुंब चालु शकतं.
हल्ली लोक जास्त धार्मिक झाले आहेत.

त्रयंबकेश्वर येथे पिढीजात भिक्षुकी करणाऱ्या लोकांकडून सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकते एव्हढी त्यांची भिक्षुकी चालते!

ब्राह्मणेतर शेती व्यवसाय करणार्‍यांना असा प्रॉब्लेम येतो का?

हो. काही वर्षांपूर्वी सकाळ मधे शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या मुलाखती घेऊन लिहीलेला एक लेख आला होता. सोबत काही मुलींचं म्हणणंही चौकटीत दिलं होतं. शेतकरी नवरा नको असं सर्वांचं म्हणणं होतं.

http://www.esakal.com/esakal/20091129/4804048535679242676.htm

http://news1.marathisrushti.com/articles/?article=1134003

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-north-maharas...

http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-farmer-husband-2788401.html

http://abpmajha.abplive.in/author/navnath_sakunde/2014/09/15/article3999...

खरं आहे.
जोडीदार का मिळत नाहीत असा व्यापक प्रश्न योग्य वाटेल.
फक्त याच समुदायात अशा विहीरी(श्रेय) नाहीत. यांचे प्रश्न पांढऱ्यावर काळे लवकर होतात आणि चर्चेत येतात. हीच गोष्ट जगात इतरत्रही आहे. शेती करणाऱ्यांना आणि मुख्यशहराबाहेरच राहणाऱ्यांना जोडीदार (फक्त मुली नव्हे) मिळत नाहीत. काही व्यवसाय आणि नोकरी(आर्मी वगैरे)करणाऱ्या मुलांनाही मुली मिळत नाही.पालघर ते अलिबाग पर्यँत पसरलेल्या आगरी समाजातही जरा बऱ्या न दिसणाऱ्या मुलींची लग्ने होत नाहीत.

बामण असुन बामणच मुलगी केली तर (च) संसार सुखाचा होतो का ?

बिन्धास्त धर्म बदलुन लग्न करावे.

....पस्तावलेला जागो बामण प्यारे उर्फ जाबोप्या

असा धागा पूर्वी येऊन गेला आहे.
कृपया त्यावरिल विचार मौक्तिकांचा लाभ घ्यावा.
सिमंतिनी, फुल टाईम गुरुजींचा व्यवसाय करणार्‍या अतृप्त आत्मा (सध्या नुसतेच अतृप्त ) यांनी मिपावर एका गुरूजींच्या कामाची आणि लग्नाचीही कथा मिपावर लिहिली आहे, तिचा लाभ घ्यावा.

लिंका सापडल्या की देते.

मला तर कारणमीमांसेत "ब्राह्मणाच्या मुली ब्राह्मण मुलगा नको असे म्हणत आहेत" हे कारण जास्त योग्य वाटते.
१. ब्राह्मण मुले तितकीशी आवडत नसावीत
२. ब्राह्मण मुले तितकीशी कमवत नसावीत
३. इतर जातीतील मुले याउलट जास्त कमवत असावीत.

शेतकरी मुलाला त्याची शेती कितीही सधन असली तरी मुली मिळत नाहीत ही इतर समाजातही वस्तुस्थिती अहे. माझ्या एका ब्रम्हन मित्राच्या आय टी तील मुलीने ब्राम्हण मुलाशी लग्न करणारच नाही असा निश्चय केला होती आणि तिने तो खरा केलाही.

१. फक्त महाराष्ट्रातील ज्ञातीबांधवांचा विचार केला आहे का?
२, नॉर्मली मुलगी 'पसंत' करणे असा वाक्प्रचार वापरला जात असला तरी अ‍ॅक्चुअल चॉईसचे स्वातंत्र्य मुलींकडेच असल्याने, व तेही आजकाल अधिक विस्तृत झाल्याने हे होत असावे काय?
२.अ) मुलींकडे चॉईस असल्याने त्या जातीपेक्षा इतर बाबींचा (कमाई, रूप, काँपॅटिबिलिटी) विचार जास्त करून परप्रांतिय/जातीय इ. मुलांशी प्रेमविवाह, वा आजकाल अनेकदा होते तसे अ‍ॅरेंज्ड लव्ह मॅरे करणे अधिक पसंत करतात, असे जाणवते ते खरे आहे काय?
२.ब) याच्या व्यत्यासात, तुलनेने कमी/बेभरवशाची कमाई, रूप, इ. असलेली उपवधू मुले मात्र अ‍ॅरेंज्ड मॅरेजच्या जातीतली मुलगी तर मिळेलच, अशा हिशोबाने जोडीदार शोधतात, असे असावे काय?
३. आजकालच्या विवाहयोग्य वयोगटातील स्त्री:पुरुष गुणोत्तराचा काही विदा उपलब्ध आहे काय?

मी आयटी शी संबंधित धाग्यावर प्रतिक्रिया दिलीच आहे -<<आयटी वाल्यांना / अमेरिकेत किंवा परदेशात सेटल झालेल्यांना लग्नासाठी मुली लगेच मिळतात ,किंबहुना सगळ्या मुली तेच पटकावतात .मग इतरांना मुली मिळताच नाहीत असे माझ्या बघण्यात आलेले आहे,>>

याबरोबरच ब्राह्मण/ शेतकरी मुलींवर चांगल्या संस्कारांचा अभाव , संस्कृती व धर्म यापेक्षा पैशाला महत्त्व देणे आणि स्वजातीय मुलाविषयी गैरसमज असणे ही कारणे असावीत .

माझ्या मते ब्राह्मण अथवा शेतकरी आईबापानी कडक भूमिका स्वीकारून मुलींना ताळ्यावर आणण्याची गरज आहे. अन्यथा काही वर्षांनंतर ब्राह्मण जमात नामशेष होईल की काय? असा धोका वाटतो

<< नॉर्मली मुलगी 'पसंत' करणे असा वाक्प्रचार वापरला जात असला तरी अ‍ॅक्चुअल चॉईसचे स्वातंत्र्य मुलींकडेच असल्याने, व तेही आजकाल अधिक विस्तृत झाल्याने हे होत असावे काय?>>

इब्लिस भाऊ , पहिल्यांदाच तुमच्याशी सहमत !

व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य यांचा अतिरेक झाला आहे आपल्याकडे !

संस्कृती अन धर्माला बिनकामाचे महत्व देत, पोटच्या पोरांना पिठाचे पाणी पाजून हेच दूध, असे सांगायचे दिवस संपावेत असे त्या मुलींना वाटत असेल, असे तुम्हाला वाटत नाही का?
आईबापांनी अधिक कडक भूमीका स्वीकारून मुलांना ताळ्यावर आणून कामधंदे करून कमाई कर, हे शिकवणे जास्त गरजेचे आहे असे वाटत नाही का?

भिडेसाहेब,
मी जे म्हणतोय ते नीट वाचलेत, तर तुम्ही म्हणताय त्याच्या एक्झॅक्टली उलट बोलतोय हे ध्यानी येईल Happy

आपल्या पोटच्या पोरीला उघड्या डोळ्यांनी खाण्यापिण्याचे हाल होऊ शकतील अशा घरात देणार का तुम्ही? की आजच्या मोकळ्या जगात इतर जातींचे विकल्पही उपलब्ध आहेत, त्यांचाही विचार करणार?

रॉबिनहूड म्हणताहेत तसा हा प्रश्न सर्वच ठिकाणी आहे. अमुकच जातीतला असे नाही. बेसिक प्रश्न लाईफस्टाईल चॉइसचा आहे.

केवळ शेती हा व्यवसाय असेल तर इतर नोकरी/धंद्याच्या तुलनेत नगद/खेळता पैसा शेतकर्‍याकडे कमी असतो. खाण्यापिण्यासाठी काहीतरी निघते पण पैसा नसतो. २०-३० वर्षांपुर्वीपर्यंत खेड्यातून/लहान गावातून नगद नसली तरी आयुष्य निभत असे. मुलीच्या लग्नात, वा घरात मयत झाली तर वा सणांनाच काय तो पैसा उभा करायला लागे. आता मात्र मुलांचे शिक्षण, टीव्ही, मोबाइल, दुचाकी, शिक्षणाबरोबर होणारे इतर खर्च (शाळेला येणे जाणे, कॉलेजचा इतर खर्च) या सर्वांसाठी पैसे (कॅश) लागते. तसेच शेतांवर राहण्याचे प्रमाण कमी होवून गावात राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण शेतावर राहणे आजच्या युगातल्या जीवनशैलीत शक्य नसते. गावात राहत असल्याने घराचे भाडे, शेतावर जाण्या-येण्याचा खर्च हे सगळे वाढते.
आता सांगा अश्या घरात तुम्ही तर तुमची मुलगी द्याल का?

>>>या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे. <<<

ठोस उपाय होण्यासाठी समस्येची कारणे ठरवायला लागतीलच की! Happy

ब्राह्मण उपवर मुलींची संख्या जाणवेल इतकी कमी होण्याची संभाव्य कारणे:

१. मुळातच लोकसंख्या कमी असणे

२. ब्राह्मण समाज राहणीमानाच्या दृष्टीने इतर समाजांपेक्षा पारंपारीकरीत्या पुढे आहेत. (ह्याची कारणे कोणती हा येथील विषय नाही). त्यामुळे ह्या समाजातील मुली व मुलींच्या घरचे मुलींसाठी स्थळे बघताना स्वतःपेक्षा अधिक राहणीमान असलेला (व शक्य असल्यास समजातीय) मुलगा शोधणार! (मुलीला श्रीमंत घरी द्यावे हा विचार समाजात अजूनही आहेच. म्हणून असे होते). त्यामुळे मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ब्राह्मण मुलांना समजातीय मुली मिळणे अवघड जात असणार!

३. आजकाल अनेक मुलींची लग्ने म्हणा किंवा कंपॅनियन म्हण खूप आधीच ठरून जातात. उदाहरणार्थ कॉलेजला असताना वगैरे मुली व त्यांचे जोडीदार ठरून गेल्याची अनेक उदाहरणे पाहिली. ह्या मुली लग्नाच्या बाजारात त्यामुळे उभ्याच राहात नाहीत.

४. लग्नच न करणार्‍या ब्राह्मण मुलींचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. हा प्रकार इतर समाजांमध्ये तुलनेने कमी होतो कारण त्यांच्यात 'मुलगी एकदा सासरी गेलेली बरी ब्वॉ' ही धारणा अधिक तीव्र असते.

५. विवाह सोहळ्यात ब्राह्मण मुली कमी येणे ह्याचे आणखी एक कारण असेही असू शकते की 'विवाह सोहळ्याला गेल्याशिवाय लग्न होणारच नाही' अशी सहसा ब्राह्मण मुलींची परिस्थिती नसते. हे वरवर वादग्रस्त वाक्य वाटले तरी ह्याचीही एक कारणमीमांसा आहे असा माझा विश्वास आहे.

जर ही कारणे पटत असतील (किंवा त्यातील काही पटत असतील) तर ही समस्या नष्ट करण्याचे उपाय सुचतीलही, असे माझे मत! Happy

तीन इतर मते (वरील चर्चा वाशून)

१. ब्राह्मण शब्द काढला की विहिर वगैरे उल्लेख होतात हे दुर्दैवी आहे.
२. पौरोहित्य करून भरपूर कमाई असते आणि सहा जणांचे कुटुंब (मोठ्या शहरात) त्यावर सहज जगू शकते. शिवाय आयकर नसतो.
३. सगळ्याच समाजात हा प्रॉब्लेम भेडसावणे हा एक प्रतिवाद म्हणून ठीक असला तरी इतर समाजांची लोकसंख्या खूप जास्त असणार त्यामुळे ह्या समस्येचे स्वरूप ब्राह्मण समाजाला जाणवते तितके जाणवणार नाही असे वाटते.

फेसबुक वर जिकडे तिकडे ब्राह्मण ग्रुप मध्ये हाच विषय चघळला जातोय आणि आत्ता मायबोलीवर पण . ब्राह्मण मुलांना लग्न करताना फक्त ब्राह्मण मुलीच पाहिजे असतात आणि ब्राह्मण मुलींना मात्र ब्राह्मण सोडून इतर जातीतला जोडीदार पण चालतो अशी त्यांची तक्रार आहे. त्यांना म्हटलं तुम्ही पण इतर जातीत करा ना तर त्यांची अगदी सुरवातीला तयारी नसते.( मग अगदी मिळतच नाही म्हटल्यावर तयार होत असतील ती गोष्ट वेगळी ) भिक्षुकीचा पिढीजात व्यवसाय करणाऱ्या किव्वा नवीन व्यवसाय करणाऱ्या मुलांना तर अजिबातच मुली मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार . सगळ्या मुलीना आयटी मधला मुलगा पाहिजे

<<आयटी वाल्यांना / अमेरिकेत किंवा परदेशात सेटल झालेल्यांना लग्नासाठी मुली लगेच मिळतात ,किंबहुना सगळ्या मुली तेच पटकावतात .मग इतरांना मुली मिळताच नाहीत असे माझ्या बघण्यात आलेले आहे,>>+११

त्यातून विवाहयोग्य वयोगटातील स्त्री:पुरुष गुणोत्तराच प्रमाण पण व्यस्त आहेच Happy

मला तर कारणमीमांसेत "ब्राह्मणाच्या मुली ब्राह्मण मुलगा नको असे म्हणत आहेत" हे कारण जास्त योग्य वाटते. >> अपवादाला नियम समजले जात आहे.

http://misalpav.com/node/30786

ही ती लिंक!
पूर्ण सिरीजच वाचनीय आहे.
त्यात खास करून ब्राह्मण समाजातील विवाहाविषयी एक फुल्ल टाईम गुरूजीकाम करणार्‍या मुलाचे आणि त्याच्या काकांचे विचार मननीय आहेत.

ब्राह्मण समाजात उपवर मुलींची कमतरता भासल्यास इतर समाजातील मुली उपलब्ध उपवर मुलींचा लाभ घ्यावा
धन्यवाद!

हा या समाजाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण आता धागाकर्त्याने तो ओपन फोरम मधे आणलाच आहे तर इतरांची मतं, निरीक्षणं यावीत. आज सिनेमा क्षेत्र, टीव्ही मीडीया, पत्रकारीता, आयटी, बहुराष्ट्रीय कंपन्या अशा नोकरीपेशाच्या आणि आकर्षक व्यवसायाच्या क्षेत्रात ब्राह्मण मुलं मुली १०० टक्के आहेत किंवा या यातील काही क्षेत्रात तर ब्राह्मण १०० टक्के आहेत. असं असताना इतर जातींच्या सधन मुलांकडे वगैरे मतं मांडणे म्हणजे नेहमीप्रमाणे मांजर हजला निघाल्यासारखी मते याही धाग्यावर येतात तेव्हां ती फक्त अंतर्गत समस्येवरच चर्चा करण्यासाठी नक्कीच नाहीत. इतर समाजात जमिनी विकून हल्लीच पैसा आलेला आहे, त्या आधी आर्थिक, सामाजिक आणि सर्व दृष्ट्या हे समाज मागासलेलेच होते. ब्राह्मण समाजातील मुली फक्त पैशांसाठी जातीबाहेर लग्नं करण्याचा निश्चय करतील हे पटण्यासारखं नाही. वर जी क्षेत्रं आहेत त्यात खुलं वातावरण असल्याने लग्न ही प्राधान्यक्रमाची गोष्ट राहीलेली नाही. जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य आहेच. लग्नाच्या बाजारात ज्या मुलींना चांगली "मागणी" येउ शकली असती त्या सर्व आकर्षक क्षेत्रात असल्याने वधू वर मेळाव्यात किंवा भटजींसारख्या पारंपारीक जोड्या जुळवणा-यांकडे स्थळांसाठी येणे हे कमी किंवा बंद होत जाणार.

पौरोहित्य करणा-याला पैसा मिळत असेलही पण अशा स्थळाशी लग्न करायला आजच्या मुली कितीशा उत्सुक असणार आहेत ? आंतरजातीय विवाह हे सुद्धा शेती करणा-या, काबाडकष्ट करणा-या मुलाशी होणे याच कारणाने अशक्य आहे. या प्रतिसादाचा आंतरजातीय विवाहाच्या समर्थनात किंवा विरोधात काहीही रोल नाही. बदलत्या सामाजिक परिस्थितीचं निरीक्षण नोंदवण्याचा प्रयत्न आहे.

(सबब बॉलीवूड स्टाईल सुंदर मुलींची स्वप्ने पाहणे बहुजन समाजातील रंझानाछाप तरूणांनी सोडून द्यावे ;)).

माझ्या मते सुखी वैवाहिक आयुष्यासाठी ,आवड, विचार , आचार , मते , स्वभाव , या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत , आणि एक स्त्री आणि पुरुष या दोनच व्यक्तींचा विवाह असतो मग त्यासाठी जात किंवा धर्म याचा पायंडा न रचता फक्त दोघांची मते , विचार जुळले पाहिजेत .

भिक्षुकी व्यवसायातील मंडळी कुंडली मॅच वर किती भर देतात? त्यामुळे मुली 'नाकारणे' घडते का??

महिलांना शेतीविषयक प्रशिक्षण देण्याने फरक पडेल का? उदा: एखादी स्त्री मधुमक्षिका पालन किंवा फळांचे कॅनिंग इ. व्यवसायात असेल तर तिला शेतीजवळ किंवा गावात राहायला जमेल.

शेतीप्रधान कुटुंबांमधे महिलांचं शोषण आहे असं म्हणावं तर पुरूषांनाही कष्ट चुकलेले नाहीत. कष्टाला प्रतिष्ठा नसल्याने किंवा अशा समजाला वातावरण पोषक असल्याने श्रमप्रतिष्ठा खूप कमी झालेली आहे. हा प्रश्न मुली आणि मुलं असा वेगवेगळा नाही. श्रमप्रतिष्ठेचं मोल बिंबवलं गेलं पाहीजे. एकच एक प्रचार करणा-या मिडीयाला पाहीजे तर गावाबाहेरच ठेवलेलं बरं. तुमच्या मातीत आमची माणसं, आमच्या मातीत तुमची माणसं अशा कार्यक्रमांपेक्षा पेक्षा सरकारी दूरदर्शनवरील आमच्या मातीत आमची माणसे हा कार्यक्रम सहकुटुंब बसून पहावा.

Pages