जंजीरा पाण्यामधे किल्ला... शिवाजी आत कसा शिरला?

Submitted by योगी on 16 January, 2009 - 01:51

हा फोटो मला पाण्याच्या लेव्हलवरुन घ्यायचा होता. म्हणून मी बोटीतून जाताना कॅमेरा अगदी पाण्याच्या लेव्हलच्या अक्षरशः फक्त २-३ सेंमी वर धरुन काढला होता. फोटो क्लिक झाला आणि नेमकी तेव्हाच एक उंच लाट आली आणि कॅमेर्‍यात पाणी शिरलं. लगेच मी बॅटरी आणि मेमरी कार्ड काढून कोरडं केलं आणि ५-१० मिनीटांनी परत कॅमेरा सुरू केला. सुदैवाने कॅमेरा व्यवस्थित चालू होता. Happy

गुलमोहर: 

फोटो छान आहे Happy
.
फक्त एक सुचना
शिवाजी आत कसा शिरला? >>>>
ऐवजी अस लिहीलत तर बर होईल Happy
शिवाजी महाराज आत कसे शिरले Happy

जबरी रे.. हे पण पहा
http://www.maayboli.com/node/4688 आणि हे पण http://www.maayboli.com/node/4715

दोन्ही मुरुड जंजीरा आणि काशीद बीचचे फोटो आहेत, आणि हो केदारच्या सुचनेला मनापासुन अनुमोदन ! आणखी एक गंमत सांगु..? या किल्ल्यावर महाराज कधीच आले नाहीत. कारण हा किल्ला शेवटपर्यंत सिद्दीकडेच होता. महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एकमेव अपराजित किल्ला आहे. छ. संभाजीराजांनी प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी हल्ला करणे सुलभ जावे म्हणुन तिथुन जवळच एक किल्ला बांधावयास सुरुवातही केली होती. हा किल्ला ' पद्मदुर्ग' अजुनही अर्धवट अवस्थेत जंजीर्‍यावरुन दिसतो. राजांनी समुद्रातील या किल्ल्यावरुन तर सरखैल कान्होजीराव आंग्रे यांनी राजापुरीसमोरच्या डोंगरावरुन हल्ला करायचा आणि सिद्दीला कोंडीत पकडायचे अशी व्युहरचना ठरली होती. हा डाव तडीस जाता तर ......! Sad पण तेव्हा अचानक औरंगजेबाने रायगडावर हल्ला केल्याने छ. संभाजीराजांना ही मोहीम अर्धवट टाकुन रायगडाकडे परतावे लागले आणि एक अजिंक्य जलदुर्ग स्वराज्यात येता येता राहिला.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

शिवाजी आतमधे शिरला काय किंवा शिरले काय आदर तेवढाच आहे.. त्यावेळी आतमधे शिरायला बोटी वगैरे असतीलच की.
फोटू, छान आहे!

मित्रांनो... आणि मैत्रीणींनो... Happy (वाह, काय सुरूवात आहे! मायबोलीवर अशी सुरूवात याआधी कोणी केली होती का हो? ;))

मला वाटलं होतं की "जंजीरा पाण्यामधे किल्ला... शिवाजी आत कसा शिरला" या ओळी तुम्हा सर्वांच्या परिचयाच्या असतील. हे एक बर्‍यापैकी जुनं असं सहलींमधे म्हटलं जाणारं गाणं आहे. फक्त त्या गाण्यात "जंजीरा" च्या ऐवजी दुसरा कोणता तरी किल्ला आहे. ते मला नीटसं आठवत नाहीये!

आणि बी ने म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांबद्दल असलेला आदर अशा संबोधनाने थोडासाही कमी होणार नाही! चिंता नसावी! Happy

ते गाण मालवण पाण्या मध्ये किल्ला असे आहे
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

धन्यवाद सतीश योग्य शब्द सांगितल्याबद्दल! कृपया पुर्ण गाणं सांगू शकाल का?

मालवण पाण्यामध्ये किल्ले
शिवाजी आत कसे शिरले

(आणि असंच म्हणायचं नायतर तलवार काढीन )
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

पण मालवण पाण्यामध्ये "किल्ले" आहेत का? की फक्त किल्लाच आहे? Wink

कौतुक, तलवार काढणारच असशील तर ठीक आहे... काढ, पण काढून नीट ठेव बरं का! नायतर तुलाच नाय सापडायची नन्तर! Biggrin

योगी.... मस्त एकदम...
पुढच्या वेळी वॉटर प्रुफ कॅमेरा घेउन जा!!! Wink
*****************************************************************
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही Wink Happy

खरं गाणं मालवण पाण्यामध्ये किल्ला हे आहे.

शिवाजी महाराज नाही पण सैन्य आत शिरले होते. लाय पाटिल नावाच्या कोळ्याच्या पाटलाने रात्री शिड्या लावल्या होत्या पण पेशव्यांचे सैन्य वेळेवर आले नाही म्हणून शिड्या काढून घेतल्या. ह्या बहादुरी बद्दल लाय पाटलांना "पालखी" नावाचे गलबत शिवाजी महाराजांनी बक्षिस दिले होते.

त्या अनोख्या घटनेवरुनच
मालवन पाण्यामध्ये किल्ला
शिवाजी आत कसा शिरला

हे लिहीले गेले आहे.

शिवाजी महाराज नाही पण सैन्य आत शिरले होते. लाय पाटिल नावाच्या कोळ्याच्या पाटलाने रात्री शिड्या लावल्या होत्या पण पेशव्यांचे सैन्य वेळेवर आले नाही म्हणून शिड्या काढून घेतल्या. ह्या बहादुरी बद्दल लाय पाटलांना "पालखी" नावाचे गलबत शिवाजी महाराजांनी बक्षिस दिले होते. >> केदार, सगळा तपशिल बरोबर आहे का? शिवाजी महाराज आणी पेशवे समकालिन? का हे दुसरे शिवाजी महाराज?

"शिरला तो शिरला, त्याने झेंडा कसा रोविला.. " असं पण आहे पुढे. Happy

पण कधी जिंकलाच नाही ना? सिद्धी जोहरकडे होता मग पोर्तुगीजांनी घेतला होता का?

नात्या मी लिहीलेला सगळा तपशिल बरोबर. हे पेशवे म्हणजे मोरोपंत पेशवे. शिवाजींचे पेशवे.

त्या रात्री लाय पाटलांनी भरतीत नावा घातल्या व आपल्या माणसांकरवी सुलतानढवा करन्याची तयारी केली. अमावस्येची रात्र. सिध्याला कळलेच नाही काय झाले ते. भर सकाळी वाट पाहुन लाय पाटिल परत आला. नंतर खास जाउन महाराजांनी त्याची भेट घेतली. त्याला पालखी दिली. लाय पाटिल चतुर, तो म्हणला महाराज मी कोळी मला जमिनीवरची पालखी काय कामाची. म्हणून एक गलबत देउन पालखी हे नाव ठेवले. व हा मौका गमाविल्या बद्दल महाराजांनी एक पत्र पाठवुन पेशव्यांना तंबी दिली होती.

सिध्दीचा भाउ महाराजांनी नंतर फोडला होता. पण ते सिध्दीला कळले व त्याने त्याला मारले.

हा झेंडा रोवने फक्त प्रतिकात्मक असावे. जंजिर्‍याला उत्तर म्हणून विजयदुर्ग बांधला व सिध्दीची कोंडी झाली कदाचीत त्यामुळे हे लिहीले असावे.
नंतर पहिल्या बाजीरावाचा भाऊ चिमाजी आपाने समुद्र बुझवुन हा किल्ला घेण्याचा अनोखा प्रयत्न केला होता. भयानक धाडसी प्रयत्न. सिध्दी तिकडून तोफाचे गोळे टाकतो तर चिमाजी दगड मातीने समुद्रच बुझवत निघाला. केवळ राम सेतुशी ह्याची तुलना होउ शकेल कारण चिमाजीने आदेश देताना सांगीतले प्रभु रामाने जे केले ते आपणही करु व सिद्याला उडवुन देउ.

देवगीरी किल्ला देखील अजिंक्य आहे. जंजिर्‍याला व देवगिरीला फक्त फंदफितुरीनेच जिंकले गेले आहे.

योगी विषयांतरा बद्दल क्षमस्व पण राहवले गेले नाही.

केदार, माहिती आवडली एकदम..

योगी, फोटो एकदम छान!! पण ते धुरकट काय दिसत आहे किल्ल्यात? झाडं आहेत का ती?

पण मालवण पाण्यामध्ये "किल्ले" आहेत का? की फक्त किल्लाच आहे? >>

गाण्यात किल्ला असंच आहे. पण शिवकालात किल्ल्याला किल्ले रायगड, किल्ले राजगड असे म्हणण्याची पद्धत होती. केदार माहितीसाठी आभारी आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?

जिंजिरा अगदी देखणा किल्ला आहे. २० / २५ वर्षांपुर्वी तिथे वस्ती होती. पण पाणी खराब म्हणुन लोक सोडुन गेले. अजून मोठा बांधीव तलाव आहे किल्ल्यात पण पाणी पिण्याजोगे नाही. राजपुरी गावातून होड्या जातात पण किल्ला जवळ आणि समोर दिसला तरी सरळ जाता येत नाही. वाटेत धोकादायक खडक आहेत. लांबचा वळसा घालून जावे लागते.

मि.योगी फोटो छान आहे

विशाल
मालवणच्या समुद्रात सिंधुदूर्ग नावाचा किल्ला आहे.
माझ्या लहानपणी खेळताना हे गाण म्हणत असू .

''मालवण पाण्यामधे किल्ला
शिवाजी आत कसा बसला
त्याचे नाव सिंधुदूर्ग
करुया त्याला नमस्कार .''

नारळी पोर्णिमेला या किल्ल्यावरच्या तोफेतून समुद्राला नारळ अर्पण करण्याचा समारंभ असत असे .
किल्ल्यावरच्या देवळात नियमित कथा किर्तन रंगत असे ,अस माझ्या वडिलांच्या बोलण्यातुन मी
अनेकदा ऐकल आहे .१९७१ साली मी हा किल्ला शेवटचा पाहिला.तेव्हा मला हा किल्ला सरकारतर्फे
पूर्णपणे दुर्लक्षित वाटला .नंतर डागडुजी झाली की नाही माहित नाही .
.
विषयांतराबद्दल दिलगिरी व्यक्त करते पण मालवण म्हंटल की आजीच घर व लहानपण आठवत .

करुया त्याला नमस्कार

''शिवाजी स्वस्थ कसा बसला ''अशी दुसरी ओळ आहे.

केदार, क्षमस्व कसलं म्हणतोस? उलट इतकी छान माहिती दिल्याबद्दल मीच तुझे आभार मानतो.

केदार, दिनेश, छाया.. सगळ्यांचेच आभार माहितीबद्दल!

वैदेही, पुढच्या वेळी नक्कीच वॉटरप्रूफ कॅमेरा घेऊन जाईन. Happy

नात्या, हो, ती किल्ल्यातील झाडं आहेत. उजवीकडे झाडं आहेत. आणि डावीकडे किल्ल्याच्या भग्नावशेषांपैकी, सेकन्ड फ्लोअरवर दोन तोफा ठेवल्या आहेत आणि मधे झेंड्याचा खांब आहे, ती जागा दिसते आहे.

स्सॉलीड फोटो आणि भर माहिती. मित्रांनो, कुठुन माहीती गोळा करता रे? पाण्यात किल्ला बांधला कसा?

वा फोटो हि छान आणि महितिहि छानच मीळाली ...
केदार , या सर्व घटनांना किति वर्षे झाली आसावी बर ?
एक documentary http://cultureunplugged.com/play/1146/India-Rediscovered येथे याच विषया वर बघण्यात आली .
धन्यवाद !