प्रित साजरी

Submitted by कविनारायण on 17 March, 2015 - 07:01

एक फूल उमलावं इवलुसं होउन निशान आपल्या प्रीतिचं,

एक नाव मिळावं त्याला समाजातल्या रितीचं....।

एक घरटं असावं छोटसं गोड़ित संसार करायला,

एक तू असावी मिठीत प्रेमाने घास भरायला....।

एक गोतावळ असावं छोटसं,
तू स्वाभिमानानं सावरायला....,

एक आंगण असावं हक्काच, झर झर भर भर आवरायला....।

पाने रंगबिरंगी आयुष्याच्या पुस्तकाची , तुझ्या सहवास सुगंधात चिंब भिजावी.....,

एकच इच्छा इश्वरचरणी,
तुला साठवता साठवता नयनांत प्राण ज्योत विझावी...। कविनारायण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users