आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव

Submitted by हेमन्त् on 16 March, 2015 - 02:17

अनेकजण आपले “कांदे पोह्यांचे “ अनुभव सांगताना बघून मला हि २००३-२००४ सालाची आठवण झाली ..... मुली बघण्याचे काही अजब , काही विचित्र आणि काही ठीक अनुभव घेत होतो. कितीही शिकलो असलो तरी तिशीपर्यंत आल्याने स्वताची लग्न बाजारातली किंमत हि कळत होतीच. त्यात अजस्त्र देह आणि थोडी कमी उंची (५’९.५” ) आणि काळा वर्ण नसलेल्या सौंदर्यात भरच घालत होता !!

माझे सर्व प्रकारचे कार्यक्रम चालू होते – म्हणजे मुली घरी येणे / जाणे . “सर्वांनी “ बाहेर भेटणे आणि मला सर्वात आवडायचे ते म्हणजे बाहेर फक्त दोघानीच भेटणे त्यात येक मेकाला समझता तरी येते.

आशाच येका मुली ला भेटायला मी अंधेरी लिंकिंग रोड वर संध्याकाळी गेलो होतो. Profile तर बरी वाट होती. मुलगी इंजिनीअर असून एका चांगल्या इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक होती. अंधेरी लिंकिंग रोड वर मी त्यावेळी गोरेगावात राहत असून २-३ वर्षांनी जात असल्याने तो मला बराच बदललेला आणि चकचकीत वाटता होता. इतक्यात ती मुलगी आली – नव्हे तिला तिच्या घरच्यांनी गाडीतून सोडले.माझ्याकडे त्यावेळी गाडी नसल्याने बरे वाटले.

सुरुवातीचे हाय हलो झाल्यावर तिच्या सूचनेनुसार आम्ही येका posh restaurant मध्ये गेलो . डेकोर फारच सुन्दर होता आणि ...........संद्याकाळी ७ वाजता आम्ही दोघे सोडून कोणी नव्हतो. आमची सर्वसाधारण चर्चा चालू होती . आणि इतक्यात वेटर आला... सभ्य संस्कारानुसार ( Manners ) मी मेनू तिचाकडे दिला. “ Dont want to eat .” कोठल्याही शिकलेल्या मुलीप्रमाणे ती मध्ये मध्ये विन्ग्रेजी फडत होती. तिने झटकन मेनू बघितला.

“Screwdriver please !” ती शांत पणे म्हणाली . आणि माझी धडधड वाढली....

आता थोडे माझ्या पिण्या बद्दल ..त्यावेळी मी माझ्या वयाचा जेव्हडा पितो तेवडा प्यायचो ..झेपेल तेवडी आणि कोणाला पत्ता न लागता घरी जायचो. तसे मी लग्नाच्या बायो डाटा मध्ये “ Enjoy ड्रिंकिंग” लिहिले होते आणि माताजींचा प्रचंड ओरडा खाला होता . ( तिला मी पितो हे माहित नवते – होल्स झिंदाबाद!) ..त्यामुळे काही मित्र गमतीने बोलायचे कि सर्वसाधारण कांदे पोहे चहा पेक्षा दारू चकणा झाले पाहिजे म्हणजे सर्व कसे ओपन होतील...

पण इकडे मुलगी कडक cocktail मागत होती आणि माझ्या .......... मी गोंधळलो .... येक मन सांगत होते कि मुलगी “तयारीची” आहे आणि खूष झालो. दुसरे सांगत होते कि ती माझी परीक्षा घेतेय. तिसरे सांगत होते कि काहीतरी गडबड आहे.अजून एकदा वाटले कि हिला मला नापसंद करायचे आही आणि म्हणून अति stylish वागतेय ( होय हा हि अनुभव आला होता.) मी काय मागवावे – व्हीस्की कि cocktail ?? आणि व्यवहारी मन दारूचे दर बघून घाबरत होते .........

विचारमंथन

ह्या भागाला मी विचारमंथन म्हणतो कारण यात अनेक विचार आहेत –बहुतेक माझ्या डोक्यातले आणि काही मला “वाटलेले “ आणि हे करायला फारसा वेळ नव्हता . कारण आम्ही बोलत होतो –माझ्या आणि तिच्या कामाबद्दल , घरच्या बद्दल ... त्यामुळे मी काय मागवावे असा प्रश्न पडला.

आता माझा मेंदू overclocking mode मध्ये सुरु झाला. जसे कि इंसेप्षन चित्रपटातील स्वप्न . अभियांत्रिकी आणि नंतर व्यवस्थापन केल्याने मी काय विचार आले ते मुद्देसूद मांडू इच्छितो.
१) मुलगी पिते – मी तिला ठीक वाटतो आणि माझ्या बायो डाटा मध्ये वाचल्याने आणि ती कुल असल्याने cocktail मागवले.
२) मुलगी पिते – मी तिला ठीक वाटत नाही ....पण माझी परीक्षा बघण्यासाठी cocktail मागवले.
३) मुलगी पित नाही. मी तिला ठीक वाटत नाही ....पण माझी परीक्षा बघण्यासाठी cocktail मागवले.
४) मुलगी पित नाही. माझ्याबद्दल काहीही ग्रह नाही – चांगला किंवा वाईट – पण मग cocktail का मागवले??
आणि म्हणून ४ ब ) काहीतरी गडबड आहे.

पण मला लगेच काहीतरी मागवायचे होते ,आणि माझ्याकडे मेनू आल्यावर मद्याच्या किमती बघून डोळे फिरले... मी काहीएक विचार केला आणि फ्रेश लिंबू सोडा मागवला......
“ Screwdriver for mam and fresh lime soda for you sir ?” वेटर ने गोंधळून विचारले.... मला माहित होते के चेहर्यावरून मी “तयारीचा “ दिसतोय ..... दोघांनी हो म्हटले ..

आता तुम्ही विचारात पडला आसल कि का ? का ?का मी दारू मागवली नाही ? कारण काहीतरी चुकतेय हे वाटत होते ....जसे कि मुलगी फारच साधी वाटत होती – पारंपारिक साधा पंजाबी ड्रेस आणि चप्पल . आणि स्वत: थोडा काळ दुबईत राहिल्याने आणि fashion conscious आल्याने profiling करायची सवय लागली होती. घड्याळ अगदी साधे ,साधा फोन आणि साधी पर्स...पर्स स्त्री बद्दल बरेच सांगते. मला स्वताला कपड्यांची आणि accessories ची त्यावेळी आवड असल्याने – मला मीटिंग मध्ये घड्याळ आणि पेन बघायची सवय होतिच. आणि या मुली बद्दल काहीतरी बरोबर वाटत नवते .

आणि ते भयंकर दर ..मुली बघताना बिल हे मुलगाच देतो .. त्यामुळे आधी बर्याचदा फटके खायचा अनुभव होता. मी विचार केला कि जर वेव्हलेंग्थ जुळली आणि मुलगी तयारीची निघाली तर अजून मस्त ९० मिली व्होडका मागवू आणि आपलेच कडक cocktail बनवू !

आणि दारुडे दारूड्यांना ओळखतात ( असे माझ्या माताजी म्हणतात ) पण खरेच बर्याच ठिकाणी मला अनोळखी लोकांनी “पितो का?” म्हणून विचारले नाही तर “ बर्फ कि पाणी कि निट ? “ “ आज विस्की नाही तर रम चालेल न? “ “ बार उघडला आहे , चालूया नाही तर गर्दी होते” असे सांगितले .. मला कधीच एकट्याने मुलीबरोबर पिण्याचा प्रसंग आला नवता त्यामुळे या मुली बद्दल काहीच सांगू शकत नव्हतो.

आमचे बोलणे चालू होते .नेहमीप्रमाणे मुलीला सेल्स आणि मार्केटिंग च्या कामाबद्दल काही माहित नवते. तसेच आवडी निवडी टिपिकल होत्या – म्हणजे बायकी मालिका , स्वयंपाक आणि पुढचे खरेच आठवत नाही.
दारू या विषयावर काहीच चर्चा होत नव्हती , पण मला वाटू लागले कि हिचे बाहेरील रूप असे असले तरी हि पीत असावी . आणि मला त्यावेळी तिचा हा सहजता ,कुलनेस आवडू लागला. आणि माझा कल्पनेचा वारू मनात उधळला !
“ अग ती मागच्या शनिवारी आणलेली JD कोठे गेली ?”
“ अरे थोडीशी उरली होती ती मी संपवली “ - ती
“ आणि ती बकार्डी सफेद ?”
“ अरे ती तर केवाच .... ती नाही का मी वेगवेगळी cocktail केली होती – cocktail च्या क्लास ला जाऊन आल्यावर ? तू नाय का टाइट झाला होतास ? ” - ती
“ आता काय ?”
“ अरे धीर धर ... जरा मला भजी आणि चकणा बनवू दे ,मग मी मस्त बेलिस आयरिश क्रीम विथ कुल्फी बनवते ...... बाहेर जाण्याऐवजी आपण घरीच बसू. “- ती

असे संवाद मनात रुंजी घालू लागले.
बरच वेळ झाला तरी ऑर्डर येत नव्हती ... आणि दोन जण येताना दिसले .... वेटर आणि कॅप्टन ... आणि कॅप्टन ने नम्र पणे विचारले

“ Mam will you have screwdriver with vodka or white rum?” ………..

भाग ३ – सुखांत ...
“ वोडका???” .............” रम ???!!!” ............. “दारु ???????/!!” ती भयानक किंचाळली !
काही सेकंद सगळे सुन्न न्न न्न न्न ......................... ( हा स्पेशल इफेक्ट ......)

मग तो कॅप्टन मराठीत म्हणाला “ mam ते cocktail आहे ना त्यात आम्ही गेस्ट च्या पसंतीचे ड्रिंक देतो .म्हणून तुमचा choice विचारला. “ तो विलक्षण शांत पणे म्हणाला. मला त्याचे कौतुक वाटले.

“ ड्रिंक ..... दारू ............ नाही हो मी अजिबात पीत नाही ...” मुलगी अजून थरथरत होती . इतक्यात मी समयसूचकपणे म्हटले कि फ्रेश लाईम सोडा घेणार का? त्यावर तिने फक्त लिंबू सरबत ( नो... लाईम ज्यूस )मागवला.
वेटर आणि कॅप्टन दोघेही गेले .मला जाणवले कि कॅप्टन माझ्याकडे मिस्कील नजरेने आणि वेटर विचित्र नजरेने बघत गेला.

“ तुम्हाला माहित होते कि ऑर्डेर मध्ये दारू आहे ?” मुलीने मला वेगळ्याच आवाजात विचारले ..” होय “ –मी
मी सर्व मुलीना मला तुम्ही ऐवजी तू म्हणायला सांगायचो .. हे आताच कोठे तू वर आलो होतो आणि आता तुम्ही !
“ तुम्ही पिता ? नाही बरोबर तुम्ही बायो डाटा त लिहलेच आहे “ तिला मी बहुतेक पिऊन पडणारा वाटायला लागलो होतो.

“ मग दारू तुम्ही का मागवली नाही ?” ती .” मला वाटले कि तुला शो ऑफ करायचा आहे ..मी अंदाज घेत होतो आणि खरेच ठीक झाले असते तर मागवणारच होतो. “ मी
“ नाही नाही नाही . मी पीत नाही . कधीच प्याले नाही . घरात कोणीही पीत नाही. कोणालाच आवडत नाही. “ ती व्याकूळ होऊन म्हणली.

इतक्यात ऑर्डर आली. फारच झटपट . मला एक अंदाज आला कि वेटर ने कॅप्टन स सांगितल्यावर त्यांना गडबड कळली असणार – लग्नासाठी भेटीचा प्रसंग सहज ओळखता येतो आणि त्यात बहुदा प्रथमच cocktail मागितल्याचे बघितले असेल. आणि त्यात सरळ दिसणारी मुलगी मागवते आणि मुलगा फक्त फ्रेश लिंबू सोडा ( परत तो तर “तयारीचा” दिसतोय. ) त्यामुळे त्यांनी हे ड्रिंक्स च्या choice चे नाटक केले आसनार. मला कॅप्टन च्या प्रसंग हाताळण्या च्या कौशल्याचे आजही कौतुक वाटते.

“ समजा , आणि समजा मी पिणारी असते तर .. हा? चालले असते का तुम्हाला? काय केले असते ? नाही आणि मी पीत नाही हा ...” तिच्यातली स्त्री मुक्ती वाली जागी होऊन विचारत होती. आणि मी ते लाईटली घेतले.
“ आग मी खूष झालो असतो. इन fact तेच पाहिजे होते. मला वाटले होते कि तू काय तयारीची मुलगी आहेस. आणि लग्नानंतर कंपनी झाली असती कि .” मी मिस्कीलपणे म्हणालो. पण काही जागा sense of humour दाखवायच्या नसतात.

“ नाही नाहीहो नाही , मी पीत नाही.” मी हताशपणे ,वैतागून हे बहुदा विसाव्या वेळी सांगत होती.

मग चर्चा हि नकारात्मक आणि दारू याच विषया भोवतीच झाली . ती पीत नाही हे अजून २५ वेळा झाले. आणि इतर कोणत्याही विषयांवर चर्चा झाली नाही. बिल मागवतच लगेच आले ( ते तयारच होते जणू) आणि माझ्या खिशाला चाट बसला. तिलाही जायची घाई झाली होति ... जसा कि काही मी drunken molestar च होतो.

बाहे आल्यावर वाटले कि मुलगी ठीक आहे ; थोडी भोळी आहे. अजून एकदा भेटले किंवा घरी भेटले तर गैरसमज दूर होतील . बघूया.
घरी गेलो. आईच्या “ कसा झाला programme “ ला ठीक म्हणून , फ्रेश होऊन laptop आणि नेत चालू केले आणि मैल्बोक्ष मध्ये एक मेल वात बघत होते – तिचे -
“ Mr. Waghe sorry to say that we cannot pursue it further . ---- xxxxxxxx”
Dear नाही, thanks नाही ....direct ... हा मला सगळ्यात झटपट आलेला नकार होता!

उपसंहार – आणि सुखांत का?
सुखांत शब्द बघून अपेखा काही वेगळ्याच असतील आणि इथे तर मुलीने नकार दिला . पार्टी तर झालीच नाही .. मग का ?
ती सुखी झाली –असावी बहुतेक -- ती एक तिच्या दृष्टीने वाईट मुलाशी लग्न कराय पासून वाचली. तिचा आऊटलूक............
मी समजा लग्न केले असते तर जिला पिण्याचा त्रास होतो अशा मुलीबरोबर खुश राहिलो असतो का?? नाही ... मी freedom , responsibility , fun and live and let live – we all can co-exist वर विश्वास ठेवतो.
मला यथावकाश अशी बायको मिळाली ( नाही ती पण कटकट करते .आणि माझी छोटी पण .. पण त्यांनी आणि मी हे स्वीकारले आहे. ) मी हि सुखी झालो.
फक्त मी आणि ती मुलगी एक मेकांबरोबर सुखी झालो नाही. ( they live happily ever after …. Not together ! )
जाता जाता नवीन मुलांना पण सांगावेसे वाटते कि जशी कॉर्पोरेट जगात cultural fitment असते ( मराठीत काय म्हणतात?) त्या पेक्षा हि जास्त ती लग्नात असते . अनेकदा कंपन्याची एक संस्कृती बनते आणि त्या मग त्या प्रकारचेच उमेदवार बघतात. जसे कि मेडिया कंपन्या , ad – agencies ,विदेशी बँक वगैरे. त्यातही citibank आणि HSBC आणि Standard Chartered च्या संस्कृतीत फरक आहे.
पण कॉर्पोरेट संस्कृती जमली नाही तर नोकरी बदलू शकता .. नवरा किंवा बायको बदलणे तेवढे सोपे नसते.
माझे घर बर्यापैकी स्वतंत्र वृत्तीचे , मातृसत्ताक आणि देव धर्मास फारसे न मानणारे , फारसे गंभीर नसलेले होते. हि मुलगी त्याच्या विरुद्ध होती.
आज दहा पेक्षा अधिक वर्षे उलटून गेल्यावर मी स्वताशीच हसतो आणि म्हणतो –चीअर्स !!!!!

ता. क. – आता नवी पिढी फारच पुढे गेली आहे.तर कोणी वधू / वर परीक्षा ड्रिंक्स सोबत केली आहे का ? अनुभव सांगावेत ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलय... सत्य घटना असेल तर भारीच.... !
त्या वेटर अन कॅप्टनच कौतुक तुम्हाला वाटतय, तसच मलाही वाटतय.

पण बहुधा त्यामुळेच (जेव्हडी केअर कॉकटेल सर्व्ह न करता प्रश्न विचारून, एक लेडी गिर्‍हाईक म्हणुन वेटर अन कॅप्टनने केली तेव्हडीही केअर तुम्ही आयुष्याचि जोडीदार जिच्यात शोधता तिची केली नाही म्हणून), तुम्हाला नकारही आला असे माझे मत, कारण, तिच्याकडून तिच्याच नकळत चूक होत होती हे तुम्ही समजुन घेऊ शकला नाहीत, हळूवारपणे तिला सांभाळून घेऊन सुधारण्याचा प्रयत्न तर अजिबात केलाच नाहीत, किमान आश्चर्याने विचारले जरी अस्ते की काय ग, तू ड्रिंक्स घेतेस? अन (कौतुकमिश्रित वा तिरस्कारयुक्त) आश्चर्य दाखविले असते, तरी चालले असते ... किंवा अगदी, हे काय ऑर्डर केलेस माहिते ना तुला, ड्रिंक आहे ते.. असे सांगितले असते तरी चालले असते, निदान ती तिच्या चूकीबद्दल सावध तरी झाली असती, पण तुम्ही नुस्ती गंमत बघत बसलात, व सेल्फ रिस्पेक्ट (म्हणजे मी पितो हे कळले तर काय होईल इतक्याच विचारात) सांभाळत राहिलात.... थोडक्यात काहीच न करता/बोलता सिद्ध केलेत की तुम्ही तिची "केअर" करण्याइतपत सक्षम नाहीच. शिवाय तिची ऑर्डरमधील चूक, वेटर व कॅप्टनला नजरेस आणुन द्यावी लागली या बद्दलची शरम तिच्या मनात निर्माण झाली असेल.

कोणतीच मुलगी, तिची "केअर" करू न शकणार्‍या मुलाला कधीच पसंत करणार नाही हे खात्रीने सांगु शकतो, व तुम्ही तिची "केअर" करू शकता हे "निदान/किमान" दर्शविण्यातही कमी पडलात Proud .

असो, झाले गेले गंगेला मिळाले..... बाकी हल्ली काय शिल्लक अस्त, अन काय लौकर संपतं? व्हाईट्ट बॅकार्डी? की ओल्डमॉन्क? Wink
अन चकण्याला चिवडा/शेव/शेंगदाणे वगैरे घेता की कालच्या शिळ्यापोळीची केलेली खरपुस फोडणीची पोळी? Lol

गोष्टीगावाचे | 17 March, 2015 - 09:16 नवीन
मग तिने screwdriver का विचारले होते. >>> +१

अरे मुलगा बिल देतोय तर काहीतरी नवे ट्राय करु असा विचार केला असेल तिने आणि कधी कधी कॉक्टेल्स
मेन्युकार्ड मध्ये अल्कोहोल आणि नॉन अल्कोहोल (किन्वा एकदम कमी अल्कोहोल) ड्रिन्क्स एकत्र असतात.
तरीपण screwdriver नावावरुन एकवेळ माहित नसेल तरी थोडी शन्का यायला हवी होती हे मात्र खरे!

@ निलिमा

काहि आन्शि आपले बरोबर आहे.

हि गोष्ट खरी आहे .. हि ऑगस्ट - सप्टेंबर २००४ च्या आस पास घडली असावी .
मला काही बारीक गोष्टी आठवत नाहीत .. त्यात म्हणजे तिने नक्की कोठले cocktail मागवले. तिने असे cocktail मागवले होते कि जे व्होडका ,सफेद रम ,जीन बरोबर चालते आणि ज्याचे जीच्कडे mocktails मिळतात तिकडे दारू विरहीत ( non- alcoholic ) version पण मिळते.
मी स्वत: cocktails चा पंख नाही कारण भरमसाठ किमतीत फारच कमी दारू मिळते. जेव्हा कॉर्पोरते पार्टीत फुकट मिळाली तेवाच घेतली .. तरीपण अनेकदा मला महागड्या व्हीस्की चा पर्याय बारा वाटतो.
मी असे सर्व समावेशक cocktail – mocktail शोधायचा प्रयत्न केला. मला वाटते कि ते मोहितो (( Mojito ) ( http://en.wikipedia.org/wiki/Mojito ) असावे किंवा अजून काही. त्यावेळी मला अशी काही cocktails माहित होती. आणि त्या मुलीच्या सांगण्याप्रमाणे ती त्या हॉटेल मध्ये २-३ वेळा आली होती आणि तिकडे हि सराइतासारखी वावरत होती. मेनू हि तुकड्यात होता ( tabbed ) तिने बहुदा cocktails चे पण फटकन काढले आसवे आणि mocktails समजून cocktail मागितले असावे.
मी Screw Driver लिहिले कारण मला ते नाव फारच गमतीदार आणि दवर्थी वाटले.

हेमन्त वाघे

limbutimbu आनि झक्की - आपल्याला थोड्या वेळात उत्तर मिळेल . तसे पण मी वीकांतालाच पितो आणि कधी तरी आठवड्यात येकदा. आनि घरी पितो तेव्हा शाही पद्धतीने पितो. limbutimbu व्हाईट्ट बॅकार्डी / ओल्डमॉन्क – मला वाटते आपली brands ची समाज एवडीच असावी – होय मी हे पण पितो पण त्यावर बरेच काही पितो सविस्तर लिहित आहे ... तूर्तास हा फोटो पहा .माझा एका पूर्वीचा थोडासा खाजगी संग्रह ..Hemant Saying Cheers!.jpg