गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकारचे अभिनंदन. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे १६वे राज्य आहे.

या आधी:
उत्तर प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान, पंजाब, ऑरिसा, पॉन्डीचेरी, म.प्रदेश, कर्नाटक
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणाम, गुजरात, दिल्ली, बिहार, आंध्र प्रदेश.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते. >>

मोदीसरकार मधे पिंक रेव्होल्युशन १६% वाढला. यावर काय मत आहे ?. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोहचवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. ?

यावर अजुन भक्तांनी उत्तर दिले नाही. येण्याची शक्यता देखील कमीच आहे Wink तोंड शिवली जातात अश्यावेळेस

महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन Happy

हा कायदा महाराष्ट्रात १९७६ पासूनच अस्तित्वात आहे. त्यात आता गोवंशातील इतर प्राणि फक्त अ‍ॅड केलेले दिसतायत. पण महाराष्ट्रात इतर महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना, हाच कायदा इतक्या तातडीने मंजुर करायची इतकी का घाई लागली युती सरकारला ते कळत नाही.

जम्मू काश्मिरसारख्या राज्यातही जर हा कायदा आहे तर याचा संबंध धर्माशी जोडता येणार नाही. आता ज्यांनी कायदा केला ते आणि ज्यांनी तो आधी केला नाही ते हे दोघेही त्यांच्यात्यांच्या तथाकथित व्होट्बँक्सना किती गृहीत धरतात त्याचा उत्तम नमुना.
भाकड झालेला गोवंश मिथेन पसरवून ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर घालत नसावा.
यातून म्हशींना वगळले आहे असे ऐकतो, तसे असेल तर तो वर्णद्वेष आहे.
एनीवे काय करायचे ते करा पण त्याचे बील मी हिंदू आहे म्हणून माझ्या नावावर फाडू नका.

मला तर बै तो पीके आठवला.

गाईवर देवाचा शिक्का म्हणुन गाय मारायची नाही.

पण गाय मारुन खाणारे आता इतर प्राणी खातील !

माणसांची गोमाता आता इतर प्राण्यांच्या मृत्युला कारणीभुत ठरेल.

धन्य तो धर्म अन धन्य ती गोमाता !

काल पाउस पडला तो पाउसच होता की सावरकरांचे अश्रू ?

गोवंशहत्येवरील बंदीकरता महाराष्ट्राच्या सध्याच्या हिंदुत्ववादी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन. Happy

Rofl

>>>> पण गाय मारुन खाणारे आता इतर प्राणी खातील ! <<<<
तर तर, मारुन खाणार्‍यांनी मारले नाही तर कावळे-गिधाडांची सडक्या उष्ट्याखरकट्याची कशी सोय होईल? Proud उपाशीच मरतील कावळे-गिधाडे, नै का?
तशात हल्ली म्हणे अन्निसच्या हिंदुधर्मश्रद्धाहटाव आंदोलनामुळे कावळ्यांन्ना मानवी मर्तिकानिमित्ताचे फुकटचे मिळणारे भाताचे "पिंडही" मिळत नाहीत ! Lol

हा कायदा झाल्यापासून सावरकरद्वेष्ट्यांना पण अचानक सावरकर आठवू लागले आहेत. यालाच म्हणतात भूत के मूंह मे राम राम.

अहो मटण-चिकन आता किती महाग होईल, आम्हा मांसाहार्‍यांच्या खिशाला आणखी मोठं भोक पाडलंय सरकारने. Sad

गोवंश हत्याबंदीमुळे सामान्य जनतेचा काय विकास होणार ते मात्र कळलेले नाही,

बाकी भाजपा मित्रपक्षाचे नेते, शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनी हा निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा विरुद्ध असल्याचे म्हटले आहे असे काल बातम्यांत दाखवत होते. बहुधा त्यांना देखिल माझ्यासारखेच काही कळत नसावे.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील. >>

धागाकर्ता सावरकर द्वेष्टा? Uhoh Rofl

मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना >> एक कुतुहल म्हणुन विचारतो. हिंदु धर्मग्रंथात गोवंश मारुन खाऊ नये असे म्हटले आहे कां??

कत्तलखाने आणि गायीच्या लेदरवर जे परिवार अवलंबून आहेत त्यांचे पुनर्वसन सरकार कसे करणार आहे? >>शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहण करुन तिथे उभे राहणार्‍या उद्योगात त्याना नोकरी मिळेल की. Wink

शेती गेली की जनावरांचा शेतकर्‍याला काय उपयोग? आता तर तो विकुही शकत नाही, आहे की नाही गंमत! राजाची काठी , बसली तरी आवाज नाही करायचा!

तुकाराम महाराजांनी नाठाळाच्या माथी हाणावी काठी अस लिहल्याच आठवतय.

>> गोवंश हत्याबंदीमुळे सामान्य जनतेचा काय विकास होणार ते मात्र कळलेले नाही,
+१०००

Lol

गोवंश हत्याबंदीमुळे सामान्य जनतेचा काय विकास होणार ते मात्र कळलेले नाही,

हे वाक्य मुळ लेखातले नाही.

नाव नाठाळ,
गाव झांजीबार ,
स्त्री की पुरुष माहित नाही.

मुंबईत कुणाला भेटायच ते सांगा.

>>>> मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना >> एक कुतुहल म्हणुन विचारतो. हिंदु धर्मग्रंथात गोवंश मारुन खाऊ नये असे म्हटले आहे कां?? <<<<<
धर्मग्रंथ पुराणे इतके जुनेपाने कशाला धुन्डाळता?
"गोब्राह्मणप्रतिपालक" असे बिरुद मिरविणारे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आठवणारच नाहीत. त्यातुन वर ब्रिगेडी शिकवणूकीनुसार हे बिरुद हा देखिल बामणी कावा असेच शिकला असाल तुम्ही. तरी तुम्हाला विश्लेषण करुन शिकवणे भाग असल्याने सान्गतो की वरील बिरुदातील "गो" हा शब्द गाय या अर्थाने घ्यायचा आहे, व त्यांन्ना न मारता त्यांचे प्रतिपालन करणारा असा तो छत्रपती.
असो.
गाढवापुढे वाचली गीता..... अस झालय हिंदू धर्मात सध्या.. ! Proud

मग बैल मारुन खाल्ला तर कुठे बिघडलं?? गोहत्याबंदी कायदा करायचा हवं तर. बाकी छत्रपतींनी शेतकर्‍यांना न विचारता जमीन अधिग्रहण केल्याचा ईतिहास वगैरे ??

गाय हा प्राणी हिंदू धर्मात पूज्य असल्याने तो मारून खाणे वाईट हे लॉजिक असेल तर इट इज ओके . मला त्याचा आदर आहे. मी स्वतःही कधी गो मांस खाऊ शकणार नाही

पण

भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.
याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.
जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

>> ही वाक्ये चुकीची आहेत . मुळात चारा अन पाणीही मिळवने किती कठीण असते हे माहित नसल्याने कदाचित .

जाउद्या ओ त्यांच्या मनात काँग्रेसद्वेष इतका भरला आहे की मोदीसरकारने मांस निर्यात १६% वाढवली तरी ते दिसत नाही फक्त "तत्कालिन सरकार" इतकेच छाती बडवत किंचाळत फिरतात असतात

गंमत म्हणजे देशातील पहिल्या ६ क्रमांकाच्या मांस निर्यातदारांमध्ये ४ हिंदु आहेत.

1) Al-Kabeer Exports Pvt. Ltd.
Its owner name: Mr. Shatish &Mr. Atul Sabharwal
Add: 92, Jolly makers, Chembur Mumbai 400021

2) Arabian Exports Pvt.Ltd.
Owner’s name: Mr.Sunil Kapoor
Add: Russian Mansions, Overseas, Mumbai 400001

3) M.K.R Frozen Food Exports Pvt. Ltd.
Owner’s name Mr. Madan Abott.
Add : MG road, Janpath, New Delhi 110001

4) P.M.L Industries Pvt. Ltd.
Owner’s name: Mr. A.S Bindra
Add : S.C.O 62-63 Sector -34-A, Chandigarh 160022

Pages