संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माझ्या पहिल्या काही पोस्टमधेच डायव्हरसीटी आणी विचारांचा वेगळा अँगल यावर लिहिले होते.

असे नाही बेफी. मी हे सिरीयसली लिहित आहे. मध्यंतरी लॅब अ‍ॅनिमल बाबतचा लेख वाचला. स्त्री संशोधक असताना वेगळी रिडिंग्ज आणि पुरुष संशोधक असताना वेगळी रिडिग्ज मिळाली. हार्ट अ‍ॅटॅकच्या लक्षणांची गोष्ट घ्या. स्त्री आणि पुरुष वेगवेगळी लक्षणे दाखवतात हे मान्य व्हायला किती वेळ लागला? इमर्जन्सी रुममधून हे अपचन आहे सांगून स्त्रीला परत पाठवले जायचे. हार्ट अ‍ॅटॅक रोखण्यासाठीची संधी हुकायची.

बेफी, तुम्ही नुसते प्रश्न विचारत आहात आणि frankly I don't find those questions very useful either! Do you really care about this, are you genuinely interested in resolving this issue or you are just asking questions because you have lots of questions! कारण तुम्हाला ही कळेल की तुमच्या प्रश्नांची रेडीमेड उत्तरं कोणाकडेच नसणार. It is not an easy 2+2 math problem. The answers are subjective and complex.
And I would not like the discussion here to stick to what is said or not said in the original article. Since A. The writer herself is not here to fend her view and B. There are more sides of this problem than just the points mentioned in the article.

Edit: मला पुन्हा वाचताना खूप हार्श लिहिलंय की काय असं वाटतंय पण तसा उद्देश नाहीये. इतर क्षेत्रातल्या स्त्रिया त्यांचे प्रॉब्लेम्स त्या तुलनेने संशोधनातल्या स्त्रियांचे प्रॉब्लेम्स वै. फाटे फुटले की धागा भरकटू लागेल म्हणून प्रश्न विचारताना हा विचार केला पाहिजे असं वाटतं. त्याने चर्चा पसरत जाणार नाही.

नीधप,

>> ते पर्याय कमी असणे, ते पर्याय इन्फ्लेक्झिबल नसणे हीच अन्याय्य व्यवस्था आहे आणि ती बदलली गेली पाहिजे
>> हाच तर मुद्दा आहे.

स्त्रीच्या आई होण्याच्या क्षमतेमुळे हे पर्याय कमी आणि ताठर झालेत. जैवघड्याळ कुणाच्याच हातात नाही. ही व्यवस्था खास स्त्रियांवर अन्याय करण्यासाठी म्हणून उत्पन्न केलेली नाही. हां, तिच्यात नारीसुगम (वूमन फ्रेंडली) सुधारणा जरूर करायला हव्यात.

आ.न.,
-गा.पै.

पुरुषाने केलेले संशोधन आणि स्त्रीने केलेले संशोधन यात फरक वगैरेवरून माझा एक धागा आठवला

स्त्री मेंदू व पुरूष मेंदू
रीक्षा - http://www.maayboli.com/node/41816

साधारण याच आशयाचा एक कार्यक्रम २६मार्चला IIC IWN ने आयोजित केला आहे.

'Women’s Path to Success: The Best Practices, ADOPTED’ to be followed by 100 HOC (Hours of Change).

The 100 HOC is an ambitious program of CII IWN that has been providing aspiring female students the tools, direction and confidence needed to advance in their careers and impact their personal well being. An important goal of this program has been to inspire them to become more self-sustaining in developing as a leader themselves.

The students will receive certificates by CII for attending the seminar, therefore we would require the list of students who are attending the seminar. Also, girl students will get a chance to interact & get mentoring from Industry people, therefore girls need to carry resume's with them.

Kindly note the details of the session :
Date : Thursday, 26 March 2015
Time : 0930 hrs – 1100 hrs (Panel Discussion)
1115 hrs – 1215 hrs (100 Hours of Change)
Venue : IES Management College and Research Centre, IES Auditorium, #791,
S.K. Marg, Bandra Reclamation, Mumbai, Maharashtra 400050

मृण्मयी,

आशियाई विद्यार्थ्यांच्या बाबतीत अमेरिकेतल्या विद्यापीठांत होत असलेला भेदभाव यावर केवळ आशियाई विद्यार्थ्यांनी संशोधन केलं, तर त्यास बिगर आशियाई वांशिक गटांकडून अनुमोदन प्राप्त झालेलं बरं पडावं. तशाच धर्तीवर उपरोक्त प्रकरण पाहता येईल.

आ.न.,
-गा.पै.

आशियाई विद्यार्थ्यांच्या बाबतीत अमेरिकेतल्या विद्यापीठांत होत असलेला भेदभाव यावर केवळ आशियाई विद्यार्थ्यांनी संशोधन केलं, तर त्यास बिगर आशियाई वांशिक गटांकडून अनुमोदन प्राप्त झालेलं बरं पडावं. तशाच धर्तीवर उपरोक्त प्रकरण पाहता येईल.>> that does not make it right because both the attitudes are wrong..one is racist and other is sexist!

बापरे....हे जरा अति होतय. रिव्ह्यू सर्वसाधरणपणे अ‍ॅनॉनिमस असतो म्हणजे रिव्ह्यू कोण करतं ते कळत नाही. तसेच पेपर कोणी लिहिला आहे हे रिव्ह्यू करणार्‍यांना कळू नये अशी मागणी जोर धरते आहे. तसे झाले तर कदाचित असले बकवास रिव्ह्यू येणार नाहीत. काही कॉन्फरन्सेस आणि जर्नल्स मधे पेपर सबमिट करताना ऑथर कोण आहे हे कळू नये ह्याबद्दल काळजी घेण्यासाठी बरेच नियम असतात. पण हे सरसकट सगळीकडे झाले तर चांगले होइल.

नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सर टीम हंट ह्यांनी केलेले विधान "लॅबमधील स्त्रिया टीका केल्यावर रडतात; त्या कोणाच्या तरी प्रेमात पड्तात अन्यथा तुम्ही त्यांच्या प्रेमात पडता आणि लॅबमध्ये व्यत्यय निर्माण होतो".

अर्थात ह्या विधानाचे जोरदार पडसाद उमटल्यामुळे त्यांनी UCL मधून राजीनामा दिला आहे. संपूर्ण बातमी येथे वाचायला मिळेल http://www.bbc.co.uk/news/uk-33090022

अमा, मी इथे लिहीले होते लैंगिक शोषणाच्या केसेस कमी होतात. पण आज वाचलेला डेटा माझे विधान दुरूस्त करण्यास भाग पाडतो. ७०% महिला कधी ना कधी सेक्शुअल हरॅसमेंट झाली असे रिपोर्ट करतात. Sad

http://www.npr.org/2015/10/16/448944541/sexual-harrassment-case-shines-l...

Pages