हरवलेली कथा

Submitted by मिश्कील on 27 February, 2015 - 07:28

प्रिय मायबोलीकर ,

कधी कधी अस होत ना , एखादी गोष्ट / कथा / ललित आपण एखाद्या दिवाळी अंकात किंवा छोट्याश्या पुस्तकात वाचतो आणि ती गोष्ट आपल्या मनाला भिडते , वर्षानुवर्ष स्मरणात राहते..
अशीच एक कथा मी ईयत्ता ९ असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत एका जुन्या दिवाळी अंकात वाचली होती साधारण १९९९ साली म्हणजे तो दिवाळी अंक १९९९ च्याही आधीचा होता .
कथेच नाव होत "प्रवास" आणि लेखिका "नेहा प्रभुदेसाई" त्या कथेच्या शिर्षाकाच्याही वर "पहिल्या परितोषकाची कथा" अस लिहिल होत.
तुम्हा मायबोलीकरांचा व्यासंग खूप मोठा आहे , मला हि कथा पुन्हा वाचायची आहे . कुठे उपलब्ध होईल ... कृपया मला सांगा..

धन्यवाद

मिश्कील

Group content visibility: 
Public - accessible to all site users