PDF स्वरूपातील पुस्तकांचे वर्गीकरण इ .

Submitted by लीलावती on 26 February, 2015 - 01:41

सध्या अभ्यासाच्या निमित्ताने अनेक पुस्तके डाऊनलोड केली जातात.( copyright चे उल्लंघन होत असले तरी विद्यार्थी असल्याने पर्याय नसतो ) वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये ठेवली तरी कधीतरी घाईघाईत सरमिसळ होते / योग्य नावाने सेव न केल्यास नंतर सापडत नाहीत . ह्यावर उपाय म्हणून कोणते manager software आहे का ?

मला संशोधन पत्रांसाठी ( research papers ) http://www.mendeley.com/ हे माहित आहे आणि ते मी वापरतेही . तसेच काही पुस्तकांसाठी असल्यास खूप उपयोग होईल .

घन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या अभ्यासाच्या निमित्ताने अनेक पुस्तके डाऊनलोड केली जातात.( copyright चे उल्लंघन होत असले तरी विद्यार्थी असल्याने पर्याय नसतो ) >>>>>>>>>>>

हे पार डोक्यावरुन गेले. तुम्हाला असे म्हणायचे आहे की परवडत नसले तर सरळ चोरी करा?
पर्याय नसला तर खून करा. ......

हे पार डोक्यावरुन गेले. तुम्हाला असे म्हणायचे आहे की परवडत नसले तर सरळ चोरी करा?
पर्याय नसला तर खून करा. ......>>>
हम्म...तरी पण ८००० ते १६००० रुपयांना असलेली फिरंगी पुस्तकं, विद्यार्थी नाही विकत घेउ शकत..(सगळ्याच पुस्तकांची भारत-नेपाळ-बांग्लादेश आवृत्ती निघत नाही.)

आता हे पुस्तक बघा...
कंपनी आणि लायब्ररी घेउ शकतात पण जर हेच पुस्तक syllabus ला असेल तर लायब्ररीतल ३-४ कॉपीज सगळ्यांना मिळत नाही. मग एक तर विकत घ्या, किंवा फोटोकॉपी करा नाहीतर PDF प्रिंट करा हेच पर्याय राहतात.
student edition असा काही पर्याय असायला हवा..