एकदिवसीय सामन्यातील द्विशतक- झालेले आणि संभाव्य .

Submitted by विश्या on 24 February, 2015 - 04:50

आजपर्यंत क्रिकेट च्या इतिहासामध्ये फक्त चारच खेळाडू एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक करू शकले आहेत .
सचिन तेंडुलकर
वीरेंद्र सेहवाग
रोहित शर्मा
ख्रिस गेल .

इथून पुढील काळात असे किती आणि कोण कोण खेळाडू द्विशतक करू शकतील ?
आपले मत आणि प्रतिक्रिया कळवा - क्रिकेट च्या जनकारापैकी कोणाचा अंदाज बरोबर येईल याची चर्चा हि आपण याच धाग्यावर करुत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चटक नाहितर काय. indian subcontinental pitch द्या नि ३००+ चेस करायला सांगा, कोहली काय इनिंग पेस करतो राव अशा वेळी. द्रुष्ट लागावी असे हँडलींग असते त्या चेस चे. Tactician's delight !

लक्ष्मणला जसं बॅगी ग्रीन दिसल्यावर डोक्यात क्रॉसकनेक्शन लागायचं तसं कोहलीचं ३००+ चेस करताना होतं.
त्यातून अनुष्कावहिनी स्टँडमध्ये नसल्या की जास्तं डिस्ट्रॅक्शनपण होत नाही! हमखास मारतो Happy

टोटली राँग!

मॅच जिंकणे हे कधीही महत्वाचे!
५० रन्स पळून काढल्या आणि मॅच जिंकली आणि १० फोर मारल्य पण मॅच हरली तर त्या पळून काढलेल्या ५० रन्सचं मोल जास्तं ठरतं.

>>>>>>>

हो, पण हे मोल तुम्ही मॅच जिंकलो की नाही यावरच ठरवत आहात.
आणि मी म्हणतोय की मॅच जिंकणे हेच नेहमी महत्वाचे नसते, तर कधी कधी एखादी चौकार षटकार आणि कलात्मक नेत्रसुखद फटक्यांनी सजलेली आवडीच्या खेळाडूची इनिंगही खुप आनंद देऊन जाते.
फरक लक्षात घ्या,
शेवटी आपली टीम जिंकलेली बघताना आपल्याला काय मिळते, तर आनंद आणि समाधानच ना Happy

आज मार्टिन गुप्टील या खेळाडूने २०० धावा बनवणार्या या लिस्ट मध्ये आपले नाव कोरले असून , या खेळाडूबद्दल कोणीही अंदाज केला नव्हता पण त्याने २३७ नाबाद धावा केल्या आहेत .

आज गेलने सुद्धा २०० मारले तर एकाच सामन्यात दोन्ही संघांकडून द्विशतक होण्याचा अनोखा विक्रम होईल.

३६ झालेत, १६४ हवेत!

चालतं हो, क्रिकेट म्हटले की असेच दुक्के फेकत राहायचे असते आणि खरे झाले तर बघा मी बोल्लो होतो ना म्हणत फुशारक्या मारायच्या असतात Wink

Pages