ओरलँन्डो

Submitted by इनोची on 23 February, 2015 - 16:29

मी मार्च मध्ये ओरलँन्डेला माझ्या आई व ३.६ वर्षाच्या मुलीसोबत जात आहे . नेट वर माहिती शोधत आहेच पण कोणाकडुन कळाली तर बर होईल कुठल्या थिम पार्कस मुलीसाठि सुटेबल आहेत . तसेच चांगली हॉटेल्स रहाण्यासाठि व भारतीय जेवणासाठि कळाली तर बरे होईल . मी ईथे शोधले परंतु एकच पोस्ट सापड़ली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचा नियम असा आहे की फिंगर फुड घेउन जाउ शकतो पण पिकनिक फुड घेउन नाही जाउ शकत.>>> बरोबर आहे.

फ्लोरिडाला मला आठवतं की मी झीपलॉक बॅग्स मधे मुलांसाठी पीबीजे सॅंडविच, ट्रेल मिक्स वगैरे प्रकार नेले होते तेव्हा आत नेऊ दिले होते. थोडेसे पदार्थ नेले तर काही प्रॉब्लेम येत नाही.

<<<<दुसरे म्हणजे आमचा अनुभव सगळा डिस्नेलॅण्ड चा आहे. तेथे आजूबाजूला अनेक हॉटेल्स असल्याने जर त्यापैकीच एखादे बुक केलेले असेल तर मधे सरळ हॉटेल मधे जाता येते व एक दोन तास आराम करून परत पार्क मधे जाता येते, आणि मग रात्री उशीरापर्यंत थांबायला काही वाटत नाही. डिस्नीवर्ल्ड मधेही हे सहज करता येइल का?>>>>

हो नक्की. डिज़्नीवर्ल्ड चे जे रिज़ॉर्ट्स असतात ( किंवा डिज़्नीवर्ल्ड चे पार्ट्नर हॉटेल्स) तिथे राहायला असलात की अर्ली मॉर्निंग राइड्स घेऊन मग दुपारी हॉटेल वर आराम करून संध्याकाळी पुन्हा पार्कात जाता येते. यायला जायला बसेस असल्यामुळे पार्किंगची झंझट नाही.

फा आम्हाला यंदा तरी डीस्ने मधे फूड घेऊन जायला काहीच problem आला नाही. त्यांनी ढुंकून पण बघितले नाही. ह्या उलट सेल्फी स्टिक घेऊन जाणार्‍यांना हुडकून काढत होते.

सरळ हॉटेल मधे जाता येते व एक दोन तास आराम करून परत पार्क मधे जाता येते >> ह्यात एक कॅच आहे. तुम्ही कुठल्या सीजन मधे जाता त्यावर अवलंबून आहे. जर xmas break, spring break अशा पीक सीजनला गेलात तर कधी कधी असा वांदा होतो कि crowd control साठी ते park entry तात्पुरती १-२ तासांसाठी बंद करतात. तुम्ही परत यायच्या वेळेत नेमके हे झाले कि बोंबललात. आमच्या ग्रुपमधले दोन जण Xmas break मधे LA च्या डिस्ने मधून दुपारी आरामात झेपून वगैरे येऊ म्हणून बाहेर पडले. We were staying at walking distance in non-disney affiliated house. नि चार वाजता परत आले नि तासभर बाहेरच अडकले. अर्थात हा problem Disney affiliated जागांना नसावा असे मला वाटते. चौकशी करून घ्या.

पार्कमधून बाहेर पडून ट्रान्सपोर्ट (तिथे रांग असतेच) घेऊन हॉटेलच्या रूमवर जायचे, पुन्हा परत येताना आधी बसची रांग मग सिक्युरिटी चेकिंगची रांग आणि पुन्हा आपल्याला हव्या असलेल्या राइडपर्यंत चालत जायचे एवढा द्राविडीप्राणायाम करण्यापेक्षा तिथेच भाकरतुकडा खाऊन वाइच आराम करून पुढची इड घ्यावी असं माझं मत. संध्याकाळी ५ वाजता पार्कमधून बाहेर पडायचं टार्गेट ठेवलं तर पाचच्या पुढे-मागे बाहेर पडलात तर रूमवर पोचून आराम करून फ्रेश होउन रात्रीचं जेवण गावातल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गाठता येतं.

रच्याकने, डिस्नी व्हेकेशनसाठी पॅकिंग करताना सीसॉल्ट विसरू नये Happy

५ ला पार्क च्या बाहेर नाही पडता येत पण. काही शोज आणि परेड्स रात्री असतात. फायरवर्क्स, लेसर शो , लाइटिंग असलेली ती परेड इ. रात्री ९ नंतर असतात . दिवसभर थकायला होतं हे खरं . आम्ही कधी बाहेर हॉटेल वर जाऊन विश्रांती असे नाही केलेय. बाहेर पडून पुन्हा आत येणे हे करायचा पेशन्स नव्हता कधी . मग दुपारी तिथेच पार्क मधे कुठेतरी निवांत बसणे, कॉफी, ब्रेक घेणे हे करायचो .

Pages