स्वप्न …. अर्धवट भरकटलेले ….

Submitted by कृष्णतारा on 23 February, 2015 - 13:20

एक आभास …. असाच विचार आला… पण ….
कसे होणार हे माहित असूनही होणार आहे हे माहित नाही …. ।

आनंदपण आहे ,रागपण आहे ,
विचार आहे , अविचार आहे….
जीवन चालत आहे मरणपण येत आहे …. मरणानंतरही जीवन आहे…. ।

मी काय करणार आहे हे मलाच ठाऊक आहे…
आणि जाणूनपण काय उपयोग इतरांसाठी ते गौण स्थानावर आहे…. ।

समाजात नाही का ,कुठे कसा जात आहे ….पण जात आहे…।
वाट नेत आहे मी जात आहे…।

उद्याही हेच होणार आहे… सूर्य पुन्हा उगवून मावळणार आहे…
अंधार पडणार आहे…. रात्र होणार आहे…. न कळलेले स्वप्न अधुरेच का राहणार आहे….।

देवातही नाही आणि मानासाताही नाही …. एक जीव स्वत:तच गुंतलेला आहे….
एक वेडी आशा मनात आग लावत आहे…।

मी येनार…. पुन्हा वापस येणार आहे….
बरीचशी कार्ये मार्गी लावणार आहे … ।

बर्याच वेळा शोधलं … अंधारात …. रात्रीत ….
चारही दिशेत दिशेताल्या कोपर्यात…।

शेवटी मिळाले ते मिळालेच पण नाही मिळाले ….
अचानकपणे हालचाल करणार …. उठून पाहणार …।
जवळच आहे पण सापडत नाही ….

आयुष्य सोन्यासारख आहे …. पण …।
कालाय तस्मै नम: ……

ते भंगलेलेच आहे किंवा नाही …।
असेच एक अर्धाकृती … पूर्णाकृती स्वप्न ….
आहे सदैव भरकटलेले ……

Group content visibility: 
Public - accessible to all site users