शतशब्दकथा … सेल्समन

Submitted by कृष्णतारा on 22 February, 2015 - 07:37

"नकोय मला … "
"फक्त एकदा ट्राय करुन पहा नवीन शेन्दाक्ष मिश्रण … "
म्हातार्याकडे बघत सेल्समन उद्गारला…शेवटी म्हातार्याने त्याला आतमध्ये बोलवले आणि तो त्याच्याकडून त्याच्या सामानाची चौकशी करू लागला .
"हि हिराष्टी ,एक नंबर गुणाची वेल . एकदा का तुमच्या घरात लावली कि तुमच्या घरात सगाळीकडे आनंदी आनंद होइल… खास शिमालय पर्वतातून आणली आहे. "
म्हातार्याने त्याच्याकडे पाहिले आणि छताकडे पाहू लागला . त्याला कळलेच नाही तो आपल्याच नादात माहिती सांगत होता .
शेवटी म्हातार्याने त्याला थांबवले …।

कायमचेच ….

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेलीला लटकवून गळफास दिला!

अवांतर - हिमालयचे शिमालय केलेय, टायपो झालाय, की त्या नावाची जागा आहे एखादी?

<< कथेत पाणी कसे घालायचे हे मी सांगू शकेन. कथाच पाण्यात घालायची असली तर जुयेरेगावाले सांगू शकतील. >>

हे वाचताच व्हॉल्टेअरचा किस्सा आठवला.

प्रसिद्ध विदेशी कवी व्हॊल्टेअर कडे एकदा एक नवोदित कवी गेला. त्याने त्याला आपले काव्य ऐकविले. मग तो ऐटीत म्हणाला,"या काव्याचे एक वैशिष्ट्य आहे. यात कुठेही जी (G) हे अक्षर नाही". तसे व्हॊल्टेअर ने ते काव्य पुन्हा एकदा चाळले व तो म्हणाला,"मला वाटते यातील इतर अक्षरेही काढून टाकली तर बहार येईल."

तेव्हा २७ शब्दांचे पाणी घालण्यापेक्षा उरलेल्या ७३ शब्दांनाच पाण्यात घालण्याची तुमची कल्पना खरंच बहारदार आहे.

तेव्हा २७ शब्दांचे पाणी घालण्यापेक्षा उरलेल्या ७३ शब्दांनाच पाण्यात घालण्याची तुमची कल्पना खरंच बहारदार आहे.>>>>>

कस आहे ना गुगळेभाऊ … "वो नियम भी क्या जो टुटे ना " या माझ्या उक्तीला अनुसरून मी ही अल्पकथा लिहिली होती …
तरीपण पुनश्च एकदा "तारीफ के लीये शुक्रिया… "