असा 'देव ' तोही इथे ' दास ' आता

Submitted by बाळ पाटील on 22 February, 2015 - 07:36

कुठे क्रृष्ण- राधा कुठे रास आता
तसाही फुलांना कुठे वास आता

विळ्याभोपळ्याने गळाभेट घ्यावी
असा राहिला का कुणी ' खास ' आता

मला पनवती अन तुला राहु- केतू
कुठे आपलीही जुळे रास आता

जरी माणसांना असे टाळले मी
भुतांचेच होती तरी भास आता

सदा घेत जा तू तपासून नाडी
मनाचा तनावर अविश्वास आता

भुकेलाच होता भुकेलाच आहे
असा 'देव' तोही इथे ' दास ' आता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विळ्याभोपळ्याने गळाभेट घ्यावी
असा राहिला का कुणी ' खास ' आता............. खूपच सूंदर

जरी माणसांना असे टाळले मी
भुतांचेच होती तरी भास आता......... वा

एकंदरीत सूंदर