अभागी …

Submitted by कृष्णतारा on 22 February, 2015 - 07:16

लिहिताना चार ओळी तुझी आठवण येते …
का हातातल्या कागदासही सर मखमलीची येते…।

जिंदगी चार दिसाची ,चार दिवसही जगेना …
मनाला या मनांच्या भावना का कळेना…।

हरवून स्वतहा मिळालो कोणाला …
भास भरले मनी श्वासही सापडेना …।

एकटा चालतो मी मार्गावर अखेर काही दिसेना ….
अंधारल्या जगात मजला माझी प्रिया मिळेना…।

ठरवले जेंव्हा जगावे का उगाच आपले ….
घ्यान जरी नसे मजला परतीचे वारे लागले ….

येण्यास परत ती वेळ आलीच नाही ….
वाट पाहता वाट कधी सरलीच नाही…।

आहे मी एकटाच असेन मी एकटा या जागी ….
सोडले तिजला असा मी एक अभागी …. असा मी एक अभागी …।

श्री बेफिकीर यांस अर्पण …

Group content visibility: 
Public - accessible to all site users