द क्रोनिकल्स ऑफ नार्निया

Submitted by टीना on 20 February, 2015 - 01:31

द क्रोनिकल्स ऑफ नार्निया वर बोलण्यासाठी हा धागा..

धागाकार चिमुरीचा हॅरी पॉटर धागा सुसाट सुटल्यामूळे आणि त्यावर हॅरी चाहत्यांनी फिडेलीअस चार्म प्लेस केल्यामुळे तसेच त्या धाग्याचे अनेक सिक्रेट किपर असल्यामुळे नार्निया या पुस्तकासंबंधी चर्चेत हॅरी धाग्याचा एक किपर जरि फुटला तरी दुसरा लगेच तलवार घेऊन तयार होतो.. याचा परिणाम ; कुठेच एखाद लुपहोल सुद्धा चर्चेसाठी मिळेनास झालय. म्हणून हा नविन धागा सुरु करतेय .. द क्रोनिकल्स ऑफ नार्निया हे पुस्तक वाचलेल्यांनी कॄपया पुस्तकांबद्दलचे भले बुरे परिक्षण उपलब्ध करुन द्यावे हि विनंती..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमुरी आता तरी प्लीज सांग पुस्तक कसे आहेत ते... पिक्चर पाहिले आहेत सगळे.. हॅ पॉ सारख वाटतय कि पुस्तक जास्त छान असणार म्हणून मागवलेत..
माझं पहिल पुस्तक द मॅजिशिअन्स नेफ्यु डिस्पॅच झालय .. पण मिळेपर्यंत धीर कसला मला.. २र, ४थ, ५व आणि ६व आहे जवळ तसच सातही पुस्तकांचे pdf सुद्धा आहेत जवळ.. करते वाचन सुरु आत्ता ..

मला मुव्हीज जास्त आवडल्या पुस्तकांपेक्षा.. पुस्तकं एकदोनदा वाचण्याजोगी आहेत.. म्हणावी अशी भुरळ घालत नाही.. अर्थात हॅपॉ चं पारायण झाल्यावर नार्निया वाचल्यामुळे असं वाटत असेल.. सगळी सिरिज वाचुन झाली नाहिये.. कधितरी वाचेन पण..

मला मुव्ही मधला अर्सलान आवडला खुप जास्त..खुप रिअल वाटतो.. पहिल बुक केलय सुरु.. हॅ पॉ वाचल्यावर खरच उगा कम्पेअर करन सुरु होत इच्छा नसतानाही .. पण जवळपास पन्नासेक वर्षांचा फरक आहे दोन्ही सिरीज मधे.. त्यातही लेविस ची स्टाईल आणि रोलींग ची स्टाईल पुर्णतः वेगळी वाटली जेवढ वाचल त्यावरुन.. पण खर सांगु तर मजा येतेय हे पण वाचायला मला.. १९५० साली प्रकाशित झालेल साहित्य वाचतोय अस डोक्यात आलं कि उगाच क्लासिक कै तरी वाचतोय असा फिल यायला लागलाय.. Happy

मलाही सिनेमा जास्त आवडले. पुस्तकांंमध्ये नंतर बरीचशी मतं पोलिटिकल वाटायला लागतात. त्यातही काही उल्लेख फारच खटकलेत.

पण पुस्तकं वाचण्यासारखी आहे हे निश्चित.

मी पुस्तकांचा अधिक मोठा पंखा आहे सिनेमापेक्षा. मी सगळी सीरिज वाचली आहे. मूळात नार्निया रुढार्थाने मुलांसाठी लिहिलेली पुस्तके नाहीच आहेत. त्यांच्यावर आर्थरियन लिजंड्सचा खूप प्रभाव आहे. नार्निया लिहिण्यापूर्वी थोडाच काळ आधी लुईस ख्रिश्चन कनव्हर्ट झाला असल्याने ख्रिस्ती रेफरेन्सेस खच्चून भरले आहेत. त्याशिवाय ग्रीक आणि रोमन दंतकथांचा देखील जबरी वापर आहे. एकंदरीतच मध्ययुगीन युरोपाचा जबरदस्त फील आहे. नार्निया वाचताना एक खूप मोठी परिकथा वाचल्याचा फील येतो. जुन्या युरोपीय परिकथा मूळातच डार्क असल्याने नार्निया खूप डार्क आहे जे सिनेमा पाहून तितके जाणवत नाही. शेवटी क्लासिक ते क्लासिक!

टीना - सर्वात भारी त्या ७ पैकी माझ्यामते मॅजिशियन्स नेफ्यु आणि लास्ट बॅटल, मस्ट रीड.

पायस >> जस्ट मॅजिशियन्स नेफ्यु संपवल.. अभ्यास करत होती .. ऑर्डर ट्रॅक केली तर यायला वेळ होता मग म्हटल वाचूनच टाकावं .. आता संपवल्यावर वाटतय कि नार्निया आणि हॅरी पॉटर ची तुलना नै होऊ शकत .. It's indeed a classic piece .. हि पुस्तक ज्या काळात लिहिल्या गेली त्याचा प्रभाव नक्किच जाणवतो .. इथ तुम्ही अ‍ॅज अ थर्ड पर्सन साऊंड नै करत .. मला तर वाचताना अस वाटत होत कि माझे आजोबा मला एखादि बेड टाईम स्टोरी ऐकवत आहे कि काय .. सुपर्ब अनुभव होता .. मुव्हिज मधल्या भरपुर लिंक लागल्या. तरी म्हटल कि या प्रोफेसर कडचं कस काय असत ते कपाट.. आता २र बुक घेते थोड्या वेळाने .. इथ हजेरी लावल्याबद्दल धन्यवाद .. आणि हो तुमच्या माहिती मुळे पुस्तकाचे खर तर गोष्टींचे संदर्भ लक्षात आले.. धन्यवाद परत एकदा Happy

"But she was a dem fine woman, sir, a dem fine woman." खुप हसली हरवेळी जेव्हा हा डायलॉग आला Proud

मी हॅरी पॉटर नंतर नार्नियाची पुस्तके बघत होतो परंतु त्याचे कुरिअर चार्जेस डब्बल होते. ९०रुपयांच्या पुस्तकाला ९० रुपये चार्जेस. मग नेहमीची ट्रीक केली विशलिस्ट मधे पुस्तक टाकुन ठेवलीत २ आठवड्यांनी ईमेल आला. प्रत्येक पुस्तकावर १०-२० % डिस्काउंट ऑफर केली आणि कुरीअर चार्जेस फ्री Happy

विशलिस्ट मधे टाकुन ठेवा अ‍ॅमेझॉन तुम्हाला कमीत कमी मधे करुन देतील

प्रशांत के>> मला सर्व सेट जवळपास ८५० पर्यंत पडला .. पुर्ण सेट ची ऑर्डर नै दिली मी.. अ‍ॅमेझॉन वरुनच मागवलीत पण .. तिसर संपवेल आज.. हॅपॉ एवढी इंटरेस्टींग नै कि एकदम कंटिन्युटी ठेवता येईल पण आवडली मला.. संग्रहात ठेवण्यासारखी नक्कीच आहे.. लेखक लेविस स्वतःच्या गॉडडॉटर ला म्हणतात त्याप्रमाणे, some day you will be old enough to start reading fairy tales again. मजा येतेय वाचायला.

यातले जे क्रिएचर्स / नार्नियन लोक खरच इतक्या वेगवेगळ्या मायथॉलॉजी मधुन घेतले आहे नं कि वाचतेवेळी मला उगाच फिल यायला लागला कि मी कित्ती सार्‍या गोष्टींपासुन परे आहे. अडाणी वाटायला लागल एकदम Lol मग काय सगळ्यांची माहिती गोळा करत करत वाचतेय. छान वाटतय की बरच नवनवीन माहिती मिळाली.

आता विचार करतेय इतर कल्चर बाबत पुस्तक वाचन सुरु करावं Happy