अवतरणात "त्याचे" नसणे अधोरेखित होत गेले.

Submitted by कमलेश पाटील on 17 February, 2015 - 03:51

भेटल्या सार्‍याच लोकांना आपले समजत गेले.
केवढे खोट्याच नात्याचे पाश सांभाळत गेले.

ऐकले होते उगा मी जे बोलले नव्हतास तू.
खोटे सारेच भास तरी आज पुन्हा गुंतत गेले.

जेव्हा सुखाच्या वाक्यास दु:ख पुर्णविरामी यावे.
अवतरणात "त्याचे" नसणे अधोरेखित होत गेले.

ज्या मनास सोस होता बेबंध वेडे धावण्याचा.
तयाचे धादांत खोटे अंदाज अजमावत गेले.

कितीदा वेडीच ठरले स्वप्नाळू आहे म्हणून .
हसता हसताही दु:खाचे चार अश्रू झाकत गेले .

थांबणे आता जमेना प्रवाहाचा पूर झाला .
शेवटी तुझ्या आठवांत नवी आशा जोडत गेले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users