प्रीत वेडी

Submitted by minal.harne on 16 February, 2015 - 04:19

"प्रीत वेडी"

गुज माझे आरशाला सांगतांना,
पहिले मी स्वतःला हरवतांना.

पापण्यांच्या आडुनी डोळ्यात काही,
वेड्या मना तू काय नक्की सांगू पाही.

एक वेडी गोड लाली उमटलेली,
सांगून जाई रात्री स्वप्ने जागलेली.

ओठ उमलती बंद होती, काही वाक्ये थांबलेली,
येई न वदता मानसी नि:शब्द झाली.

शब्द नाहीत फक्त स्वप्ने गुंफलेली,
प्रीत वेडी वाट हि चुकवून गेली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक छोटासा चेन्ज, शेवट्च्या ओळी वाचताना असे वाचा:

सत्य नाही फक्त स्वप्ने गुंफलेली,
प्रीत वेडी वाट हि चुकवून गेली.

अजुन meaningful होइल.