आवाहन : कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : पुणे

Submitted by अ. अ. जोशी on 12 February, 2015 - 04:49

नमस्कार,
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे 6वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २५० कवींनी यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत व्यक्ती, पाणी, निसर्ग संतुलन, माणुसकी, प्रेम असे विषय गेले ५ वर्ष दिले होते.

या स्पर्धेत शक्यतोवर जालावरील प्रतिथयश म्हणजे अगदीच नियमित लेखन करणार्‍या कवींनी भाग घेऊ नये ही विनंती. मात्र सूचना जरूर कराव्यात. आपल्याला माहित असणार्‍या आणि भाग घेण्याची इच्छा असणार्‍या कवींना आपण ही माहिती जरूर सांगू शकतो.

स्पर्धेत भाग घेणार्‍यांसाठी :
१) स्पर्धेसाठी "आई" आणि "शेतकरी (सकारात्मक)" या विषयांवर आधारीत प्रत्येकी एक याप्रमाणे दोन स्वरचित कविता पाठवाव्यात.
२) दिनांक २२ फेब्रुवारी २०१५ पर्यंत कविता नमूद केलेल्या पत्यावर पोचाव्यात.
३) काव्यलेखनाच्या गुणांकनाप्रमाणे पहिल्या जास्तीत जास्त २० कवींना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येईल.
४) मोठी बक्षिसे देण्यासाठी आम्ही कोणताही फंड गोळा करायचा नाही असे ठरविले आहे. त्यामुळे केवळ स्मृतीचिन्हाच्या स्वरूपातच सन्मानित करण्यात येते.
५) कवींमध्ये एकप्रकारे काव्यमैत्री व्हावी हा उद्देश स्पर्धेमागचा आहे.
६) क्रमांक काढताना जात, धर्म, संप्रदाय, वय, शिक्षण, इ. कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. फक्त काव्यात्मकता पाहिली जाते.

कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय अनंत जोशी, फ्लॅट नं. ३, कृष्ण गोविंद, गणंजय सोसायटी, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र.

कविता ईमेल, व्हॉट्सअॅपने वगैरे पाठवू नये.

कळावे,
आपला
अ. अ. जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिथयश म्हणजे अगदीच नियमित लेखन करणार्‍या कवींनी भाग घेऊ नये.. जरा उलगडून सांगाल का ,
यामध्ये मायबोलीवर लिहिलेल्या कवितांची संख्या किंवा सदस्यत्वाचा कलावधी याबाबतीतील मर्यादा अपेक्षित आहेत का ?

बरं धन्यवाद. पण मी शेतकई या विषयावर कविता लिहू नाही शकत.

माझ्या मर्यादा मला माहीत आहेत.

धन्यवाद

किरणकुमार,

साधारण पहावे. माबोवरील कवितान्ची संख्या किंवा कालावधी ज्याचा त्याने ठरवावा. मी फक्त विनंती केली आहे तशी. ही अट नाही.

कमलेशजी,

शेतकरी हा विषय सहसा फार हाताळला जात नाही जर आपण शेतकरी नसू तर. म्हणूनच हा विषय स्पर्धेच्या निमित्ताने का असेना हाताळला जावा असाही एक उद्देश आहे. शेतकरी आणि शेतीवर सर्वसामान्यांचे आयुष्य बर्‍यापैकी अवलंबून असते. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करावा आणि शेतकरी या संकल्पनेला तरी बळ द्यावे असे वाटते.

माझी आपणांस एक विनंती आहे की, गुणांकनाच्या दृष्टीने न पाहता शक्य असल्यास शेतकर्‍याच्यासाठी विचार करून कविता पाठवावी.

धन्यवाद.

धन्यवाद अ.अ. जोशी, माझे काही ओळखीचे माबो सदस्य अनेक वर्षापासून आहेत मात्र नियमित लिहेणारे नाहीत त्यांना भाग घेण्यास सांगतो. आपल्या उपक्रमास शुभेच्छा.