सरळ रस्त्याला हवे तर घाट कर

Submitted by जयदीप. on 8 February, 2015 - 12:10

सरळ रस्त्याला हवे तर घाट कर
पण तुझ्याशी पोचणारी वाट कर

जायच्याआधी जगाला चाट कर
शेर एखादा तरी भन्नाट कर

सांगतो आहेस ते ऎकेन मी
बंद माझ्या आतला गोंगाट कर

ना कुणी असले तरी असशील तू
तू स्वतःशी एवढे कंत्राट कर

तू समुद्रासारखी आहेस.... तर....!
एकदा 'जयदीप'लाही लाट कर!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांगतो आहेस ते ऎकेन मी
बंद माझ्या आतला गोंगाट कर>>>>>>>हे येकदम ब्येस्ट बघा. आमच घोड हिथच पेन्ड खात, अन कुटबी कान्सन्ट्रेशन व्हत नाय.:अरेरे::फिदी:

व्वा !