नेमाडे कधी वाचलेच नाही ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 February, 2015 - 13:27

नेमाने ज्ञानेश्वरी वाचणारे आम्ही
नेमाडे कधी वाचलेच नाही
नाही म्हणजे कधीतरी एकदा दोनदा
हातात कोसला घेतला होता
पण इतका जीव गुदमरला की
कोश कधीच पुरा केला नाही
हिंदुच्या तर नावानेच धसका घेतला
अन त्या पायरीलाही पाय लावला नाही
पण आता या ज्ञानपीठवाल्यांनी
इतकी काही पंचाईत केली आहे
खरच सांगतो माझ्यातील मराठीची
सारीच हवा काढली आहे
सोडून दिलेले कोडे पुन्हा एकदा
द्यावे कुणीतरी सोडवायला
अशीच काहीशी वेळ वगैरे...
आता आली आहे माझ्या वाट्याला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोडून दिलेले कोडे पुन्हा एकदा
द्यावे कुणीतरी सोडवायला>>

खरेच एकदा परत सोडवा ही कोडी.
कोसला कदाचित या वयात आवडणार नाही तुम्हाला.
ती फेज तरूणपणी, हॉस्टेललाईफमध्ये जास्त असते.
पण हिंदु नक्की वाचा.
लोक 'अडगळ' शब्द वाचून पूर्वग्रह करून घेतात, पण 'समृद्ध' शब्दाकडे कानाडोळा करतात.
उलट या कादंबरित मोहेंजोदडोपासून ते दक्षिण भारतापर्यंत सगळी एकच समृद्ध हिंदु संस्कृती असे सुचविले आहे.
(अप्रत्यक्ष)
जर कधी कुठल्या शिक्षणसम्राटाच्या संस्थेत नोकरी केली असेल तर चांगदेव चतुष्टी वाचताना बर्याचदा 'अगदी,अगदी' होऊन जाईल.
खरंच नक्की एकदा नेमाड्यांचं कोडं सोडवा.

धंन्यवाद साती..कोड सोडवायचं आहे . नक्की वाचणार आहे . .चैतन्य, अभिमान दुराभिमान नाही रे बाबा ..मनातलं लिहिल आहे ..

कोसला वाचायचा प्रयत्न केला होता कॉलेज मध्ये असताना… पण प्रयत्न करूनही १०० पाने कशीबशी वाचली… नंतर अक्षरशः सोडून दिलं वाचणं… त्या नंतर नेमाड्यांच्या कुठल्याही पुस्तकाला हात लावायची हिम्मत नाही झाली!

अजिबात नाही वाचलेत तर छानच आहे
अभिनंदन नेमाडे न वाचल्याबद्दल

वैभवः
प्रतिसाद वाचून वाईट वाटले नाही तर चीड आणि कीव एकाचवेळेस आली. असो, नेमाडे एक कवी म्हणूनही ग्रेट आहेत. त्यांच्या देखणी ह्या कवितासंग्रहातील आजी नावाची कविता वाचली नसेल तर जरूर वाचावी. काळीज पिळवटून लिहिणे काय असते ते कळेल. कोसलातील मनी तर सगळ्यांना माहित असेलच. पुरस्कार मिळाला म्हणून कोणी ग्रेट नसतो. नेमाडे अगोदरही ग्रेट होते, अजूनही आहे आणि कायम राहतील. त्यांच्या तुकाराम ह्या पुस्तकाच्या अनुवादाच्या सुरुवातीला चंद्रकांत पाटीलांनी तथाकथित मराठी दिगज्ज साहित्यिकांची घेतली आहे. त्याचे कारण जेव्हा तुकारामावर लिहायला ह्यांना सांगितले तर आज उद्या करीत करीत एकानेही काम केले नाही. अश्या वेळेस नेमाडेंनी अवघ्या सहामहिन्यांत अतिशय उत्तम तुकाराम आपल्यापुढे ठेवला. बाय दि वे, आपण किती ज्ञानपीठ विजेतांचे साहित्य वाचले आहे. न वाचल्याबद्दल आपल्याला स्वतःचे कौतुक वाटत असेल तर आपले काहीच करता येणार नाही.

समीर