व्यसने

Submitted by विनायक. दि.पत्की. on 7 February, 2015 - 10:44

आजकाल उत्सव म्हणजे व्यसनांचेच प्रदर्शन आजकाल उत्सवात जी काही दृष्ये दिसतात त्या वरून कोणालाही वाटत असते कि हे कसले उत्सव ? सर्व सुज्ञ मंडळीनी या पासून दुर असावे हा हेतू

तंबाकू सेवनाने कर्क रोग होतो,
तरी पण आम्ही तंबाकू खातो
घरी विसरलीच तर ,
शेजार्याकडे अधाशाने पहातो

गुटख्याने शरीराची चाळणी होते
तरी पण आम्ही गुटखा खातो
बंदी आणली तरीही आम्हीच
दाम दुपटीची संधी देतो

मद्यपानाने कार्यक्षमता कमी होते
तरी पण आम्ही मद्य पितो
रोज इंग्लिश नाही मिळाली
तर गमतीने देशीवर हि भागवतो

मटका आणी लॉटरी सर्वनाश करतात
तरी पण आम्ही कर्ज काढतो
आज नाही तर उद्या लागेलच
म्हणुन शेखी मिरवतो

मादकपणा अनैतिकता आणतो
तरी ही आम्ही मादकता जोपासतो
कितीही सुंदर बायको असली
तरी गोरी दुसर्याचीच म्हणतो

जिभेचे चोचले गरीबी आणतात
तरी पण आम्ही दाबुन हाणतो
कर्जाचे हप्ते फिटत नाही त
म्हणून सगळीकडेच कण्हतो

व्यसने अशी असावीत कि
ति दाखवण्यासाठी नसावीत
लाभ नसला तरी हानी नसावी
सर्वांनाच त्याची ओढ असावी

Group content visibility: 
Public - accessible to all site users