मेघांचे चुंबन

Submitted by विशाल कुलकर्णी on 5 February, 2015 - 05:49

सुटे सावली, 'मी'पण हसले
गात्री हळवे श्वासही रुसले
कातर वेळा, क्षण विरहाचे
गंध तनुचा मनही फसले

क्षण-क्षण, हलके गुणगुणताना
समीरासंगे दरवळले
रात्र निळाई, श्यामल हिमकर
कण-कण, देहाचे अवगुंठन सरले

अलगद गात्री फुले शिरशिरी
सुटे कंप देहास मखमली
मिरवी धरा मेघांचे चुंबन
अस्तित्वाचे भान न उरले

विशाल...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्र निळाई, श्यामल हिमकर
कण-कण, देहाचे अवगुंठन सरले >>>> क्या बात है ....

Happy

विशाल सॉरी पण Rofl
मी शिर्षक वाचताना फारच घाईघाईत मेघांचे ऐवजी मेघाचे वाचलं. Proud
आणि म्हणलं हा कधीपासून इतक्या बोल्ड कविता करायला लागला Rofl

हसू थांबलं की कविता वाचेन.