AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॉपलेस डे वर सात्विक संताप व्यक्त करणारा मनुष्य आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पाहून थोडक्यात भान देण्यासाठी चिडवून देणारी पोस्ट टाकणारा मनुष्य हे दोघेही प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत सज्जन आहेत. अर्थात मला इतक्या प्रेण्ड रिक्वेस्ट येतात हे लाडीक तक्रारीने सांगणा-या, मेसेज बॉक्स मधे अमूक अमूक मेसेजेस पाठवू नयेत असे अधून मधून इशारे देणा-या, स्वतःचा फोटो टाकून प्रतिक्रियांची (?) वाट पाहणा-या आणि फोटो का टाकला असा प्रश्न विचारला की अपमान करणा-या बायकांना हे समजेल याची अपेक्षा नाही.

ह्या आंग्रेंचं काय मध्येच? Lol जामोप्या जन्मला ग सखे, जामोप्या जन्मला!
आताच जामोप्या जयंती साजरी केली ना मध्यंतरी? आता लगेच नवमीपण साजरी करायची का?

थांबा थांबा, बायकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट, आयडी काढून अवघे तीन दिवस झालेले, हा जामोप्या नाही वाटत, कोण असावं बरं?HBS01.gif

काही लोकांना समजलेल्या नाहीत पोस्टी. तेव्हां निरुपणाच्या हेतून ही पोस्ट.

पुरूषांनी आपल्या आयाबहीणींनाकाय वाटेल एव्हढ्याच माफक उद्देशाने लिहीलेल्या पोस्ट्सवरून आंतरराष्ट्रीय उत्क्रांती, संस्कृतीचे बदल याबद्दल भाषणे ठोकली जातात, जमल्यास त्या बक-यास बळी देण्यात येते. एखाद्याला अश्लील वाटले म्हणून त्याने तक्रार केली की श्लील अश्लील हे कसे सापेक्ष आहे यावर रसाळ प्रवचने झडतात. एखाद्याला टॉपलेस डे ची कल्पना भयंकर वातू शकते. या बाबतीत कशाला हवी पुरूषांशी बरोबरी हा प्रश्न खरं तर स्त्रियांना सुद्धा पडतो. त्या बोलत नाहीत. आणि पुरुषांची हालत काही सेकंदात आयसीयूत नेण्यासारखी होते. मग एखादा हजारो पोस्ट टाकण्याऐवजी कधी आहे टॉपलेस डे असा प्रश्न विचारतो तेव्हां या बायकांचं खरं मत समोर येतं. असा विचारही सहन होत नसेल तर कशाला अशा गोष्टींवरून कुणाला नरसिंहावतार घेऊन उभा आडवं फाडावं ?

आंग्रेसाहेब, अजूनही कायबी कळलं नाही बघा की नेमकं काय कनेक्सन आहे तुमच्या ह्या उहापोहाचं अन मुळ लेखाचं?
मी जरा गोडाचे रत्ताळे खाऊन येतो, मग बघू काही समजतय का? Proud

आंग्रे,
कायदा फक्त स्रीयांना उघडे फिरायला बंदी आणतो पण पुरुषांवर तशी बंदी नाही, ते टॉपलेस डे प्रकरण कायदेभंग म्हणून होते. आता त्याला विरोध करणार्‍यांना मनुवादी म्हणून शेरेबाजी झाली . ठीक आहे. तशी ती विरोध करणार्‍या स्त्रीयांवरही झाली.
दुस-या एकाने तिथेच इथे भारतात साजरा होणार आहे का हा डे, नाही म्हणजे आधीच जागा धरून ठेवायला अशी मार्मिक टिप्पणी केल्यावर ही कॉमेंट मार्मिक नसून आंबट शौकिन आहे. या कायदेभंगाच्या बाबतीत तत्व म्हणून सपोर्ट करायचा तर मला दोघांना वेगवेगळे कायदे योग्य वाटत नाहीत म्हणून माझा सपोर्ट आहे असे म्हटले असते कुणी चावले नसते.

टॉपलेस परेड हा स्वाती२ म्हणतायत तसा कायदे समान असावे/ कपड्यावरून टिपण्णी करू नये म्हणून केला होता.
इथे टोरोंटो मध्ये एका पोलिसाने स्त्रियांच्या कपड्यावरून काही मतं प्रदर्शित केली होती त्याचा विरोध म्हणून.
http://en.wikipedia.org/wiki/SlutWalk

घ्या

popcorn.gif

स्वतः खाऊन संपविता आहात>>>
म्हणून तर ते म्हणतात ना बायकांच्या प्रतिक्रीयांचा काय अर्थं काढावा कळत नाही.
कन्फ्यूजिंग!

दक्षिणा - दिवे घ्या!
Wink

>>>काय होतं की इथे असताना सणवार करणारे, इतरांसारखीच मतं असणारे जरा म्हणून पोटापाण्यासाठी देशाटन करून गेले की आपण किती चुकीचे होतो, आहोत याचे साक्षात्कार तिथे होऊ लागतात. बरं, तिथल्या वातावरणात जुळवून घेण्यावाचून गत्यंतरही नसते. यातले काही जण भारतात परतल्यानंतर पुन्हा पूर्वीसारखे होताना पाहीलेले आहेत. काही बदललेल्या स्टेटमधेच राहतात. त्यांचं डिफ्युजन पुन्हा होत नाही. काहिंच्या मतांचं पुन्हा पुन्हा रिसायकलींग होत राहतं. हे परिस्थितीजन्य असू शकतं. असे लोक त्या त्या परिस्थितीत असताना आपल्या आधिच्या अवस्थेला हसणे अशक्य असल्याने त्या अवस्थेत असणा-या देशी लोकांना हास्यास्पद ठरवत असतात<<<

Lol

मुळात अनुल्लेख हे अस्त्रच आता बोथट झालेले आहे. Proud

अनुल्लेख केल्याचे इतके नीट समजते की त्यात काही अर्थच वाटत नाही. Lol

ही कॉमेंट मार्मिक नसून आंबट शौकिन आहे >>

स्वाती २, तुम्ही आता मुद्यावर आला आहात. ती व्यक्ती आंबटशौकीन नाही हे ठामपणे सांगू शकतो. तिने फक्त या असल्या थेरांपायी कुणाची सोय होईल हे दाखवून दिलं आणि हल्ल्याचे लक्ष बदलले :फिदी:.

अनुल्लेखाचे अनेक फायदे आहेत. त्यातला एक म्हणजे अडचण होऊ लागली की...

आपण काल जे होतो हे ते आज नाहीत, आज आहोत ते उद्या नसणार. काहींच्या बाबतीत दिवसागणिक ज्ञान वाढू शकते त्यामुळे नवे व्यक्तीमत्त्व दिवसागणिक मिळत राहते. अशा वेळी आयडींचे वय काय पहावे.

रामा शिवा गोविंदा

परिभ्रमसि किं व्यर्थं क्वचन चित्तं विश्राम्यतां
स्वयं भवति यद्यथा तत्तथा नान्यथा |
अतीतमपि न स्मरन्नपि च भाव्यसंकल्पय
न्ननर्कितगमनाननुभवस्व भोगानिह ||

तेव्हां ज्ञानाचे जोगेंद्र उघडे ठेवा, पोस्टी तर काय, आपोआपच कळू लागतील.

हरी हरी

ऋन्मेषचा धागा अधोगतीला लागला.
>>>>>>>>>>

अश्यावेळी मी एक दिर्घ श्वास घेतो..

.

.

..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

आणि पुढच्या धाग्याच्या तयारीला लागतो Happy

अरे इतकाही निकराचा दीर्घ श्वास घेऊ नकोस. ऑनलाईन टाईमपास चालू आहे हा. खाजगीत सार्‍यांचं सारं वेगळं असतं. Proud

लिंब्या, किती ते अनुल्लेखावरून बोंबलणं. अनुल्लेख मनावर घेण्याइतका ऑनलाईन नाजूक राहिलायंस का तू?! Proud तुझं माझं एकदा शेकडो वर्षांपुर्वी जंगी कडाक्याचं भांडण झालेलं तो बारकुस्सा काळ सोडला तर मी तरी तुझा अनुल्लेख कधी केल्याचं आठवत नाही. ते अनुल्लेख म्हणजे फारच फारच पांचट झालंय- ते वरती बेफिकिरनी म्हणलेलं अगदी बरोबर.

>>ती व्यक्ती आंबटशौकीन नाही हे ठामपणे सांगू शकतो.>> हे प्रत्यक्ष संपर्कामुळे तुम्हाला माहित आहे पण तुम्ही जे विधान कोट केले ते वाचल्यावर कुणीही आंबटशौकिन कॉमेंट असाच निष्कर्ष काढेल.

>>
तिने फक्त या असल्या थेरांपायी कुणाची सोय होईल हे दाखवून दिलं आणि हल्ल्याचे लक्ष बदलले
>>
ते तसे दाखवायचे असेल तर स्पष्ट शब्दात सांगता येते की. चुकीचा टोन्/शब्द वापरल्यावर शाब्दीक हल्ला होणारच ना! बाकी सपोर्ट देणारे खरेखुरे तत्व म्हणून सपोर्ट देत आहेत की आंबटशौक म्हणून असा प्रश्न तेव्हाही उपस्थित झाला होताच. आणि सपोर्ट द्यायला कुटुंबियांसह या असे आवाहनही केले गेले होते. त्यात काही नवे नाही पण ' आधीच जागा धरुन ठेवायला' हे शब्द काय दर्शवतात?

ते तसे दाखवायचे असेल तर स्पष्ट शब्दात सांगता येते की. >>> तसे क्षीण प्रयत्न झालेच असतील ना ? Proud
तो झोडपण्याचा ज्वर इतका उन्मादी असतो की ...

>>काय होतं की इथे असताना सणवार करणारे, इतरांसारखीच मतं असणारे जरा म्हणून पोटापाण्यासाठी देशाटन करून गेले की आपण किती चुकीचे होतो, आहोत याचे साक्षात्कार तिथे होऊ लागतात. बरं, तिथल्या वातावरणात जुळवून घेण्यावाचून गत्यंतरही नसते. यातले काही जण भारतात परतल्यानंतर पुन्हा पूर्वीसारखे होताना पाहीलेले आहेत. काही बदललेल्या स्टेटमधेच राहतात. त्यांचं डिफ्युजन पुन्हा होत नाही. काहिंच्या मतांचं पुन्हा पुन्हा रिसायकलींग होत राहतं. हे परिस्थितीजन्य असू शकतं. असे लोक त्या त्या परिस्थितीत असताना आपल्या आधिच्या अवस्थेला हसणे अशक्य असल्याने त्या अवस्थेत असणा-या देशी लोकांना हास्यास्पद ठरवत असतात<<

आय्ला हे सॉलिड आहे. नो वन कॅन टॉप धिस.... Happy

आंग्रे,
तुम्ही इथे जेवढे लिहिले त्याला अनुसरुन मी प्रतिक्रिया देवू शकते. बाकी काय काय बोलणे झाले, झोडपण्याचा ज्वर, उन्माद वगैरे बघायला तिथे मी नव्हते सो माझा पास.

हे ही बरोबरच. पण झोडपण्याचा अनुभव सर्वत्र समानच असल्याने अनुभूती सर्वांनाच असू शकते.

बाकी, तुमच्या प्रश्नातच उत्तरे दडलेली असल्याने आवरतं घेतलं.

या कार्यक्रमात सामील असलेला कोणी राजीव मसंद म्हणून नुकताच सेन्सॉर बोर्डावर नियुक्त झालेला पदाधिकारी होता असे मी नुकतेच एके ठिकाणी वाचले.

खरे आहे का?

खरे असल्यास हसावे की रडावे कोणी सांगेल का?

रडा Proud

डीजे Lol

चैतन्य आंग्रे | 6 February, 2015 - 08:27
हे ही बरोबरच. पण झोडपण्याचा अनुभव सर्वत्र समानच असल्याने अनुभूती सर्वांनाच असू शकते.
बाकी, तुमच्या प्रश्नातच उत्तरे दडलेली असल्याने आवरतं घेतलं.

>>

मित्र चैतन्य आपण चेसुगु चे कर-डोळे अहात का?
(कर्-डोळे = डु आय, मराठीतुन लिहायचा माझा प्रयत्न)

Pages