परकी परकी वाटत जाते

Submitted by सुप्रिया जाधव. on 30 January, 2015 - 03:27

जसे स्वत:ला गाठत जाते
परकी परकी वाटत जाते

शिवण घालते परिस्थितीला
तितकी तितकी फाटत जाते

कोणाला मी नकोनकोशी
कोणी नाते सांगत जातेे

जो जो अंतर मिटवत जावे
तो तो अंतर वाढत जाते

वरकरणी मन स्वच्छ नभासम
आत आतवर दाटत जाते

अधीर होउन मृत्यू येतो
जीवन धापा टाकत जाते

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय. फारच पटली. रिलेट झाली.
इतक्या सोप्यात मनाची घालमेल व्यवस्थित पोहोचली.

जसे स्वत:ला गाठत जाते
परकी परकी वाटत जाते

शिवण घालते परिस्थितीला
तितकी तितकी फाटत जाते

अधीर होउन मृत्यू येतो
जीवन धापा टाकत जाते<<< सुंदर शेर! मतला फारच सुरेख! सुलभ शब्दरचना! 'तितकी तितकी' मधील एका 'तितकी' ऐवजी इतर काही अधिक अर्थ आणणारा शब्द घेता आला तर पाहावेत.

गझल आवडली.

संपूर्ण गझल छानच..

जसे स्वत:ला गाठत जाते
परकी परकी वाटत जाते

शिवण घालते परिस्थितीला
तितकी तितकी फाटत जाते

वरकरणी मन स्वच्छ नभासम
आत आतवर दाटत जाते

अधीर होउन मृत्यू येतो
जीवन धापा टाकत जाते

विशेष आवडले हे शेर. Happy

निवडक १० त घेतलीये,पण प्रतिसाद द्यायचा राहूनच गेलाय!

अप्रतिम,अप्रतिम गझल! सहज,सखोल!