पुढे एक पाऊल मी टाकतो

Submitted by जयदीप. on 29 January, 2015 - 10:49

पुढे एक पाऊल मी टाकतो
किती दूर आलोय ते पाहतो

तुझा रंग बनणार ओळख तुझी..
उजेडात जर वेगळा वाटतो

समुद्रास त्यांनी कुठे पाहिले?
नदीलाच जो तो झरा पाहतो

नको गात जाऊस गाणे तुझे
तुला फार ओला घसा लागतो

नकाशात पाहून पोचू तिथे
विचारून तर नेहमी पोचतो

-जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अहे गझल .आवडली .

एक सहज सुचलेला मुद्दा ... म्हणजे अगदी लक्षच नाही दिले तरी चालावे असा ... काफिये जरा अधिक बांधीव करता आले तर पहाल का ? 'पोचतो' हा काफिया त्याच्यातिल प वरील ओ ह्या स्वरामुळे जरा ढिला वाटला मला बाकी जागी अलामत असलेल्या अक्षराच्या आ धीच्या अक्षरातही आ अस स्वर पाळला गेला आहे .अर्थात अश्या गोष्टी मीही प्रत्येकच वेळी पाळतो असे नाहीच पण तुम्हाला सांगून पहावेसे वाटले म्हणून बोललो
चू भू द्या घ्या

धन्यवाद