स्पार्टाकस यांच्या ट्रॅप मधला कॅप्टन एम कोण आहे?

Submitted by रिमा on 29 January, 2015 - 03:38

स्पार्टाकस यांची ट्रॅप ही कादंबरी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे.
(असा माझा आपला एक अंदाज आहे!)

या कादंबरीतील एक गूढ कॅरेक्टर आहे कॅप्टन एम!

मिलीटारी इंटेलिजन्सचा अधिकारी असलेला कॅप्टन एम हा नेमका कोण असावा असं तुम्हाला वाटतं?

मायबोलीवर मी नवीन असल्याने आणि वाचत असलेली ही पहिलीच कादंबरी असल्याने पूर्वी कधी असे धागे निघाले होते का माहीत नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिमा,

बापरे, सहीच की.....
मी काही वर्ष आहे मा.बो. वर, वेग-वेगळ्या विषयांवर अगदी लेखकांच्या कथानकांवर ही इथे धागे येवुन गेले आहेत. पण अश्या प्रकारे एखाद्या स्पेसिफिक कॅरेक्टर वर धागा निघण्याची ही पहिलीच वेळ असावी !!!!!! Happy
चु. भु. दे. घे.
स्पार्टा भाउ, कळले ना तुम्हाला की आम्ही तुमच्या लेखनाचे कसे पंखे झालो आहोते ते Wink
माझ्या मते कॅ. एम = आदित्य पाठक

हे फक्त स्पार्टाभाऊच अचुक सांगु शकतील, तरीही कॅप्टन एम हा आदित्य पाठक असण्याचीच शक्यता जास्त आहे.

कॅप्टन एम हा आदित्य असावा असे मलाही वाटते पण एक मोठी शंका ही आहे की हा कॅप्टन खुप मुरलेला, अनुभवी व्.व. आहे असे त्याचे चित्र उभे करण्यात आले आहे. असा मुरलेला, अनुभवी असलेला माणुस वयाने कमीत कमी मिडल एजेड तरी असणार. त्यामानाने आदित्य खुपच लहान आहे हेमावैम.

रिमा,

Namaskar.jpg

रिमा, माझं वैयक्तिक मत सांगतो. कृपया असे धागे काढु नका. माझ्यासारख्ज्या बर्‍याच वाचकांना गुढ शेवटपर्यंत टिकलेलं आवडतं आणि अशा चर्चांमुळे जाम रसभंग होतो. अर्थात असा धागा निघावा आणि वाचकांनी चर्चा करावी हे स्पार्टाकस ह्यांच्या लिखाणाचे यश आहे. पण अशा चर्चांमुळे त्यांनाही लिहिताना परत परत विचार करावा लागत असेल किंवा बदल करावे लागत असतील असं मला वाटतं.
हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ह्या धाग्यावरील चर्चा मी वाचलेली नाही कारण मला त्यात रस नाही.

it is definitely aditya pathak.. as he is out of story from caption m's actual mission started...

>>कृपया असे धागे काढु नका. माझ्यासारख्ज्या बर्‍याच वाचकांना गुढ शेवटपर्यंत टिकलेलं आवडतं आणि अशा चर्चांमुळे जाम रसभंग होतो>> +१

>>कृपया असे धागे काढु नका. माझ्यासारख्ज्या बर्‍याच वाचकांना गुढ शेवटपर्यंत टिकलेलं आवडतं आणि अशा चर्चांमुळे जाम रसभंग होतो>> +१०००
त्याचं बरोबर लेखकाला कथेची उत्कंठा देखील शेवटपर्यंत टिकवून ठेवणे जडं जाईल.
स्पार्टाकस यांच्या लिखाणावरून ते यासाठी किती कष्ट घेत असतील याचा अंदाज येतोच.
कदाचित यासाठी ते पात्रं त्यांना बदलावं लागेलं.
चौकट राजा >> पूर्णपणे सहमत

तलाश रिलीज झाल्यावर कुणी व्रात्य मित्राने फेबु वर नुसते एवढच स्टेट्स लावले - करीना भूत असते. तस करू नका कुणी म्हणजे झाल, मी अजून भाग ३ वाचत आहे.

Ata matr kadambari vachalich pahije .... Itak sagal ... Itake jan yabaddal bolat aahet mhanaje nakkich great asnar ... Pn mi eka veli ekach katha vachane pasnd krto tyamule ata chalu asleli varasa sampalyashivay nahi vachu shakat pn hyanantar tich asel ... Sparta. U r great. Mi baki kahi katha vachalya aahet mast hotya tya...

सी, इथे पण कॅप्ट्न एम भूत असतो म्हणून तर तो इतके वेशांतर करू शकतो आणि तरिही त्याला कोणी आय डी विचारत नाही. डायरेक्ट अ‍ॅक्सेस कुठेही कुठल्याही वेशात Proud

कॅप्टन एम हा कॅप्टन एम राहिल.
आदित्य पाठक हा जिवन्त आहे. तो प्रितिकाला बाहेरुन मदत करतो आहे.
आदित्य पाठकचा आनि कॅप्टन एम चा काहिहि सम्बन्द नाहि. बघु काय होते ते...

आदित्याला नितिनने काँटक्ट केला आणि सिक्रेट कागद त्याच्याकरवी तिबेटमधुन आणवले. आदित्य नॉर्थ कोलवरुन पडला पण शेवटच्या क्षणी त्याची आइस अ‍ॅक्स एकदाची आली हातात आणि तो स्वतःला हवे तिथे सुखरुप थांबवु शकला. त्या खालच्या क्रेवाईसमध्ये तो त्याच्या इतर टिमची वाट पाहात थांबला. ते सगळे मग एकत्र पुढे गेले. आदित्य त्यानंतर कुठे लपुन बसला माहित नाही. तो कॅप्टन एम असण्याची शक्यता मला तरी खुप कमी वाटतेय पण जर आदित्य मिलिटरीसाठी इतके करु शकत असेल तर मग तो कॅ. एमही बनत असेल, आपल्याला आता थोडेच कळणार ते? Happy