क्रोशाचा बेबी फ्रॉक

Submitted by मीन्वा on 13 January, 2009 - 01:57

आमच्या शेजारच्या घरात छोट्या बाळाचे आगमन झाले. तिच्यासाठी मी केलेला बेबी फ्रॉक (नसत्या शंका येण्याआधीच त्याचे निरसन करत आहे.). सध्या हस्तकलांकडेच कल आहे. Happy

IMG_0384.jpg

लागलेला वेळ : अंदाजे तीन तास.

गुलमोहर: 

खुपच गोड आहे फ्रॉक. बेबी पिंक कलर खुपच मस्त, माझ्या आवडीचा कलर अगदी.

आईगगं.. किती गोड झालाय... मला शिकव प्लीज!
(मीनु तू (कवितांपेक्षा) हस्तकलाच करत जा गं :फिदी:)
------------------------------------------
चहाची वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो! Proud

मीनू, एकदम मस्त दिसतोय गं हा फ्रॉक!
३ तासांत केलास सगळा? ग्रेट!

तिन तास???

माझ्याही शेजारी एक ३ महिन्याची बेबी आलीय.. रविवारी प्रयत्न करते.. पण तिन तास अशक्य वाटतात....
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

साधना अगं हा खूपच लहान आहे. पंधरा दिवसाच्या मुलीला केलाय त्यामुळे इतक्या कमी वेळात झालाय.
पूनम भा. पो. Happy
सगळ्यांनाच धन्यवाद!
~~~~~~~~~

मीनू..... फारच क्युट दिसतोय गं........रंग पण मस्तच !!
बाकी शंका निरसन..... जाऊ दे Wink

फारच सुन्दर!!!!
पुणे मधे कोथरुड भागामधे क्रोशा चे क्लासेस घेणारं कुणी माहिती आहे का कुणाला? असा काहितरि शिकायला आवडेल :):)

अरुंधती, क्रोशावर बाजारात कितीतरी पुस्तके आहेत, मराठी आणि इंग्रजीत.. प्रतिभा काळ्यांचं आहे ते एकदम सोप्प आहे समजायला...
मिनु, माझ्याकडे ५-६ महिन्यापासुन बेबीवुलचे दोन गुंडे पडुन आहेत. रविवारी बघते जमतं का? ३ महिन्याची बेबी म्हणजे कमीतकमी ३ दिवसात व्हायला पाहिजे.

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

अरुंधती माझ्या नवर्‍याची आत्त्या एक्सपर्ट आहे. त्या घेतील क्लास प्रतिज्ञा हॉलसमोर राहतात त्या.
ऍशबेबी अगं तुला क्रोशाची आणि विणकामाची चांगली पुस्तकं कुठली आहेत ते माहीत असेल तर लिही ना गं.

मी असं ऐकलं की फक्त इम्पोर्टेड पुस्तकंच चांगली आहेत वगैरे.
~~~~~~~~~

मी बराच वेळ ह्या थ्रेडचे फक्त हेडिंग बघत होतो.. मला वाटलं की 'क्रोशा' नावाच्या मुलीचा फ्रॉक आहे.. Happy कुणाच्या मुलीचे नाव क्रोशा आहे ते बघायला आलो इथे Proud

मीनु,
सही झालाय ग फ्रॉक....फक्त ३ तासात्..म्हणजे तुझा हात चांगलाच बसला आहे...
मी प्रेग्नंट असताना अश्या कलांकडे(एन्ब्रायडरी, सॉफ्ट टॉईस वगेरै )वळले होते....पण क्रोशा पासुन ४ हात लांब राहिले..खुप अवघड नि गुंतागुंती चे वाटते मला....
नेट वर काही हेल्प, इथे(युस मध्ये) तशी काही बुक्स मिळत असतील तर मला सांगा ना, क्रोशा नि माझ्या मधले मिटवावं असे वाटत आहे....मीनु नं केलेला फ्रॉक बघुन....:)

टण्या, Biggrin
मीने, मस्तच जम्या गो

मीनू, मस्त झालाय!
(कविता हाताने लिहित नाहीस का?) Proud

टण्या, कठीण आहेस! Lol

कस्सला गोड आहे! Sad
मीने, असले मोठ्यांचे करता येतील का? Proud

सहीये मीने. मग, मोठ्या माणसांसाठी असं काही विणायचं असेल तर किती वेळ लागतो?

छोटासा फ्रॉक क्यूटच आहे. बेबी पिंक कलरने तर आणखीनच खुलून दिसतोय. लहान मुलींना हा रंग दिसतोही छान.
बा टण्या, Proud हद्द झाली तुझी.

अरेच्चा खुप सगळ्यांना आवडलाय हे पाहून छान वाटलं. धन्यवाद. Happy
टण्या धन्य आहेस. Lol
स्वाती Proud (आता पूनमचा सल्ला ऐकायचं ठरवलंय गं)
लाले येईल गं मोठ्यांचा पण करता. तू घालणार असशील तर देते करुन.
भाग्या विणायला किती वेळ लागतो ते साईज आणि करणार्‍याचा हात किती बसलाय त्याप्रमाणे ठरेल. फक्त क्रोशाचं विणकाम दोन सुयांवरच्या कामापेक्षा खुप चटचट होतं.
दिपाली पुस्तकं बरीच आहेत. मी वापरली नाहीयेत पण. नेटवरही खूप माहीती मिळेल. पुस्तक चांगलं कोणतं ते चौकशी करुन सांगते.
~~~~~~~~~

पुण्यात औंध भागात क्रोशा चे क्लासेस घेणारं कुणी माहिती आहे का कुणाला?

मस्तच झालाय हा फ्रॉक.
तीन तासात केलास म्हणजे चांगला हात बसलेला दिसतोय तुझा.

ए कसला गोड झालाय ग!

एक सल्ला देऊ का(फुकटचा म्हण हवे तर ;)) लगेच विण कुठली किती टाके घेतले वगैरे लिहिले तर करणार्‍याला बरे पडते Happy

~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

खुपच क्युट दिसतोय फ्रॉक! Happy

क्रोशे मध्ये टाके आणि वीण पण असते?

मीनु,
फ्रॉक खूपच क्युट आहे. तसे पण मुलींना हे रंग खूपच छान दिसतात. Happy

दीपाली,
इथे US मध्ये michael दुकान तिथे गेले की पाहीजे ते मिळेल ह्याच्या संबधीत.
classes ची माहीती मला पण इथूनच मिळाली. नाहीतर एक ऑनलाईन साईट आहे. नाव लक्षात नाही पण खूप ईझी सांगीतलेय त्यात. आठवले तर लिहिते इथे.

मला तर फुकटात मिळाले शिकायल ही गोष्ट वेगळी. Happy

मनु, ए, आठवं आणि सांग ना..थोडा ताण दे डोक्याला..:)
भारी च आहे कि, फुकटात शिकायला मिळाले म्हणजे...
BTW मायबोली वर दिसली नाही बरेच दिवस!!!

खूप गोssssssssड दिसतोय फ्रॉक! लालू म्हणते तसं घालावासा वाटतोय!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

Pages