कोनफळाची खीर

Submitted by दिनेश. on 26 January, 2015 - 04:03
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
लोकसत्ताचे पत्रकार श्रीनिवास गडकरी यांचे रानभाज्या या नावाचे संकलन.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोनफळ माझा वीकपॉईंट. साधारण ऑक्टोबर महिन्यात मी ४-५ किलो स्टॉक आणून ठेवतो. जेव्हा वाटेल, तेव्हा कापा आणि उकडून फस्त करा. असा विकांती कार्यक्रम करतो.

आज पुन्हा आईला आणायला सांगतो.

कोनफळ प्रथमच पाहिलं! कोनफळी रंग ऐकून माहीत होता. पा कृ आणि फोटो नेहेमीप्रमाणेच मस्त!
तुमच्या पोतडीतून तुम्ही दरवेळी काही अफलातून बाहेर काढता आणि आम्ही आश्चर्याने बघतो!!.........:स्मित:

चक्क गराडू ची खीर??? ___/\___ वॉव, मस्त रंग आलाय
इंदौर, रतलाम कडे खूपदा खाल्लेत गराडू चे काप तळून, वरून त्या भागात मिळत असलेला गराडू मसाला भुरभुरून... Happy

आभार सर्वांचे.. मामीने परवा इंदौरचा फोटो टाकला होता त्यावरूनच हे आठवले.
आपल्याकडे अजून एवढा वापर नाही याचा, मी लागवड करायला म्हणून दोन कंद घेऊन आलो होतो इथे.

साधारण ऑक्टोबर महिन्यात मी ४-५ किलो स्टॉक आणून ठेवतो>>>>>>> खराब नाही का होत? कारण सुरण आणून फ्रीजबाहेर ठेवला ५-६ दिवस, तर वाळतो आणि फ्रीजमधे जास्त दिवस झाले तरी खराब होतो हा स्वानुभव.

इथे सिंगापुरमधे विविध प्रकारचे कंद मिळतात पण त्यांची नावे माहिती नाही. कोनफळ इथेही मिळत असावे. तुम्ही जर फोटोशेजारी एखादी दुसरी वस्तू ठेवली असती तर कोनफळाचा आकार किती मोठ असतो हे समजले असते.

मस्त आहे कृती. इथे चायनीज डीझर्ट मधे अशाच खिरी खायला मिळतात. त्यात नारळाचे दुध घालतात. चव अजून छान येते ना. दु. ने.

>>कोनफळ प्रथमच पाहिलं! << अगदी अगदी...आणि त्याची खीर हे म्हणजे फारच भारी दिसतयं. पूण्याला मिळतं काय मंडळी हे गराडु प्रकरण....आमच्या नागपुरात आढळले नाहीये...बादवे दिनेश दा, ह्याची बीटासारखी कोशींबीर होउ शकेल काय ? Wink

मी प्रथमच पहातेय हे. रंग सुंदर आहे. खीर छानच लागत असेल. Happy
तुमच्या पोतडीतून तुम्ही दरवेळी काही अफलातून बाहेर काढता आणि आम्ही आश्चर्याने बघतो!!.........स्मित>>>>>>>+१ . शांकली, त्यांना छंदच लागलाय हा. Lol

बी, सिंगापूरला नक्की मिळत असेल. फिलिपीन्समधेही हि खीर आवडीने खातात. आकार मोठ्या बटाट्याएवढा असतो. पण मोठाही असू शकतो. जांभळे बटाटे वेगळे, जांभळी रताळी वेगळी आणि हे वेगळे.

प्रसन्न, हे शिजवूनच खावे लागते. कच्चे नाही खाता येणार. शिजवल्यावर अर्थात काहिही प्रकार होऊ शकतो.

बी, नक्की टाक. मी बालीला जांभळ्या बटाट्याचे चिप्स खाल्ले होते.. पण तो प्रकार वेगळा.

सई, पुण्यात नक्की मिळणार. माझ्या आईच्या आठवणीप्रमाणे मलकापूरला पण लागवड होत असे. त्यावेळी त्याला गराडू असाच शब्द वापरत असत.

दिनेशदा, मस्त आणि सोप्पी रेसिपी आहे. गोड आवडत असल्याने नक्की करणार.
देवकी, कंद उघडेच बाहेर ठेवायचे खराब नाही होत. मी मागच्या महिन्यात आणलेला कंद अजून आहे. सुरणसुद्धा आई बाहेरच ठेवते. प्लास्टिकच्या पिशवीत नाही ठेवायच.
सई, गुजराती वस्ती जिथे आहे त्या एरीआतील भाजीवाल्यांकडे नक्कीच मिळेल. सोबत सुरती पापडी मिळाली तर उंधीयोचा बेत कर. Happy

दिनेशदा, मस्त रेसिपी . मी याची कापं करते. तूपात शॅलो फ्राय करून वरून मीठ आणि मसाला भुरभुरते. मस्त लागतात. आता खीर ही करून बघेन. धन्यवाद.

मी याची कापं करते. तूपात शॅलो फ्राय करून वरून मीठ आणि मसाला भुरभुरते >> मलाही हा एकच प्रकार माहीत होता , उन्धियो वगळता . माहेरी कधी खाल्ला नाही . सासरी साबानी चटक लावली , आता आवडीने खाते .

खीर आवडत नाही ..त्यामुळे माझा पास ! . पण दिनेश्दा खिरीचा रंग सुन्दर आहे .

Pages