उत्कंठावर्धक 'बेबी'

Submitted by उडन खटोला on 25 January, 2015 - 03:54

'बेबी'हा सिनेमा २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला ,तो काल पाहिला .

'अ वेडनस्डे' आणि 'स्पेशल २६ 'सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांचा 'बेबी'हा जबरदस्त चित्रपट आहे . 'बेबी' हे एक अंडरकव्हर युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे.

या युनिटचा मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्‍या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी प्रयतत्नशील आहे .

सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त भर देण्यात आला असून यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे.

अजय सिंह राजपूत आणि टीम मौलाना मोहम्मद रहमानद्वारा पसरल्या जाणार्‍या आतंकाला संपवण्यासाठी नेपाळ आणि सौदी पर्यंत धडक मारतात. चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून क्लायमॅक्स खरोखरच ब्लडप्रेशर वाढवणारा आहे ! सर्वानी जरूर बघावा. पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .

बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्रीज लि., ए फ्रायडे फिल्मवर्क्स, क्राउचिंग टायगर मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स
दिग्दर्शक : नीरज पांडे
संगीत : मीत ब्रदर्स
कलाकार : अक्षय कुमार, तापसी पन्नू, राणा दग्गुबाती, अनुपम खेर, डॅनी, केके मेनन, मधुरिमा टुली, रशीद नाज, सुशांत सिंह
सेंसर सर्टिफिकेट : यूए *
रेटिंग : ४/५

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशफाकचे काम कोणी केले आहे. तो ही एकदम सलोना गोड दिसतो >>> खरच मस्त आहे तो. मला आणि लेकीला दोघींनाही आवडला स्मित लेकीच्या बापाला अर्थातच नाही डोळा मारा

अवांतर - सिनेमा बघताना स्पार्टाच्या ट्रॅपची आठवण आली. खरच त्यावरपण मस्त सिनेमा होईल.
>>>

तो अश्फाक ब्रिट-पाकी आहे . अ‍ॅक्टर आणि मॉडेल , अर्थातच गूगलून बघितल Happy
मला पण ट्रॅपसाठी नीरज पाण्डे आठवला .

सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त भर देण्यात आला असून यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे.>>>>>>>हा डायलॉग डॅनी डेंझोप्पा साहेबांच्या तोंडून ऐकताना खरच भारी वाटला. एक त्या मौलानाच्या तोंडचा पण डायलॉग माझ्यावर पैसे लावण्यापेक्षा तुमच्या देशातील लोकांवर खर्च करा (मुसलमानाच्या प्रगतीसाठी)

एक त्या मौलानाच्या तोंडचा पण डायलॉग माझ्यावर पैसे लावण्यापेक्षा तुमच्या देशातील लोकांवर खर्च करा

...

आँ ! मग बापूजी काय बोल्ले होते ? हेच ना ?

बिलालला गोळ्या घातल्या तेव्हाच कळाले ना सायलेन्सर बसवलाय ते. चित्रपटाचा हा सगळा भाग प्रचंड उत्कंठावर्धक झालाय, तरी ते सोडुन इथल्या आयडींचे लक्ष दुसरीकडे कसे गेले देव जाणे Happy

मस्त पिक्चर आहे. जबरी खिळवून ठेवतो. एक दोन सरप्राइझेस जबरी आहेत. शेवटचा सौदी ऑफिसर चा सीन ताणल्यामुळे लक्षात आले काय होणार आहे पुढे. पण तो सुशांत सिंग हॉटेल च्या खोलीत येतो व ती अक्षय कुमार बरोबरची मुलगी बाहेर येते, त्यानंतर चा सीन हा जबरी सरप्राइज होते. अक्षय कुमार चा "दार लावून झापड", मुरली शर्मा-डॅनी चे फोन वाले सीन्स जबरी आहेत.

मस्त सिनेमा!
मोहम्मद रहमान ची भुमिका केलेला पाकिस्तानी नट बरा तयार झाला ही भुमिका करायला... अगदी 'नैसर्गिक' (;)) अभिनय केलाय त्याने.

Pages