उत्कंठावर्धक 'बेबी'

Submitted by उडन खटोला on 25 January, 2015 - 03:54

'बेबी'हा सिनेमा २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला ,तो काल पाहिला .

'अ वेडनस्डे' आणि 'स्पेशल २६ 'सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांचा 'बेबी'हा जबरदस्त चित्रपट आहे . 'बेबी' हे एक अंडरकव्हर युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे.

या युनिटचा मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्‍या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी प्रयतत्नशील आहे .

सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त भर देण्यात आला असून यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे.

अजय सिंह राजपूत आणि टीम मौलाना मोहम्मद रहमानद्वारा पसरल्या जाणार्‍या आतंकाला संपवण्यासाठी नेपाळ आणि सौदी पर्यंत धडक मारतात. चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून क्लायमॅक्स खरोखरच ब्लडप्रेशर वाढवणारा आहे ! सर्वानी जरूर बघावा. पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .

बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्रीज लि., ए फ्रायडे फिल्मवर्क्स, क्राउचिंग टायगर मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स
दिग्दर्शक : नीरज पांडे
संगीत : मीत ब्रदर्स
कलाकार : अक्षय कुमार, तापसी पन्नू, राणा दग्गुबाती, अनुपम खेर, डॅनी, केके मेनन, मधुरिमा टुली, रशीद नाज, सुशांत सिंह
सेंसर सर्टिफिकेट : यूए *
रेटिंग : ४/५

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ वेडनस्डे आणि स्पेशल २६ मुळे खूप अपेक्षा उंचावल्या होत्या. पण खरोखर अपेक्षाभंग झाला. काही सीन्स खूपच फिल्मी वाटले. बिलालला सोडवायचा प्रसंग पोरकट आणि फिल्मी वाटला.
काही काही ठिकाणी सीन खूप खेचले आहेत. डॉक्टर वॉशरूम मधे जातात आणि अक्षय कुमार लपलेला असतो तो प्रसंग , शेवटी पोलीस टेक ऑफ ची परमिशन देताना खूप मोठा पॉझ घेतात तो प्रसंग.
के. के. मेनन ला काहीच स्कोप नाही. फुकट घालवला आहे त्याला. अनुपम खेर ला उगाच घेतले आहे असे वाटले .
बाकी डॅनी अक्षय कुमार मस्तच.
अगदीच न बघण्यासारखा नाही पण 'नीरज पांडे' चा सिनेमा म्हणून गेल्यास अपेक्षाभंग .

बिलालला सोडवायचा प्रसंग पोरकट आणि फिल्मी वाटला.>> तो तसा नाही. पोलिसांनी रिस्पॉन्स दिला आहे तो दाखवला आहे. त्यांनी भारतीय परिस्थितीत काय होउ शकते ते दाखवले आहे. हॉलिवूड पट किंवा रोहित शेट्टी टाइप सेट पीस मारामारी नाही दाखवली.

डॉक्टर वॉशरूम मधे जातात आणि अक्षय कुमार लपलेला असतो तो प्रसंग >> तो मुद्दाम पेशन्स ताणण्यासाठीच घातला आहे.

, शेवटी पोलीस टेक ऑफ ची परमिशन देताना खूप मोठा पॉझ घेतात तो प्रसंग>> तसे पाहिले तर सेकंदामध्येच आहे तो पॉज आणि पाहिलेत तर त्या आतंकवाद्यावर अमेरिकेने पण बाउंटी जाहीर केली आहे. त्या पेपर्स ना बॅक ग्राउंड मध्ये दाखविले आहे तो विचार करूनच पोलीस अ‍ॅक्क्षन घेतात.

के. के. मेनन ला काहीच स्कोप नाही. फुकट घालवला आहे त्याला. अनुपम खेर ला उगाच घेतले आहे असे वाटले .>> अचूक नेमकी रचना केली आहे. अनुपम स्पेशल २६ मध्ये पण आहे. टीम मेंबर. केके मेननच्या व्यक्तिरेखेला काही स्कोप मिळू नये हाच तर महत्त्वाचा पॉईंट आहे नाही का सिनेमाचा. मला तर एक सुटल्याचं फीलिंग आलं. त्याचं काम संपल्यावर.

अमा पेशन्स ताणण्यासाठी ठीक आहे पण दॅट ईज नॉट निरज पांडे स्टाईल. आणि तो प्रसंग बघताना डॉक्टर त्याला बघणार नाहीत हे आपल्याला पक्क माहीत असतं. तसच शेवटच्या प्रसंगात ऑफीसर टेक ऑफ ची परमिशन देणार हे ही आपल्याला माहीत असते. खूप जास्त प्रेडिक्टेबल.
आठवा वेडनस्डे आणि स्पेशल २६. स्पेशल २६ पहिल्यांदा बघताना एकावर एक धक्के बसत जातात.

छान चित्रपट, सर्वांनी पहावा असाच.

वर लिहल्याप्रमाणे काही प्रसंग अगदिच बालिश दाखविलेत, जसे 'बिलाल' ह्या दहशतवाद्याला पोलिसांच्या कैदेतुन सोडविण्याचा प्रसंग. सुशांत सिंगलाही अतिरेक्याचा रोल देऊन वाया घालवलेय, अनुपम खेर ऐवजी तो रोल सुशांत सिंगने छान केला असता. वै.म.

खूप अतिरंजित चित्रणाची सवय झाल्यामुळे साधे प्रसंग बघायला जरा बोअरिन्ग वाट्ते असे प्रेक्षकांचे झाले असेल. मला तरी दिग्दर्शकाच्या ओपन नेसचे कौतूक वाटले.

.

बेबी एकदम मस्त.. खुप आवडला.

शेवटचा अर्धा तास अक्षरक्षः श्वास रोखुन पाहिला. शेवटी कोण जिंकणार हे माहित असुनही धडधड वाढली Happy

शेवट जरी फिल्मी असला तरी आवडला. एका कर्तव्यदक्ष अधिका-याने दुस-या तितक्याच कर्तव्यदक्ष अधिका-याला केलेला सलाम वाटला.

तापसीची फाईट लै भारी. गाडीतुन परतताना खरे तर तिची वाट लागलेली असते पण तरीही चेह-यावर भाव मात्र आपण किती भारावुन गेलोत याचेच.

अनुपम खेरच्या जागी दुसरा कोणी चाललाही असता. तोही अर्थात चाललाच. काही बिघडले नाही.

फालतू षिनेमा आहे.

पाकिस्तान आणि मुस्लिम विरोधी चार ओळी असल्याने लब्बाड सॅफ्रॉनवाले उगाच वरडत आहेत भारी आहे असे म्हणुन.

पीकॅ ने सालटी सोलून निघाल्याने जळजळ थंड पडायला काहीतरी हवे म्हणुन बेबी मस्त मस्त असे ओरडत आहेत.

Proud

सगळेच प्रसंग फालतू आणि फिल्मी आहेत.

तो धर्म भारतीय लिहितो वगैरे जुगलबंदी तर लैच पोरकट आहे... आपला धर्म भारतीय असे कुणी हिंदुत्ववादी लिहिल असे वाटत नाही.

Proud

'आय' षिनेमा थेट्रात सिंगल स्क्रिनवर पन्नास रुपडे मोजुन पाहिला. तो मस्त आहे.

बेबी पाहिला. आवडला.

शेवटचा अर्धा तास अक्षरक्षः श्वास रोखुन पाहिला. >>+१

काही काही मिसिंग लिंक्स आहेत. उदा. मोहम्मद रहमान त्या हॉटेल रूमच्या साइड टेबलवर पाण्याची बाटली ठेवून आत जाऊन लपतो. नंतर अक्षय कुमार त्याच बाटलीतले पाणी पितो, हे दाखवण्यामागचे प्रयोजन कळले नाही, निदान मला तरी. असे वाटत होते की त्या पाण्यात काही विष वगैरे असावे आणि अक्षय कुमार मिशन कम्प्लिट करुन मरतोय की काय.... पण नाही असे काहीच घडले नाही.

तरी एकंदर चित्रपट चांगला वाटला.

काही काही मिसिंग लिंक्स आहेत. उदा. मोहम्मद रहमान त्या हॉटेल रूमच्या साइड टेबलवर पाण्याची बाटली ठेवून आत जाऊन लपतो. नंतर अक्षय कुमार त्याच बाटलीतले पाणी पितो, हे दाखवण्यामागचे प्रयोजन कळले नाही, निदान मला तरी. असे वाटत होते की त्या पाण्यात काही विष वगैरे असावे आणि अक्षय कुमार मिशन कम्प्लिट करुन मरतोय की काय.... पण नाही असे काहीच घडले नाही.>>> सेम पिंच. मलाही असेच वाटले होते.

बेबी एक फालतू सिनेमा आहे.

नेपाळच्या होटलात बाईनी सलवार घालून केलेली फाईटींग तर फालतूपणाचा कळस आहे.

अक्षयच्या बायकोचे एकूण हावभाव आणि "तुम मरना नही" वगैरे डायलॉग एका शिपायाच्या बायकोला न शोभणारे आहेत.

सौदीत जाऊन केलेला वध आणि मौलानाला पळवून आणणारा संपूर्ण कार्यक्रम फुल्ल फेकू आहे.

बेबी हा सिनेमा खास 'भगव्यांसाठी' केलेली निर्मीती आहे!

अक्षय कुमार त्याच बाटलीतले पाणी पितो,

...

सर्वधर्म समभावाचा संदेश आहे.

एकाच बाटलीतील पाणी घोट घोट प्या. सगळे वाटुन ख्या प्या.

असा तो संदेश आहे.

Proud

१ वेळ पाहण्यासारखा आहे...

वेन्सडे
स्पेशल २६
बेबी
.
.
.
दर्जा असाच उतरता आहे

<<<पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .>>> +१०००
बिलाल ला सोडविण्याचा सीन सोडला तर बाकीचा सिनेमा बरेच कन्विन्सिंग आहे.

>>काही काही मिसिंग लिंक्स आहेत. उदा. मोहम्मद रहमान त्या हॉटेल रूमच्या साइड टेबलवर पाण्याची बाटली ठेवून आत जाऊन लपतो. नंतर अक्षय कुमार त्याच बाटलीतले पाणी पितो, हे दाखवण्यामागचे प्रयोजन कळले नाही, निदान मला तरी. असे वाटत होते की त्या पाण्यात काही विष वगैरे असावे आणि अक्षय कुमार मिशन कम्प्लिट करुन मरतोय की काय.... पण नाही असे काहीच घडले नाही.>>>>

तो प्रसंग नीट पाहिला तर असे वाटेल की पाकिस्तानी ऑफिसर आणि अक्षय कुमार यांची विचार करण्याची पद्धत सेम आहे, हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे बिलालचा म्रुतदेह पाहूनच त्याला 'फोन उचलत असताना याला गोळ्या घातल्या गेल्या' हा पुर्ण सीन डोळ्यासमोर दिसतो. नंतर सुद्धा तो ज्या पद्धतीने अक्षयचा माग काढतो याची सुरुवात या सीनने होते.

मोहम्मद रहमान त्या हॉटेल रूमच्या साइड टेबलवर पाण्याची बाटली ठेवून आत जाऊन लपतो.

अहो, तो लपत नाही तर तो वॉशरुममध्ये गेलेला असतो आणि आत घुसलेल्या दोघांना बिलालबरोबर तोही खोलीत आहे याची कल्पना नसते. बिलाल फोन नाही तर तिथे ठेवलेले त्याचे रिवॉल्वर मिळवायच्या प्रयत्नात पाठीवर गोळ्या खाऊन मरतो. तो मेल्यावर ताण थोडा हलका होतो आणि अक्षय तिथे ठेवलेली पाण्याची बाटली उचलुन पाणी पितो. हे घडत असतानाच वॉशरुममधुन फ्लश केल्याचा आवाज येतो आणि खोलीत अजुन कोणीतरी आहे याचा या दोघांना शोध लागतो. तो अजुन कोणतरी रहमान निघतो. या भानगडीत पाण्याच्या बाटलीचे बुच लावायचे राहुन जाते. सौदी अधिका-याच्या लक्षात हा सगळा घटनाक्रम येतो.

मोहम्मद रहमान त्या हॉटेल रूमच्या साइड टेबलवर पाण्याची बाटली ठेवून आत जाऊन लपतो.>>>>>
तो आत जावून लपतो कि वाशरूम ला जातो ? कारण तो ज्याप्रकारे बाहेर पडतो त्यावरून तो लपलेला वाटत नाही. तो सौदीचा अश्फाक मला खूप आवडला Blush कारण तो झी झीन्दगी वरील भरपूर सिरिअल्स मध्ये पाहिला होता.

(स्पॉयलर अलर्ट)

मोहम्मद रहमान त्या हॉटेल रूमच्या साइड टेबलवर पाण्याची बाटली ठेवून आत जाऊन लपतो.<<< लपत नाही. तो वॉशरूममध्ये गेलाय. बिलालला मारल्यावर तिथून निघताना फ्लशचा आवाज येतो, कुणीतरी आहे म्हणून हे दोघं कानोसा घेतात तर मोहम्मद रहमान बाहेर येतो. मग त्याला ब्नेशुद्ध करून इथल्या इथं मारून टाकायचं की परत घेऊन जायचं हा कॉल अजय घेतो. तिथंच मारलं असतं तर रहमान मेला असता पण पाळमुळं खणता आली नसती.

मला एक गोष्ट जरा नीट लक्षात आली नाही -शेवटी तो सौदी ऑफिसर हे चौघे कोण आहेत (इन्डियन सिक्रेट फोर्स चे लोक आहेत ) हे फिगर आउट करतो का ?? त्याला अन त्याच्या माग काढण्याला जरा अजून फूटेज द्यायला हवे होते असे मला वाटले.

मला एक गोष्ट जरा नीट लक्षात आली नाही -शेवटी तो सौदी ऑफिसर हे चौघे कोण आहेत (इन्डियन सिक्रेट फोर्स चे लोक आहेत ) हे फिगर आउट करतो का ??>>>>>>>हो आपले dyani साहेब फोन करतात ना "माथुर" म्हणून कोणाला तरी ........:अओ:

तो सौदी ऑफिसर सगळे ओळखतो. पण एक अतिरेकी मरतोय तर मरु दे असे म्हणुन तो गप्प बसतो.

सौदी / किमान तो अधिकारी तरी भारताच्या फेवरमध्ये आहे असे सूचित केले आहे

तो सौदी ऑफिसर सगळे ओळखतो. पण एक अतिरेकी मरतोय तर मरु दे असे म्हणुन तो गप्प बसतो.

सौदी / किमान तो अधिकारी तरी भारताच्या फेवरमध्ये आहे असे सूचित केले आहे>>>>>>हो हो असेच असेल सहमत. Happy

त्याचा फ्लशचा आवाज यान्ना ऐकु येतो

आणि यांच्या गोळ्या किंकाळ्या हे त्याला ऐकु येत नाही ?
>>सायलेंसर नावाचा प्रकार ऐकला आहे काय? जर गुपचुप जाउन मारायचं असेल तर तिथे सायलेंसरवाली बंदुक घेउन जातील की शॉटगन घेउन जातील.

Pages