उत्कंठावर्धक 'बेबी'

Submitted by उडन खटोला on 25 January, 2015 - 03:54

'बेबी'हा सिनेमा २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला ,तो काल पाहिला .

'अ वेडनस्डे' आणि 'स्पेशल २६ 'सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांचा 'बेबी'हा जबरदस्त चित्रपट आहे . 'बेबी' हे एक अंडरकव्हर युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे.

या युनिटचा मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्‍या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी प्रयतत्नशील आहे .

सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त भर देण्यात आला असून यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे.

अजय सिंह राजपूत आणि टीम मौलाना मोहम्मद रहमानद्वारा पसरल्या जाणार्‍या आतंकाला संपवण्यासाठी नेपाळ आणि सौदी पर्यंत धडक मारतात. चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून क्लायमॅक्स खरोखरच ब्लडप्रेशर वाढवणारा आहे ! सर्वानी जरूर बघावा. पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .

बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्रीज लि., ए फ्रायडे फिल्मवर्क्स, क्राउचिंग टायगर मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स
दिग्दर्शक : नीरज पांडे
संगीत : मीत ब्रदर्स
कलाकार : अक्षय कुमार, तापसी पन्नू, राणा दग्गुबाती, अनुपम खेर, डॅनी, केके मेनन, मधुरिमा टुली, रशीद नाज, सुशांत सिंह
सेंसर सर्टिफिकेट : यूए *
रेटिंग : ४/५

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .>>> +१००

चित्रपट छानच आहे... वेगवान, उत्कंठावर्धक... थरारक...

पटकथा, अ‍ॅक्शन, ध्वनी, लोकेशन्स, सर्वच मस्त जमून आलय... एडीटींग पण अगदी अचूक वाटते. या सर्व बाबीत १००% गुण.

शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. [शेवट जसाच्या तसा शक्य आहे का नाही यावर दूमत असू शकेल... पण तरिही भारतीय म्हणून शेवट आवडतोच!].

अ. आणि अ. अशा गोष्टी याही चित्रपटात आहेतच...! [अगदी मॅट डेमन च्या अ‍ॅक्शनपटातही असतातच की..] Happy पण एकंदर घटनाक्रम व हाताळणी या बाबतीत खूप प्रामाणिक प्रयत्न आहे.

जरूर पहावा.

>>पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .

दोन वेगळ्या विषयावरचे चित्रपट आहेत... पीके ला डोक्यावर घेण्याची जरूर नाही, पण 'बेबी' चे अधिक कौतूक मात्र यथायोग्य ठरेल.

सगळीकडेच ४/५ स्टार आहेत...>> पहिलाच रीव्ह्यु वाचला एन्डीटीव्हीचा तर दोन स्टार्स. नीरज पांडेकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. पण तर सर्व रीवुज चांगले पॉझिटीव्ह आहेत. उद्या रात्रीचे टीकीट मिळाल्यस पाहण्यात येईल.

<<<पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .>>> +१००

मध्यपूर्वेत (गल्फ कन्ट्री) मध्ये हा चित्रपट थिएटर मध्ये दाखवताना खूप काटछाट केली आहे, कारण सौदी चा सन्दर्भ आहे ,यास्तव नेट वरून अन्य मार्गाने शक्य असल्यास पहावा

आमच्या ईथेही हा पिक्चर प्रदर्शित झाला याचं आश्चर्य वाटलं होतं...पण 'पाकिस्तानात अतिरेकि नाहिच्चेत मुळी. ते भारतातूनच येतात, ईथे फक्त शिकून जातात..' असा काहितरी विचीत्र अर्थ काढून इकडे लावण्यात आला बहुतेक. किंवा आमच्याकडे काटाकुट करुन जितका प्रदर्शित झालाय त्यातून हाच अर्थ लागला. हा सिनेमा साधारण ३ तासांचा आहे ना..? आमच्याकडे तो अवघ्या २ तास आणि काही मिन मधे आटोपला. बरेच की-डाय्लॉग्झ, संवेदनशील द्रुष्ये बहुतेक छाटली गेली असावीत.

बाकी, मला अत्यंत बोर झालं. स्पेशल २६ बराच बरा होता यामानानी.

पिक्चर काल बघीतला. आवडला पण फिल्मी आहे. शेवट एका इंग्रजी पिक्चर ची काॅपी वाटला. नाव मुद्दामुन लिहीत नाही. के के मेनन ला का वाया घालवले आहे ?

११ वर्षाच्या मुलाला घेऊन जाण्यासारखा आहे का? हिंसा किती आहे?

त्याला हॉलिडे ला घेऊन गेलेलो पण नेले नसते तर चालले असते असे वाटले...

अक्षयचा आणखी एक चांगला चित्रपट. बघणारच.
या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घातल्याचे वाचले.

खुप चांगला चित्रपट. भारतीयांना आवडेल असा.

कथा आणि दिग्दर्शनातखूप कमी चुका.

चांगला चित्रपट. परंतु थरार निर्माण करण्यासाठी काही ठीकाणी अगदी बेसिक चुका दाखविल्या आहेत. उदाहरणार्थः आतंकवादी पकड्ल्यानंतर त्याची संपूर्ण तलाशी न घेताच अक्षयकुमारने बाहेर पडणे, दवाखान्याच्या द्दृश्यात कैद करून बेशुद्ध केलेल्या कैद्याकडे पाठ करून उभे रहाणे. अशा चुका खर्‍या आयुष्यात अक्षयसारख्या अधिकार्‍याकडून घडणे अशक्य!! बाकी अभिनयच्या बाबतीत म्हणाल तर सर्वांची कामे उत्कृष्ठ!! अक्षयकुमारने मिनिस्टर च्या पी. ए. च्या थोबाडीत मारण्याचे द्दृश्य एक नंबर. अक्षयकुमार त्याच्या मुलांना चित्रपट, शॉपिंगचे प्रॉमिस करत असताना त्याचा फोन वाजतो तेव्हा त्याच्या पत्नीचे काम करण्यार्‍या अभिनेतत्रीचे हावभाव फारच छान. छोट्या छोट्या चुका माफ करून अवश्य पहावा असा चित्रपट. अक्षयकुमार फॅन असाल तर नक्कीच.

हिंसा आहे पण ढीशुम ढीशुम फायटिंग छाप. उगीच विरासत किंवा तेजाब मध्ये बटबटीत हिंसाचार सारखे नाही. ११ वर्षाच्या मुलासोबत बघायला चांगला आहे.

हॉलिडे मध्ये काहीच्या काही रोमान्स भाग आहे. तसा इथे काही नाही. ताप्स्वी पन्नूचा रोल तर प्रत्येकाने पहाव इतका छान आहे.

पाहणार. पण हॉलीडेची थीम अशीच होती ना ?

जो सिनेमा नुकताच रीलीज झालेला आहे तो पहायचा असल्यास थेटरात / डीटीएच वर पेड असल्यास / अधिकृत डीव्हीडी घेऊन ही पाहता येतो. जर फ्री मधे पाहीलाच असेल तर त्याच्या धंद्याच्या काळात हा सिनेमा कुठे फ्री मधे उपलब्ध आहे याची जाहीरात होणार नाही किमान एव्हढी दक्षता घ्यावी.

अनुपम खेर शोभला नाही उगागच घुसडला आहे असे वाटले, त्यापेक्षा एखादा तरूण अभिनेता सूट झाला असता त्या भुमिकेला

छान सिनेमा आहे. तापसी पन्नूचा सीन खरेच छान आहे. तिचे ते दोन ड्रेसेसही सुरेख आहेत.
कॅरेक्टर्स चांगली डिफाइन केलेली आहेत.

आमिर खान : पीके, : भोंगळ
शारुकः हॅपी न्यू इअर. : एस्केपिस्ट आणि बालिश
सैफः हॅपी एंडिंग: फ्लॉप.
सलमान : किक: विचित्रच.

अक्षय कुमारः बेबी.!!!!!

अशफाकचे काम कोणी केले आहे. तो ही एकदम सलोना गोड दिसतो व काम चांगले केले आहे.
राणा दगुबत्ती डीरामा नायडूंचे नातू. मोठे प्रस्थ आहे डाउन साउथ. अक्षयच्या मिसेस कोण आहेत.
तो थोबाडित मारण्याचा सीन अफलातून आहे.

अशफाकचे काम कोणी केले आहे. तो ही एकदम सलोना गोड दिसतो >>> खरच मस्त आहे तो. मला आणि लेकीला दोघींनाही आवडला Happy लेकीच्या बापाला अर्थातच नाही Wink

अवांतर - सिनेमा बघताना स्पार्टाच्या ट्रॅपची आठवण आली. खरच त्यावरपण मस्त सिनेमा होईल.

ठरवून एकही रीव्ह्यु न वाचता बघितला. शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
अक्षय अशा भूमिकेत कायमच शोभून दिसती.
कोठेही फाफटपसारा नाही , गाणी नाहीत, item song नाही, उगाच प्रेम प्रसंग नाहीत.
एका सीन मध्ये अक्षयला शर्ट काढावा लागतो तेंव्हा अस वाटल कि आता खोटे खोटे 6 pack abs बघावे लागणार पण नाही.
तापसी ला Honey Trap म्हणून नेतात तेंव्हा पण भीती वाटली होती पण नाही. पंजाबी सूट वरच सगळे मिशन पार पाडते बिचारी.

Pages