अ‍ॅक्टींग तोडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2015 - 14:15

..
अ‍ॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..

त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअ‍ॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले आणि खरोखरच अ‍ॅक्टींग तोडली सीन समजू लागले ..
ते कोणते ते माझे मी लिहेनच, तुमचेही तुम्ही लिहा.. याच धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन देवदास - पारो चंद्रमुखीकडे येते माती मागायला आणि देवदासला घेऊन जाण्यासाठी त्याच्या रूममधे जाते तो सीन. माधुरीने 'ले जा सकती हो तो ले जाओ, सब तुम्हारा' म्हणताना जो चेहरा बदललाय तो केवळ आहे.

चित्रपट - इजाजत
सुधा (रेखा) घरात पडलेल्या मायाच्या(अनुराधा पटेल) वस्तू तिला पॅक करून पाठवून देते. माया त्या वस्तू ठेवून घेते आणि एक कविता पाठवते पत्रातून. महेंदर (नसीरूद्दीन शहा) सुधाला "सुधा, धिस इज माया!" असे म्हणून ती कविता वाचून दाखवतो. कवितेचे एक कडवे महेंदर वाचतो आणि मग त्या कवितेचे गाणे होते. ते म्हणजे मेरा कुछ सामान...
महेंदरच्या "सुधा, धिस इज माया!" मधे सुधाला माया म्हणजे काय हे सांगणे आहेच पण त्याबरोबर तिला सुधाने दुखावल्याचा ब्लेम आहे, सुधाने इन्सिक्युअर व्हायची गरज नाही हे ठासून सांगणे आहे... ला ज वा ब!!

गाण्याच्या मधे पण एकदोन ओळी वाचलेल्या आहेत. गाणे संपते तेव्हा सुधा रडते आहे. मायाच्या हळव्या दुखर्‍या अस्तित्वावर हळहळणे, मायाला दुखावल्याचा गिल्ट, माया आणि महेंदरच्यामधे आल्याचा गिल्ट, महेंदर दुखावला गेल्याचा गिल्ट आणि एकिकडे चांगला नवरा असला तरी महेंदरच्या जगात मायाचे स्थान अढळ आहे हे समजल्याची हतबलता हे सगळे आहे त्या रडण्यात आहे. हे सगळे घेऊन सुधा म्हणते "मैने क्यूं भिजवाया वो सब! वैसे भी तो माया हमारे साथ रह रही है!"

ला ज वा ब गुणिले बरेच...

इजाजतमधे असे सीन्स प्रचंड आहेत. १९८५(की १९८७) मधे आलेल्या या सिनेमाचे गारूड माझ्यावर तरी आजही आहे.

नीधप +११११११११११११११११११११११११११११११११

१९८५

नीधप....

"चार चांद लगा दिये" असे जे म्हणतात अगदी तसेच तुम्ही "इजाजत" दृश्याने इथे ते लावलेत....भारावून गेलो मी त्या आठवणींनी आणि गुलझार यांच्या शब्दांच्या जादूने....पद्य नव्हेच ते गद्यच....आशाताई गुणगुणत आहेत....

"सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे है....और मेरे एक खत मे लिपटी रात पडी है...." ~ श्रावणातील ते ओलीचे दिवस आणि पत्रात गुरफटलेली माझी एक रात्र....आहे ना तुझ्याकडे ? ती तेवढी पाठवून दे. वेड लागते....हृदयातील संवेदना छेडण्यासाठी....परत परत....अशा ओळी आणि अनुराधाची ती एकटीची पायरीवर बसलेली मूर्ती...इकडे नसिरूद्दीनची सुन्न हरवलेली स्थिती....आणि शेजारी "हे मी काय केले ?" असा पश्चातपदर्शक चेहरा करून विचारात पडलेली रेखा.....

किती सुंदर आणि सतत हवीहवीशी वाटणारी चित्रकला....होकुसायच्या लाटा चित्रासारखी अंगावर कोसळणारी.

तब्बल तीस वर्षे होत आली....नाही पुसली जात ही आठवण....जाणारही नाही.

थॅन्क्स नीरजा.

नीधप.....
आणि अशोक मामा

तुमच्या अक्ख्या पोस्टीला +१००१ Happy

इजाजत भारीच, मुळात गुलजारांची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, पंचम दांचे संगीत, नसीर आणि रेखा ह्यांचा उत्तुंग अभिनय !! नंदिनी म्हणतात त्या प्रमाणे शेवटचा सीन तर फारच बेस्ट !!!! नसीर, पंकज कपुर, ओम पुरी, अमरिष पुरी ह्या अक्ख्य्या इन्स्टिट्युट्स आहेत अभिनयाच्या !

ऋन्मेऽऽष, तुझ्या शारुख प्रेमा खातर एक त्याचा ही सीन पोस्टतो इथे..
चित्रपट स्वदेस...मोहन भार्गव गीता च्या पुर्खो के. जमीन ची वसुली करायला जातो, आणि खरा भारत काय आहे, खेड्यातल्या लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, केवढी गरिबी आहे हे सगळे बघुन विदिर्ण होतो...परतताना अजिते नामक एका छोट्या स्टेशन वर त्याची गाडी थांबते, एक बारका पोरगा पानी ले लो साब पानी ले लो...५० पैसे का एक ग्लास म्हणुन ओरडत इकडे तिकडे पळत असतो...मोहन भार्गव ला पण तो म्हणतो पानी लोगे साब...आणि हे सगळे पाहुन थिजलेला मोहन हो म्हणतो, मेलाराम कडचे ५० पैसे घेउन त्या माती च्या मटक्यातले पाणी पितो.....आणि गाडी स्टेशन सोडते....शारुख ह्या पहिल्या चित्रपटा मधे शारुख न वाटता खरोखर मोहन भार्गव वाटला आहे...!!

पूर्वीच्या फौजी, सर्कस या सिरीयली आणि स्वदेस आणि चक दे हे दोन सिनेमे वगळता शाहरूख सर्व ठिकाणी फक्त शाहरूखच वाटलेला आहे. तो कधीच ते ते कॅरेक्टर वाटू शकलेला नाही.
हिंदीतल्या बहुतेक स्टार लोकांचे हेच लोणचे झालेले आहे.
(म्हणजे स्टार बनूनही अभिनय ज्यांना शिवून गेलाय अश्यांबद्दल बोलतेय. सलमान, जॉन इब्राहिम, अक्षय कुमार या मल्लांविषयी वा कतरिना, शिल्पा शेट्टी किंवा तत्सम छमछम्स विषयी बोलत नाहीये... )

>>सलमान, जॉन इब्राहिम, अक्षय कुमार या मल्लांविषयी वा कतरिना, शिल्पा शेट्टी किंवा तत्सम छमछम्स विषयी बोलत नाहीये<< हा हा हा हा हा हा !! खरे आहे.

चक दे ची तुम्ही आठवण काढलीच आहे तर मला त्यातला मॅच भारत जिंकतो त्या वेळचा सीन सगळ्यात आवडला आहे. भारत जिंकल्यावर झालेला अत्यानंद आणि सुखद धक्का कबीर ने उत्तम दाखविला आहे, बॅकग्राउंड चे संथ गाणे,
कबीर चा अभिमानाने फुलुन गेलेला आणि आनंदाश्रु नी भरलेला चेहेरा आणि त्याचे भारताच्या झेंड्या कडे बघणे...शाहरुख खरे पाहता अश्या भुमिकांमध्ये जास्त लवेबल वाटतो...K3G छाप पिक्चर पेक्षा.....

मेलाराम कडचे ५० पैसे घेउन त्या माती च्या मटक्यातले पाणी पितो.....आणि गाडी स्टेशन सोडतें<<<< त्यापूर्वी प्रत्येक वेळी तो बाटलीतलं मिनरल वॉटरच पिताना दाखवलेला आहे. अगदी जेवतानासुद्धा. दिग्दर्शक अशा ठिकाणी खरंच झळकून जातो.

मोहन भार्गवची घरवापसी या शॉटनंतर चालू होते. इतके दिवस त्रयस्थपणे केवळ समस्या पाहून दु:खी होणारा अथवा बाहेरून उपाय योजना करणाअरा मोहन इथून समस्यांचा एक भाग बनून त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतो.

स्वदेसमधे गीताला बघायला आलेले बाहेर निघून जातात तेव्हा मोहन भार्गव नाचतो तो एक अफलातून शॉट आहे (तिथं "शाहरूख खान" वर्णी लावून जातोच. हिरवीणीचे लग्न मोडले की आनंद साजरा करनारा हाच!! Proud )

इंटरनेट आहे हे माझ्यासारख्यांचे भाग्यच की आम्ही असे जबरदस्त चित्रपट, जे मी जन्मलोही नसतानाचे आहेत, पाहू शकतो विकत घेऊन संग्रही ठेवू शकतो. येथे त्यामुळे अनुभवु शकलेल्या माझ्या दोन आवडत्या अभिनेप्रदर्शनांचा उल्लेख करितो.

स्पर्श हा माझा अत्यंत आवडता चित्रपट. नसीरुद्दीन शाह-शबाना आजमी-सई परांजपे या त्रयीने कमाल केली आहे. नसीरच्या यातल्या एक एक सीनवर एक एक धागा काढावा लागेल एवढा तो भूमिका जगलाय. पण माझा आवडता सीन आहे शबाना एका आंधळ्या मुलाला राजकन्येची गोष्ट सांगते तो. ब्रेल मध्ये तेव्हा पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे गोष्टी ऐकून होणारा कल्पनातीत आनंद तो मुलगा जब्बरदस्त दाखवतो. आणि त्याच्याबरोबर राजकन्या होऊन खेळणारी शबाना पाहिली की खरच अभिनयच काय सर्वकाही तोडले जाते.

आणि दूसरा न्यू दिल्ली टाइम्स. शशी कपूर किती ताकदीचा अभिनेता होता यासाठी हा पाहायचा. ओम पुरी सारखा तगडा अभिनेता अत्यंत भावखाउ भूमिकेत असतानाही शशी कुठेही कमी पडत नाही. तडफदार तरुण पत्रकार ते शेवटी आपला प्याद्यासारखा वापर झाला हे कळाल्यावर उध्वस्त झालेला युवक हे दोन्ही भाव त्याने सुंदर दाखवलेत.

प्रसन्न....

शाहरूख हा खरोखर मोहन भार्गव वाटला....हे वाक्य छान आहे तुमचे. मला का कोण जाणे "स्वदेस" पाहताना शाहरूखच्या जागी आशुतोष गोवारीकरच दिसत होते....तेच खरे मोहन भार्गव आहेत....आणि त्यांच्या नजरेसमोर जो नायक आहे तोच त्यानी स्वत: उभा केला आहे....फ़क्त कलाकार बदलून. अर्थात शाहरूख हा जबरदस्त क्षमतेचा अभिनेता असल्याने त्यानेही ती भूमिका समरसून केलेली आहे, हे मान्य करावे लागेल....विशेषत: पंचसमितीसमोरील त्याचे भाषण....वाद नाही, पण मुद्दा मांडताना चेह-यावरील त्याची विनम्रता अगदी अप्रतिमच.

तुम इंडीअन्स " असे जेव्हा आजी बाई बोलते क्लासच एस्प्रेशन्स तिघांच्याही चेहर्‍यावर येतात
स्वदेश अप्रतिम चित्रपट आहे Happy

फायर चित्रपटात,

शबाना व नंदिता गॅलरीत का कायसे शिळोप्याच्या गप्पा करत असतात. शबाना नंदिताला विचारते तुझा नवरा कुठे आहे, नंदिता म्हणते ही हॅज गॉन टु हिज गर्ल्फ्रेंड. व त्या एक कटाक्ष शेअर करतात. ह्या परिस्थितीतले दु:ख, तिच्यावर होणारा अन्याय समर्थ पणे दाखवला आहे. हताश व्हायला होते बघून.

अर्थ सिनेमात शबाना नवरा दुसर्‍या बाईच्या प्रेमात पडला आहे हे माहीत असूनही त्याला विनवते, सर्व विसरून जाउ परत सुरुवात करू आपला संसार बिखरू देउ नकोस.... व तो निर्दय पणे तिला झिडकारून निघून जातो. पहिले स्वतःचे घर मिळाल्यावर हरखलेली अनाथ शबाना.

व ह्याला काउंटर स्मिता, तिच्या मंगळसूत्राचे काळे मणी मला टोचतात म्हणते. तेव्हा काटा येतो. विबासं हे किती डिस्ट्रक्टिव प्रकरण आहे ते हे बघून समजते. उत्तम अभिनय.

रुन्मेश साठी: केथ्रीजी मध्ये शारुख मेळ्यात येतो व काजोलच्या हातात बांगड्या चढवतो. आणि बोलतो संवाद छान आहे. फारच रोमांटिक आणि तिला म्हणतो आपकी हलवाईकी दुकान तो हम लेके रहेंगे.

ह्यात काजोल त्याला मैत्रीणीचा नवरा समजते, तोसीन, मैत्रीणीला पहायला येतात तो सीन, हाय ओरब्बा
बीपी हाय वाय है? हा काजोलचा सीन, बारका माफी मागायला येतो तेव्हा शारुक काजोलची हलकी पप्पी घेतो ते, काजोल हे मोट्ठे डोळे करते ते खूप क्यूट आहे.

मी हा सिनेमा कुठेही लागला की कुठूनही बघते. फक्त अमिताभ जया सोडून. ते पीळ मारतात.
ह्यातच हिर्तिक घरी येतो तेव्हा शारुक त्याला घरचे नियम सांगतो. तेव्हा करीना काहीही बोलत नाही.
नुसते हाव भाव. एकदम लाजवाब. किती तो नखरा. Happy

स्वदेश मला खूप आवडला होता.

शाखाचे गिनेचुने मूवीज खरच चांगले होते पण सुरुवातेचेच.

हेच फक्त

चक दे. स्वदेश,

मी हा सिनेमा कुठेही लागला की कुठूनही बघते. >> +७८६ मी सुद्धा आणि माझी आई सुद्धा. चॅनेल फिरवताना हा सोनी-सेटमॅक्सवर दिसतो आणि आम्ही थांबतो.
मी सर्वात पहिले नमूद केलेली शाहरूखची एंट्रीपासून वर आणखी काही जणांनी टाकलेली भर, तसेच आपण सांगितलेले सीन.. हलकाफुलका रोमान्स आणि हलकाफुलका विनोद.. त्याला साजेसेच इमोशन्स, परत परत बघा कंटाळा येणे शक्यच नाही.

त्यातील लव अ‍ॅट फर्स्ट साईटचा सीन देखील मस्त जमलाय. काजोल लग्नाच्या वरातीत नाचत असते. ते कुडीये कुडिये ताल पण मस्त आहे. शाहरूख तिला बघतो, आणि बघतच राहतो आणि त्याचा पाय घसरतो.. पायरीवरून.. आणि तो हलकासा धक्का लागल्याचे एक्स्प्रेशन्स.. त्यानंतर त्या तालावर त्याचेही खांदे उडत नाचायला लागतात.. म्हणजेच तो अगदी समरस झालेल दाखवणे.. थोडेसे स्लो मोशनवर ते त्याने केलेयही मस्त.. क्लास आहे यार!!

>>त्यापूर्वी प्रत्येक वेळी तो बाटलीतलं मिनरल वॉटरच पिताना दाखवलेला आहे. अगदी जेवतानासुद्धा. दिग्दर्शक अशा ठिकाणी खरंच झळकून जातो<< अगदी अगदी..

घरी पहिल्यांदा आल्यावर कावेरी अम्म त्याला माठातले पाणी देते, तेव्हा सुद्धा तो ग्लास तोंडाजवल आणतो आणि बाजुला ठेवुन देतो, अजिते स्टेशन वर मात्र हताश झालेला मोहन ५० पैश्यांमधे मिळालेला तो ग्लास चक्क तोंड लावुन पितो. नंदिनी म्हणतात तशी ही त्या मोहन भार्गव ची खरी "घर-वापसी" सुरु झालेली आहे हे दाखवणारी अवस्था. दिग्दर्शक म्हणुन आशुतोष इथे बाजी मारतो.

रच्याकने
वर अशोक मामांनी म्हण्टले आहे>>मला का कोण जाणे "स्वदेस" पाहताना शाहरूखच्या जागी आशुतोष गोवारीकरच दिसत होते....तेच खरे मोहन भार्गव आहेत....आणि त्यांच्या नजरेसमोर जो नायक आहे तोच त्यानी स्वत: उभा केला आहे....फ़क्त कलाकार बदलून<< ते बहुतांशी खरे असावे. मागे एकदा मुलाखती मधे आशुतोष गोवारीकर म्हणाला पण होता की..रम्य पहाट आणि गावातील बायका डोक्यावर घाघरी घेउन जाताहेत हे असले दृष्य मला अजिबात सुंदर वगैरे वाटत नाही, उलट आपल्या देशात अजुन ही भिषण पाणी टंचाई आहे हे जाणवत रहाते...

नक्कीच मृणाल १,
एक तर Mr & Mrs Iyer मधले तिचे characterisation आणि त्या प्रत्येक aspect ला न्याय देणारी कोंकणा, तिचा अभिनय, बोलण्याची ढब सर्वच अफ़लातून. बंगाली असूनही south indian टोन खुप छान पकडला तिने.

And My all time favourite 'पथेर पांचाली'. Especially दुर्गाचा (उमा दासगुप्ता) अभिनय.
Actuallyत्या सिनेमाला सिनेमा कसा म्हणायचा हाच प्रश्न पडतो. असे वाटते की सत्यजित रेनी actual लोकेशन वर जाऊन तिथे जे काही चाललय ते शुट करून दाखवलय(Of course सर्वांच्या अभिनयामुळेच).
So must watch film, standard example of film, acting, music, direction, editing and camera.

लाईफ इन अ मेट्रो मधला सगळा इरफान खान.
त्यात आणि एक सीन बघण्यासारखा. शिल्पा शेट्टी शायनी आहूजाला पहिल्यांदा ओळख करुन देताना मिसेस अमुक तमुक अशी करते आणि तो 'ये आप 'मिसेस' पे इतना स्ट्रेस क्यों दे रही है?' असे विचारतो तो.
भुभु मध्ये नाचणार्‍या विद्या बालनला शेवटी पाहून व्याकुळपणे 'हे काय झाले माझ्या बायकोला' असे भाव डोळ्यात आणून पाहणारा शायनी आहूजा.

१) नसीरूद्दीन शहा आणि आमीर खानची सरफरोशमधील क्लायमॅक्सची जुगलबंदी. नसीरने शेवटच्या सीनमध्ये जो अभिनय केलाय, तो केवळ लाजवाब. जनरली व्हिलन मेल्यानंतर प्रेक्षकांना आनंद होतो, पण सरफरोशमध्ये नसीर मरतो तेव्हा मनात वाईट वाटते.
२) सद्मामध्ये कमल हसनचा शेवटचा सीन.
३. अतिथी कब जावोगेमधील परेश रावल हरवतो, तेव्हाचा अजय देवगणचा अभिनय.
४ . खाकीमध्ये अजय देवगणचा अभिनय. अमिताभ बच्चनसमोर अमरीश पुरी, प्राण वगैरे सोडून कुठलाही व्हिलन फिकाच असतो. पण खाकीत अजय संपूर्ण सिनेमाभर वावरलाय, ते लाजवाब.
५. गदरमध्ये सनी देवोल हिंदुस्‍थान जिंदाबादच्या घोषणा देतो, तो प्रसंग आणि त्यावेळचे सगळे डायलॉग. हा सीन या सिनेमाचा यूएसपीच. सनीची देहबोली आणि अॅक्टिंगही लाजवाब. त्यानंतर एवढे लोक असूनही जो सन्नाटा पसरतो, त्यावेळी प्रेक्षकही अगदी चिडीचूप झालेले असतात.

Pages