एच पी लेसरजेट १०१० प्रिंटर विंडोज् ७ ऑपरेटिंग सिस्टीमवर वापरणे

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 19 January, 2015 - 05:37

माझ्याकडे २००५ साली खरेदी केलेला एचपी चा लेसरजेट १०१० प्रिंटर आहे. पुर्वी हा प्रिंटर विन्डोज् एक्सपी कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) वर वापरला आहे. आता कार्यप्रणालीत बदल झाला असून संगणकावर विन्डोज् ७ ही कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) कार्यरत आहे.

एचपी लेसरजेट १०१० प्रिंटर चे वेबसाईटवर एक्सपी करिता ड्रायवर आहेत परंतु विन्डोज् ७ कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) करिता ड्रायव्हर नाहीत. आंतरजालावर शोध घेतला असता अनेक ठिकाणी वेगवेगळे ड्रायव्हर लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी एचपीच्याच दुसर्‍या प्रिंटर्सचे ड्रायव्हर वापरून पाहण्याचा सल्लादेखील देण्यात आलेला आहे.

मी सर्व उपाय करून पाहिले परंतु यश आले नाही. शेवटचा पर्याय म्हणून इथे मदतीकरिता धागा उघडला आहे.

एचपी लेसरजेट १०१० प्रिंटर विन्डोज् ७ कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) वर यशस्वी रीत्या कसा वापरावा? त्याकरिता कोणते ड्रायव्हर डाऊनलोड करावेत याचा कोणाला अनुभव आहे काय? असल्यास मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सुमुक्ता.
आपण दिलेल्या लिंकवरील उपाय मी आधीच करून पाहिलेत परंतु मला यश आलेले नाही.

चेतन,

तुम्ही डिव्हाईस म्यानेजरातून ड्रायव्हर अपडेट करून बघितलाय का?

आ.न.,
-गा.पै.

@ गामा_पैलवान_५७४३२
<< तुम्ही डिव्हाईस म्यानेजरातून ड्रायव्हर अपडेट करून बघितलाय का? >>

तुम्ही सुमुक्ता यांनी दिलेल्या लिंकमधील माहितीशी संबंधित हे विधान केलंय का? त्यात "Too complicated. Just plug-in your LJ 1010, click Start, select Devices and Printers, select Add Printer, select port DOT4_001, click Windows Update and take HP LaserJet 3055 PCL5 (HP). At the end, type your custom name "HP LaserJet 1010". That's all!" असा एक प्रतिसाद आहे. तसा प्रयोग मी करून पाहिला आहे. यश आलेले नाही.

आपल्यापैकी कोणी एचपी लेसरजेट १०१० हा प्रिंटर विन्डोज् ७ प्रणालीवर स्वतः यशस्वीपणे वापरला आहे काय? अशांच्या अनुभव व मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत...

विविध फोरमवरील माहिती मी आधीच वाचली आहे, पण बहुतेक सर्व भारताबाहेरचे आहेत. त्यांचे वाचून मला इथे भारतात तरी यश मिळालेले नाहीये.

If you happen to own an HP LaserJet 1010 but your desktop happens to have a Windows 7 operating system, then you might find yourself having a hard time installing your HP LaserJet1010 printer on it.

तो प्रिंटर इन्स्टॉल करणे किचकट आहे थोडे. वरच्या ब्लॉगवर स्टेप बाय स्टेप सूचना व व्हिडीओचीही लिंक आहे.

धन्यवाद डॉक्टर.

तुम्ही दिलेल्या लिंकवर HP Jaserjet 3055 PCL5 या प्रिंटरचा उल्लेख आहे. तर सुमुक्ता यांनी दिलेल्या लिंकवर HP LaserJet 3055 PCL5 या प्रिंटरचा उल्लेख आहे. L ऐवजी J हे अक्षर चुकून टंकले गेले असल्यास दोन्ही कडील प्रिंटर एकसारखेच आहेत. तेव्हा हा माझा प्रयोग आधीच झाला आहे. परंतु तरीही तुम्ही दिलेल्या लिंकवर सविस्तर माहिती व विडीओ असल्याने पुन्हा प्रयोग करून पाहीन व निष्कर्ष काय निघतो ते इथे प्रकाशित करेन.

पुनश्च आभार.

चेतन,

>> तुम्ही सुमुक्ता यांनी दिलेल्या लिंकमधील माहितीशी संबंधित हे विधान केलंय का?

नाही. काही प्रिंटर्स डिव्हाईस म्यानेजरात दिसतात. तुमचा बहुधा तिथे दिसत नसावा.

सुमुक्ता यांनी दिलेल्या दुव्यावरील कृती करतांना काय गफलत (एरर) आली?

आ.न.,
-गा.पै.

चेतन, माझ्याकडे पण हाच प्रिंटर आहे... २००५ साली घेतलेलाच Happy
HP LaserJet PCL5 Universal Driver ईन्स्टॉल करा. ईन्स्टॉल केल्यावर प्रिंंटर पीसीला जोडून चालू करा आणि Printer properties>Port>DOT4 सिलेक्ट करुन ओके द्या. प्रिंट येईल.

माझ्याकडे HP Universal Printing PCL 5 (v5.9.0) हे Driver Version आहे. PCL5 चे कोणतेही drivers चालतील बहुतेक. फक्त पोर्ट DOT4 सिलेक्ट केले पाहिजे.

नीलू, पोर्ट DOT4 चे दोन पर्याय आहेत एक लोकल आणि दुसरा जेनेरिक आयईईई यापैकी कोणता निवडायचा?

अर्रे असं कसं होईल? ह्या पध्दतीने एकदम पटकन काम होतं. कारण मीही त्या आधी खूप खटपट केलेली. नेमका काय प्रॉब्लेम येतोय आता.

तुम्ही सांगितल्याप्रमाणे http://h20564.www2.hp.com/hpsc/swd/public/readIndex?sp4ts.oid=4157320&sw... या लिंकवरून HP Universal Print Driver for Windows PCL5 ड्रायव्हर्स डाऊनलोड करून इन्स्टॉल केलेत. आता प्रिंटर जोडलेला आहे पण प्रिंटची ऑर्डर देऊन देखील प्रिंट होतच नाही.

त्याचप्रमाणे युएसबी पोर्टला ज्याप्रमाणे आपण इतर काही जोडले (जसे की पेन ड्राईव्ह, डोंगल, इत्यादी) की जोडणी चा संदेश येतो तसा संदेश देखील येत नाही.

डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रयोगातून देखील यश आले नाहीये.

चेतन सुभाष गुगळे,

प्रिंटर स्पूल सर्व्हिस सुरू आहे ना? खात्री करून घ्यावी म्हणतो.

windows + r दाबून रन बॉक्स उघडा.
त्यात services.msc असं टंका व एन्टर मारा.
सर्व्हिसेस प्यानेल उघडेल. त्यात Print Spooler नावाची सर्व्हिस start झालेली आहे का ते बघा.
नसेल तर start करा. आणि मग प्रिंट करून पहा.

print_spooler_service.jpg

आ.न.,
-गा.पै.

@ गामा_पैलवान_५७४३२

Print Spooler सर्व्हिस तपासली ती आधीच सुरू होती. पुन्हा एकदा प्रिंट देऊन पाहिली अजुनही यश आलेले नाहीये.

१) तुम्ही प्रिंटर जोडल्यावर Devices and Printers मध्ये सर्वात खाली Unspecified च्या खाली HP Laserjet 1010 model दिसतय का? ते जर दिसत नसेल तर प्रिंटर नीट जोडला गेला नसेल. कदाचित युसबी केबल खराब असू शकते अथवा loose connection असेल.
1010.jpg
२) जर तिथे दिसत असेल तर PCL5, Default printer सिलेक्ट आहे का हे तपासून बघा. तसेच प्रिंट देताना ज्या सॉफ्टवेअर मधून प्रिंट देणार त्यातही तोच प्रिंटर सिलेक्ट झालाय का हे तपासा.
३) Unspecified च्या खाली HP Laserjet 1010 model दिसत अ सेल तर त्यावर राईट क्लिक करुन Properties> Hardware मध्ये Device Functions मध्ये DOT4 USB Printing Support-IEEE 128.4 devices हेच आहे ना ते बघा.
1010-2.jpg
४) आणि सगळ्यात शेवटी एवढं असून ही प्रिंट होत नसेल तर कुठेतरी drivers clash होत असतील.
त्यासाठी सगळे प्रिंटर्स अनईन्स्टॉल करा. आणि PCL 5 पुन्हा ईन्स्टॉल करुन बघा. किंवा Devices and Printers मध्ये Add printer केल्यावर विंडोज ७ मध्ये आधीच असलेला HP Laserjet 3055 PCL 5 हे ड्रायव्हर्स घातले तरी चालेल. Port DOT4 सिलेक्ट करा.
1010-3.jpg
५) तुम्ही डाऊनलोड केलेले HP Universal Print Driver Windows7 64 bits चे दाखवतायत. तुमचे windows7 - 64bits or 32 bits आहे ते तपासा?

शुभेच्छा!! Happy

सर्व प्रतिसादकांचे अतिशय आभार. आपल्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे मी बरेच प्रयत्न करून पाहिले, परंतु मुख्य अडचण अशी आहे की माझा प्रिंटर लॅपटॉपला जोडल्यावर लगेचच आपोआप त्याचे ड्रायव्हर लोड केले जातात ते काही केल्या काढले जात नाहीत. त्यामुळे आपण नव्याने डाऊनलोड केलेले ड्रायव्हर क्लॅश होतात. त्यामुळे हे काम यशस्वी होऊ शकले नाही.