कोणी कशात गेला , कोणी कशात गेला

Submitted by बाळ पाटील on 17 January, 2015 - 23:52

कोणी कशात गेला , कोणी कशात गेला
येईल सौख्य दारी या भरवशात गेला

" जिंकीन या सुखाला " वदला कुणी शहाणा
परवा कळून आले, तोही अशात गेला

खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले
बेकार काळ वाया बघ उठबशात गेला

बोलावते सुखाची शापीत गारगोटी
समजून खास हीरा तो कोळशात गेला

दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची
आलाप घेतला तो गवई घशात गेला

सुर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा
आजन्म पांगळ्यारे तू कवडशात गेला

-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा कळून आले, तोही अशात गेला<<< वा मस्त ओळ!

ह्या गझलेत तांत्रिक बाबी पाळल्या गेलेल्या दिसत आहेत. पण अजून काही किरकोळ सुटी आणि विचारांमधील गांभीर्य ह्याकडे पाहायला हवे आहे असे माझे मत आहे.

चु भु द्या घ्या

खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले
बेकार काळ वाया बघ उठबशात गेला

मिस्किल शेर आहे Happy

तोही अश्यात गेला <<वाह "अश्यात" वाह

उठबशांचा शेर आवडला, कपबशात सुधारणेला वाव आहे असे वाटले
बाकीचे मला कळले नाहीत
तांत्रिक चुका वरदर्शनी दिसत नाही आहेत

राबता बघाल

लिहिण्याची सवय व्हावी म्हणून यमकप्रधान लिहिले आहेत का? तसे करायची खरोखर गरज नाही
तुमच्यात खूप प्रतिभा आहे

पुलेशु

सर्वांनाच धन्यवाद !
बेफिकीरजी , थोडे विनोदाच्या अंगाने वळलो वाटते मी!
जयदीपजी , आपण म्हणता त्यात सत्यता आहे. आपण नेमकं हेरलत.थोडी कसरत करावी लागली
.एक स्पष्टीकरण :हे धुवायचे तर खंगाळ या मनाला
नाहीतरी असाही तू कपबशात गेला

उपरोक्त शेरात कवी भौतिकतेत ( कपबशात) गुरफटलेल्या पामरास सांगतो की आयुष्यात सुख हवे असेल तर मनावरचे मालिन्य काढून टाक.आयुष्यात काही करायचेच आहे , धुवायचेच आहे तर मनातली घाण काढून टाक.
......जयदीपजी, माझे शेर समजले नाहीत याचे मलाच जरा वाईट वाटते.

वैभवजी, धन्यवाद
.......... आपना सर्वांच्या प्रेमळ सूचनेनुसार सुधारणा करतो आहे

फार आवडली. सगळीच आवडली. तान्त्रिक बाबी कळत नाहीत, पण लय ( लय म्हणजे खूप असे नाही, तर लय म्हणजे गायनातली लय/ तान) आवडली.

बाळ जी, फार छान वाटली आपली गझल... कोणी कशात गेला कोणी कशात गेला.... वाहः
गझल मधील शास्त्र वगेरे अजिबात कळत नाही मला परंतु कला आणि प्रतिभा जरूर कळते
रसिक ह्या नात्याने तुमच्या गझलेचे छान रसग्रहण करता आले.

येईल सौख्य दारी ह्या भरवाशात गेला.... वाहः
आवडले

बाळ जी, फार छान वाटली आपली गझल... कोणी कशात गेला कोणी कशात गेला.... वाहः
गझल मधील शास्त्र वगेरे अजिबात कळत नाही मला परंतु कला आणि प्रतिभा जरूर कळते
रसिक ह्या नात्याने तुमच्या गझलेचे छान रसग्रहण करता आले.

येईल सौख्य दारी ह्या भरवाशात गेला.... वाहः
आवडले
>>>>>>
अभिषेक्जी, आपली ही प्रतिक्रीया . आपल्या सारख्ह्या रसिक मनाच्या वाचकांच्या प्रतिक्रीया खूप बळ देतात लिहायला. धन्यवाद !
सत्यजीत्जी, विलासरावोजी धन्यवाद !