सरळ चालायचे असते वळावे लागते हल्ली

Submitted by जयदीप. on 17 January, 2015 - 01:45

सरळ चालायचे असते वळावे लागते हल्ली
जरासे चालण्यासाठी बसावे लागते हल्ली

नको घालूस आयुष्या भुरळ थांबायची आता
जरी थांबायचे असते, निघावे लागते हल्ली

तुझ्या आदर्शवादाला नसावा लागला धक्का
तरीही श्वास घेतो का बघावे लागते हल्ली

नको समजायला माझ्या मनामधले कुणालाही...
तुझा उल्लेख करताना जपावे लागते हल्ली

जिथे आहे तिथे असणे नवल आहे जगासाठी!
जिथे नसतो तिथे सुद्धा असावे लागते हल्ली

जिथे आहे हवा तेथे नकोसे वाटते जाणे
जरासे फुंकते कोणी... विझावे लागते हल्ली!

जयदीप शरद जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरळ चालायचे असते वळावे लागते हल्ली
जरासे चालण्यासाठी बसावे लागते हल्ली

व्वा.

जिथे आहे तिथे असणे नवल आहे जगासाठी!
जिथे नसतो तिथे सुद्धा असावे लागते हल्ली

अप्रतिम.
जमीनही मस्त आहे.

एक सूचना: आयुष्याला, जिंदगीला, अलाण्याला-फलाण्याला उदेश्यून जे शेर असतात, (उर्दूतही) ढिगाने झाले आहेत. शेर फसला आहे असे नाही पण अश्या भावना व्यक्त करण्याची नवीन पध्दत शोधण्याची आवश्यकता मला जाणवत आहे.

नको समजायला माझ्या मनामधले कुणालाही...
तुझा उल्लेख करताना जपावे लागते हल्ली

जिथे आहे तिथे असणे नवल आहे जगासाठी!
जिथे नसतो तिथे सुद्धा असावे लागते हल्ली<<< वा वा

सुंदर