ईच्छा

Submitted by abhishruti on 16 January, 2015 - 09:57

एक काळ असा होता की मला तुझं प्रेम उमजत नव्हतं
आता वेळ अशी आहे की ते उमजून्ही मी काय करु?
समाजाला तू कधी मानलं नाहीस, आणि मी कधी डावललं नाही.
पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं, नाही
खरंतर पूलच वाहून जायची वेळ आली
आता दुरुनच एक्मेकांना पहायचं, अगदी पूर्ण डूबेपर्यंत
कोणकोणाला आधार देणार आणि कशासाठी हा अट्टाहास?
डूबताना देखील ही माणसं मला तुझा हात धरु देणार नाहीत
आणि मला नाही सहन होणार तुझ्या डोळ्यातली अगतिकता
निदान जाताना तरी मला तुझ्या डोळ्यातलं निखळ प्रेम अनुभवायला मिळाव
एव्हढीच ईच्छा.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

writing here after a long gap of few years.... This is my muktachhand!
Please let me know काही चुका असतील पण मनापासून लिहिलय
-- Shruti

श्रुती ,
भावना मार्मिक व्यक्त झाल्या तरीपण कुठेतरी थोडा तुटकपणा जाणवतो. त्यातील दडलेली आर्तता अजून प्रकट होऊ शकेल. मुक्तछंदातलीही एक गेयता असते तीही दिसावी . स्पष्ट लिहितो आहे तरी माफ कर.

धन्यवाद...प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल!
गुरुकाका, खूप दिवसानी कसलं वर्षांनी लिहिलं इथे घाबरत घाबरत!
हल्ली मी कोणाला ओळखत नाही फारसं इथे, त्यामुळे कोणाची
प्रतिक्रिया येइल असे अपेक्शितच नव्हते आणि आली तर काय येइल असेही वाटत होते.
-- श्रुती