माणसं हरवण्याचे ऋतू

Submitted by कमलेश पाटील on 14 January, 2015 - 05:21

आज गेला तो तोंडावर मारुन
घटस्फोटाचा कागद
म्हणाला नकोय आता त्याला माझं
त्याच्या आयुष्यात असणं.

बोलत गेला काही बाही
त्या बोलण्यात मीच फक्त चुकीची
म्हणाला देत नाहीस तू
साथ मला पहिल्यासारखी .

मी स्तब्ध शोधत त्याचातला
माझा तो शोधत
वेद्नेचा कडेलोट करायचा
जो अंगभर चांदण पसरवत

यायचा रोज रोज ढोसून
आणी त्याच्या गटासारख्या तोंडात
तोंड घालुन मी द्यावी त्याला समरसून साथ
अशी आशा बाळ्गून.

मी माझ्याच कुंपणावर उभी
त्याचे कुंपण फक्त तो काढत गेला
जेव्हा हव होत मला त्याचं माझ्याभोवती असनं
तेव्हाच नेमका तो दूर दुर होत गेला.

आताशा काहीच वाटेनासं झालय
दु:ख माझ्या नशीबात रहायला आलंय
कणखरपणाचा आव आणलाय मी
पण नाही सोसवत आता हे माणसं हरवण्याचे ऋतू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users