Unofficial मायबोली ॲवार्ड्स २०१४ - नामांकनं

Submitted by वेदिका२१ on 12 January, 2015 - 08:37

तर मंडळी, कालच गोल्डन ग्लोब ॲवार्ड्स पाहून आठवण झाली- मायबोली Unofficial सर्वोत्तम धागा ॲवार्ड्स २०१४ साठी नामांकनं मागवली आहेत. हे धाग्यांसाठी ॲवार्डस असून धाग्यासाठी अनेक आयडीजचा हातभार लागलेला असू शकतो. हे कोणा आयडीचे नामांकन नाही. (उगाच भांडणं नकोत!)हे सर्व टायटल्स मायबोली कॉपीराईट्स आहे व प्रायोगिक नाटकांची टायटल्स म्हणून कितीही आकर्षक वाटले तरी वापरता येणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
पारितोषिक वितरण सोहळा कुठे करायचा यावरुनही वाद होऊ शकतो त्यामुळे त्यासाठी वेगळी नामांकनं नंतर मागवली जातील. जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहता यावं यासाठी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, बे एरिया व न्यू जर्सी ही चार गावं सध्या कन्सिडर करतो आहोत.

पुढील कॅटेगरीजसाठी-

१.बेस्ट धागा इन अ कॉमेडी रोल-
सई ताम्हणकर आवडते/आवडत नाही
कुत्रा गावाला न्यायचा आहे
आधुनिकता की उथळपणा

२. बेस्ट धागा - most discussed recipe category
सोप्पं कॅरेमल पुडिंग
मलई बर्फी
नॅचरल आईस्क्रीम

३. लाईफटाईम अचिव्हमेन्ट धागा (इथे नॉमिनेशन नसते. एकच विनर काढतात.)
आईने अकबरी

४. बेस्ट धागा इन अ सिरीयस / डिबेट रोल
वैयक्तिक अंधश्रध्दा
लोकसभा निवडणुक २०१४
अरविंद केजरीवाल व आम आदमी पार्टी

५. बेस्ट धागा - positive contribution category
वजन कमी करा
युक्ती सांगा युक्ती सुचवा
मायबोलीवरचे धमाल धागे
पॉझिटीव्ह दृष्टीकोन कसा ठेवावा

६. बेस्ट धागा- हॉरर कॅटेगरी
अमानविय..
होणार सून मी त्या घरची
जुळून येती रेशिमगगाठी
दिल्ली रोड ट्रिप

७. बेस्ट धागा- world peace category (भांडणं न होता चर्चा)
स्टार प्लसचे महाभारत
अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक
पाककृती माहीत आहे का?

८. बेस्ट धागा- सस्पेन्स कॅटेगरी
ट्रॅप
आपण याना पाहिलंत का?
माझं काय चुकलं?

९. बेस्ट धागा- विनोदी- विशेष लक्षवेधी विभाग
घरात उंदीर शिरला आहे
हेल्मेट (हॅम्लेट नाही हं!)

१०. बेस्ट धागा- कौटुंबिक/ संस्कारक्षम फॅमिली ड्रामा विभाग
सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"
पाळणाघर आणि वृध्दाश्रम
प्रत्येक वेळी मीच का म्हणून माघार घ्यायची ?

सर्व नामांकन विजेते धागे व त्याचे सहभागी आयडीज यांचे अभिनंदन!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>३. लाईफटाईम अचिव्हमेन्ट धागा (इथे नॉमिनेशन नसते. एकच विनर काढतात.)
आईने अकबरी>> वेदिका, असा वेगळा धागा नव्हता. तावातावाने वाद चालू असलेल्या धाग्यावर बी ने आईने अकबरीबद्दल विचारून सगळ्या धाग्यातली हवाच काढून घेतली.

लै भारी. मस्तच आहेत क्याट्यागर्‍या.

६. बेस्ट धागा- हॉरर कॅटेगरी
अमानविय..
होणार सून मी त्या घरची
जुळून येती रेशिमगाठी >>>> Biggrin इथे अजून एक गाजलेल्या रोडट्रीपचा धागाही येऊ शकतो हां.

>>३. लाईफटाईम अचिव्हमेन्ट धागा (इथे नॉमिनेशन नसते. एकच विनर काढतात.)
आईने अकबरी>> वेदिका, असा वेगळा धागा नव्हता. तावातावाने वाद चालू असलेल्या धाग्यावर बी ने आईने अकबरीबद्दल विचारून सगळ्या धाग्यातली हवाच काढून घेतली.

>>> पण सायो, त्या कमेंटला धागाच काय धागेश्वर म्हणून डिग्री द्यायला पाहिजे. Lol

६. बेस्ट धागा- हॉरर कॅटेगरी
अमानविय..
३. लाईफटाईम अचिव्हमेन्ट धागा (इथे नॉमिनेशन नसते. एकच विनर काढतात.)
आईने अकबरी
१.बेस्ट धागा इन अ कॉमेडी रोल-
कुत्रा गावाला न्यायचा आहे>>>
करेक्शन, येस रीया उंदिर भारी हे ह्यापेक्षा..

सायो + १

आणि पहिल्या कॅटगिरीतली नॉमिनेशन्स पटलेली नाहीत.
उंदीरवाल्या धाग्यावर हा अन्याय आहे. अधुनिक उथळतेपेक्षा भयाण सुंदर होता तो धागा

Viewers Choice /Popular category काढून त्यात हे तीन धागे नामांकित करण्यात येतील
१. उंदीर
२. रोड ट्रिप
३. हेल्मेट (ओम्नी वाला)

बेस्ट धागा इन अ कॉमेडी रोल- >>> जगबुडी विसरले का काय??? माचूपिचूचा देव रागवेल की अशाने.

सीरीयसली. ज्यांनी तो बीबी वाचला नाहिये त्यांनी वाचून बघा. श्रद्धाची "ती" कमेंट इतक्या निरूपद्रवीपणे येते आणि वाचताना ती चक्क खरी वाटते. नंतर जो काय हलकल्लोळ होतो तो अवर्णनीय आहे.

जुन्या मायबोलीवरचा "मैत्रीण हवी आहे" हा बीबी पण टाका यात.

जुन्याच माबोवरचा माय क्रशेस, फर्स्ट किस आणि देव आहे की नाही हा बीबी पण नॉमिनेशनमध्ये पाहिजेच,.

हे नामांकित धागे २०१४ मध्ये सुरु झालेले किंवा २०१४ मध्ये नवीन पोस्ट्स आलेले आहेत.

जुन्यांपैकी मी फार अजून वाचले नाहीयेत. आता हे शोधून ठेवते. माझ्या सुदैवाने आईने अकबरी वाचलेला आहे. तो धागा ओरिजिनल काय विषयावर होता माहीत नाही...आईने अकबरी हेच लक्षात राहिलंय Happy

मस्तच .१कॅटेगरी , २ बेस्ट रेसिपी धाग्यात फार म्हणजे फारच चुरस आहे .!
बे एरियात ठेवा पारितोषिक वितरण सोहळा त्यानिमित्ताने परदेशी जाता येईल.जेवण आणि येण्याजाण्याचा खर्च कोण करणार यावरुन वाद नको, इथले जुणे जाणते लोकं करतील स्पाँन्सर. Proud Proud पण स्वीट डिश आईस्क्रीम हवं हं. Happy

नंदिनी, आईशप्पत, तो मैत्रिण हवी आहे धागा काय जबरी होता ! किमान पोस्टींत कमाल धमाल !! लिन्क आहे का तुझ्याकडे? असल्यास मला विपु कर प्लीजच Happy

Biggrin

हॉरर कॅटेगरी (होणार सून मी त्या घरची, जुळून येती रेशिमगाठी ) आवडली.

माकाचु >> सस्पेन्स Biggrin

उंदराला पण हॉररमध्ये घाला कृपया.

माझ्यात दडलेले लहान मूल : या धाग्यावरचे कन्फ्युजनपण आईने अकबरीच्या तोडीचे आहे>> हे एक महान होतं!!! याची लिंक हवी.

पण टण्या, सत्य सांगायचं तर आईने अकबरीवर तुझाच सिक्सर अफलातून होता. बी च्या कमेंटने हसले नव्हते तेवढे तुझ्या कमेंटने हसले होते.

मैत्रीण हवी ची लिंक माझ्याकडे नाही. मिळाली तर मामीच्या बीबीवर टाकून ठेवायला हवी.

अस काय ते! अन्जिर बर्फी विसरलात ना! कलाकार पुन्हा बी आणि टण्याच!, " मायबोलिच्या चिमणपाखरा" अशी बी ची आर्त साद आणि त्यावर टण्याचा सात्विक सन्ताप.

@सीमंतिनी- तो धागा अ‍ॅड केलाय..गुड सजेशन.

जुने धागे धमाल आहेत..मी त्यावेळी मायबोली वाचत नसल्याने बरेच संदर्भ लागत नाहीत..इनसायडर जोक्स कळत नाहीत. पण तरी निवडक धागे वाचायला मजा येते. वंदना बर्वेंचे धागे तर सुरुवातीला मी अगदी निरागसपणे सिरीयसली वाचायला गेले होते. नवर्‍यासाठी आवडता शिरा केला वगैरे वाचून तर गिल्टी वाटू लागलं कारण मी नवर्‍याला गोड पदार्थ आवडत नाहीत तरी मला गोड आवडतं म्हणून शिरा करते आणि तो मुकाटयाने (भुकेपोटी)खातो. ते सगळे लेख वाचून संपेपर्यंत मात्र अगदीच 'पटत नाही' कॅटेगरीत गेले.

तो आईने अकबरीचा धागा अलीकडेच वाचला तेव्हा इतकी फिसकन हसले होते की आसपासच्या सर्व लोकांनी दचकून माना वळवून बघितलं होतं. नंतर आठवून आठवून पण हसत होते. मूळ वाक्य आणि सर्वांच्या प्रतिक्रिया...अ श क्य आहेत Rofl

यातले सारेच धागे ओळखीचे नाहीयेत. लिम्का मिळतील का. खास करून धमाल धाग्यांच्या..

दिल्ली रोड ट्रिप हॉरर कॅटेगरी.. हा काय प्रकारेय?

कॅटेगरीज! Proud

मैत्रिण, माझ्यात दडलेले लहान मूल >> प्लीज लिंक द्या कोणितरी.. मामींच्या धाग्यात पण अ‍ॅड करा..

Pages