तो वरून थरथरतो म्हणून

Submitted by अमेय२८०८०७ on 11 January, 2015 - 10:44

तुझ्या नि माझ्या नात्याबद्दल प्रवाद उठला आहे
बंधामधल्या शुभ्रपणाला डाग लागला आहे

तो वरून थरथरतो म्हणून हलके नकोस लेखू
पाया त्याचा जमिनीमध्ये प्रचंड रुजला आहे

मूळ म्हणाले मातीला की पुरेत जीवनद्रव्ये
जमिनीवरचा भाग तनाचा पुरता सडला आहे

कोणकोणत्या जखमेसाठी अश्रू नयनी आणू
अवचित भूताचा दरवाजा पुन्हा उघडला आहे

शेवटचे म्हण, "तुझीच होते" नंतर जा माघारी
असून मिथ्या हेच ऐकण्या प्राण अडकला आहे

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिजी गझल हा खरेच माझा प्रांत नव्हे, पण या विचारांसाठी अधिक चांगला form सुचला नाही.
पण तुम्हाला यातले काही आवडले हे वाचून खूप आनंद झाला, फेबुवरही तुम्ही कौतुक केले याबद्दल आभार Happy

तुझ्या नि माझ्या नात्याबद्दल प्रवाद उठला आहे
बंधामधल्या शुभ्रपणाला डाग लागला आहे

व्वा.

बेफिजी गझल हा खरेच माझा प्रांत नव्हे

असे काही नसते. गझल जमता-जमता जमते. सातत्याने प्रयत्न आवश्यक आहे इतकेच.
शुभेच्छा.

समीर

शेवटचे म्हण, "तुझीच होते" नंतर जा माघारी
असून मिथ्या हेच ऐकण्या प्राण अडकला आहे

>>>>>

वाह!
जियो अमेयभाय!

शेवटचे म्हण, "तुझीच होते" नंतर जा माघारी
असून मिथ्या हेच ऐकण्या प्राण अडकला आहे >>>> क्या बात है ..... सॉलिड आवडलाय हा शेर ....

आवडली

गझल छान आहे.

'भूताचा' शब्द 'भुताचा' असे लिहित असावेत.

नुसता 'भूत' असेल तर दीर्घ 'भू' बरोबर पण पुढे काही जोडून आल्यास 'भू' र्हस्व येईल. भुताचा, भुतासाठी वगैरे.

शुभेच्छा.