देहाचा गाभारा

Submitted by पल्ली on 11 January, 2015 - 02:25

मनाच्या झरोक्यातुन आठवणींचा एक किरण
सुंदर नाजूक तेजस्वी!
डोकावतोय देहाच्या गाभार्‍यात..
एका अचेतन देहात
चेतनेचा प्रवेश.
सोबत आहेतच
काही उपद्रवी पण क्षुल्लक धुलिकण..
पण त्या धुलीकणांनाही
किरणांनी तेजाची झळाळी दिलीय.
सारं कसं छान भासतंय.
आठवणींच्या किरणांचा
एक झिरझिरीत कवडसा
ऊमटला डोळ्यांच्या
नितळ आरश्यात...
एक क्षणभर..
अगदी क्षणभर
एक प्रकाशाची दिव्य शलाका
नजरेत ..
आरश्यावर अनाहूत
वादळी पावसाचं आक्रमण..
थेंब थेंब वहात जातायत..
अन मग
सारा देहाचा गाभाराच वाहून गेला...
आता कुठल्या ईश्वराची इथे
प्रतिष्ठापना करु?
गाभारा आधी शुचिर्भूत करायला हवा.......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users