"फेसबूक"

Submitted by -शाम on 30 December, 2014 - 23:54

(रात्रीची वेळ - पती काँप्युटरवर)
तो- (प्रवेश) इंतहा होगई इंतजारकी, आयी ना कुछ खबर मेरे यार की|
ये हमें है यकीं बेवफा वो नही, फिर वजह क्या हुई इंतजार की|
(कॉम्प्यूटरवर हात मारत ) कमॉन... कमॉन..
ती- (प्रवेश) अंबानीच्या टॉवरमागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या ओंडक्याला झोप का गं येत नाही.
तो- अगं अंगाई काय गातेस ? झोप येत नाहीये का तुला?
(ती आळस देते तिच्याकडे बघत) मुंबईत काय पोरी कमी होत्या, की बापानं हे ध्यान बांधलंय गळ्यात?
ती- काय म्हणालात?
तो- काही नाही. झोपायची वेळ झाली नाही का तुझी?
ती- झोपायची? अजून थोड्या वेळानं सूर्य उगवेल. वेळेचं भान आहे कुठं तुम्हाला. मी काय म्हणते असं रात्र रात्र
जागत बसण्या सारखं आहे तरी काय या खोक्यात ?
तो-खोक्यात?.. तू याला खोका म्हणतेस? अगं हा काँप्युटर आहे काँप्युटर. याला काँप्युटर म्हणायचं.
ती- मग याला चाकं कुठयेत?
तो- चाके? चाकांचा काय संबंध?
ती-म्हणजे बघा, टॅक्ट$$$र्,ला चाकं असतात?
तो-हो
ती- डंप$$$$र्,ला चाकं असतात?
तो-हो
ती- स्कूट$$$$रला?
तो-हो
ती-झालच तर मोट$$$र, लाही असतातच की? मग ह्या काँप्युट$$$$र, ला चाकं नको?
तो- अरे हो की, उद्याच लावून घेतो हां. आणि मग तू अशी यावर बसून भाजीला वगैरे जात जा.
मीही ऑफिस वगैरेला नेत जाईन अधुन-मधुन..आयला बायको आहे की भीताड.
अगं या हिशेबाने तर तुझ्या मद$$$र आणि फाद$$$र,लाही चाकं बसवून घ्यायला हवी, झालच तर ब्रदर
आणि सिस्टरलाही.
ओ ऊ,, पण नको, महिण्यातून चार-चार ट्रीपा व्हायच्या इकडेच.
तू आपली याला संगणकच म्हणत जा.
ती- जे काय असेल ते. पण सांगा ना (लाडात) काय करत असता रात्र रात्र यावर?
तो-सांगतो. हे$$ बघ याला म्हणतात "फेसबूक"
ती-म्हणजे?
तो- घ्या आता, अगं फेसबूक म्हणजे $$ $ कसं सांगावं?
अं $$ $ हा "चर्याग्रंथ"
ती- म्हणजे?
तो-म्हणजे थोबाडाचेपुस्तक
ती-आता कोणती परीक्षा द्यायचीये तुम्हाला की इथे या पुस्तकात थोबाड घालून बसत आहात?
तो-परीक्षा नाही गं. हे मन मोकळं करण्याचं साधन आहे.
ती-म्हणजे?
तो-पुन्हा म्हणजे... हे बघ तू कशी मन मोकळं करण्यासाठी मैत्रीणींच्या घरी जाऊन गप्पा मारते. तसच मीसुद्धा
इथे बसून मैत्रीणींशी गप्पा मारत असतो
ती-मैत्रीणींशी?
तो-म्हणजे मित्रमैत्रीणींशी,, हे$$ हे$$ हेबघ (काँप्युटर दाखवत) माझा मित्र परिवार. आज भरपूर मासे गळाला
लागले होते
ती- म्हणजे तुम्ही मित्र जमून येथे मासे पकडता?ते ही इतक्या रात्री? ओ ओ कसे (लाडात) पकडता सांगा ना?
तो-अगं असे काँप्युटरवर मासे पकडता आले असते तर कोळीलोक कॉम्युटर टाकून घराच्या व्हरांड्यात मासे
पकडत बसले नसते का?
जीव धोक्यात घालून समुद्रात कशाला गेले असते? (वैतागून) आयला काय करावं राव ह्या बायकोला?
ती-ऑ$आ$ऑ$$ (रडते)
तो- आता भोकाड पसरायला काय झालं?
ती- तुम्हीच म्हणाले की गळाला मासे लागले होते आणि वरून तुम्हीच... हँ हँ ऊऊ
तो-अगं मी ती म्हण वापरली. तुम्ही बायकाही नाही का बोलताना म्हणी वापरत.
काय बरं ..ऑ'
हा.. कानामागून आली आणि नखावर मेली
ती- अशी म्हण आहे?
तो- मग.. रात्र थोडी भोंगे फार
ती- ऑ
तो-फाटक्या कंपणीला फरशा कशाला
ती- ऑ (प्रत्येक म्हणीला आश्चर्याने)
तो-बुडत्याला ताडीचा आधार,
मॉलमधे पोरी आन मुका घ्यायची चोरी
ती- अहो अहो अशा म्हणी असतात का?
तो-अगं म्हणी म्हणजे तरी काय? अं.. विशिष्ट शब्द समुहाचा लाक्षणीक अर्थ संदर्भच ना? तो लागला म्हणजे
झालं. तुला समजलं ना?
ती-का$$$ही कळलं नाही मला
तो-हे हे बघ.. हे फोटो बघ .. हे सगळे माझे फेसबुक फ्रेंड्स आहेत
ती- अगो बाई. सलमान , शाहरूख आणि ही $$ही दिव्या भारती?
अहो ही तर मेली आहे ना?
तो-अगं मरतं ते शरीर. आत्मा मरत नसतो , तो रात्री इथे येतो आणि आपले स्टॅटस अपडेट करत असतो.
ती-म्हणजे तुम्ही आत्म्यांशी बोलता?
तो- मी नाही ग बाई. आत्मे माझ्याशी बोलतात.
ती-(हातात चप्पल घेऊन) आई फूबाई वाचव ग माझ्या नवर्यातला, आल्या-गेल्यांची, कॉमेडीवाल्यांच्या,
भूताखेताची, वरण-भाताची....
तो-(दृष्ट काढताना तिला मधेच थांबवत)अगं अगं थांब माऊली. मी सांगतो थांब. अगं हे नुसते फोटो आहेत. खरी
माणसं वेगळी असतात.
हे त्यांचे मुखवटे आहेत.
ती- असं होय. पण मी म्हणते मुखवटे कशासाठी?
तो-अगं सोपं आहे. एक तर त्यांचा खरा चेहरा दाखवण्या सारखा नसतो किंवा त्यांना दाखवायचा नसतो.
तसंही चेहर्याोवरून आतला माणूस कुठे समजतो म्हणा.
ती- मग तुम्हाला कसं समजतं की हा तुमचाच मित्र आहे?
तो-गुडक्वेशन"
ती-म्हणजे?
तो- पुन्हा म्हणजे? (वैतागून) म्हणजे .. म्हणजे..कोंबडीचे पंजे, भरतची मान.. आन क्रांतीचे था$$ थ ,, थैमान
ये ये$$ हे बघ.. हा हिरवा टिंब.
असा हिरवा असला की समजायचं...
ती- काय?
तो- ही व्यक्ति लाईनवर आहे असं समजायचं
ती-असं रात्री बेरात्री लाईनवर बसायला ही माणसं आहेत की वटवाघळं?
तो-तुला नाही समजायचं ते. त्यासाठी शिक्षण लागतं?
ती- हं ... शिक्षान म्हणे
तो-शिक्षान नाही गं... शिक्षण
ती- कळलं. शिक्षण, मलाही म्हणता येतं.पण शेण खाण्याच्या शिक्षणाला शिक्षान म्हणावं नायतर काय?
तो- म्हणजे.. काय ..काय म्हणायचंय काय तुला?
ती-मला म्हणायचंय ही कोपर्या.तली नटवी कोण आहे. आणि तुमच्याकडं बघून अशी काय करतीये?
तो-ही.. अग ही माझी कोणी नाही. ती जाहीरात आहे. दाढीच्या क्रिमची .. टिव्हीवर असते तशी.
ती-मग बाई ह्यात काय करतीये..
तो- तिचीही इच्छा असेल दाढी करण्याची आपल्याला काय? तू इथे बघ इथे ..खाली ..याला म्हणतात "चॅटविंडो".
ती-अहो तुम्हाला काही लाज शरम, दिवस उगवायला आलाय आणि..
तो-ये ये $$ बाई, अगं तू खिडकीतून शेजारच्या काकूंना विचारतेस ना ? की, "तुम्हारे नळ को पाणी है क्या?"
तशी ही संभाषणाची खिडकी आहे. इथे लेखी स्वरूपात संभाषण करता येते. असे हजारो मित्र मी जमवले
आहेत आहेस कुठे.
ती- मी इथेच आहे. तुम्ही मात्र नाहीत. अहो असे नेटाने मित्र जमवण्यापेक्षा एखादाच पण नीटसा मित्रही पुरतो
आयुष्याला.
तो- खुजे विचार आहेत हे, अग जरा व्यापक आणि विस्तृत विचार करून बघ.
ती- जी माणसं तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांना प्रेम द्यायचं सोडून, त्यांच्याशी बोलायचं सोडून्, त्यांना
वेळ द्यायचं सोडून,
तुम्ही खरा चेहरा दडवणार्याा अनोळखी लोकांशी गप्पा मारण्यात आयुष्य खर्च करत आहात..
हा किती व्यापक आणि विस्तृत विचार आहे, हे तुम्हीच बघा.

________________________________________________शाम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol मस्तच .प्रत्येक पंच भारी .म्हणी तर Rofl मी तर फॅन आहे 'फुबाईफु 'ची Happy
शेवट पटला म्हणुनच मला फेसबुक तीतकसं आवडत नाही .

>> मरतं ते शरीर. आत्मा मरत नसतो , तो रात्री इथे येतो आणि आपले स्टॅटस अपडेट करत असतो.>> धमाल आहे. Lol

मरतं ते शरीर. आत्मा मरत नसतो , तो रात्री इथे येतो आणि आपले स्टॅटस अपडेट करत असतो.>> धमाल आहे.. +१