...का आज सारे गप्प

Submitted by कोकणस्थ on 26 December, 2014 - 05:57

...का आज सारे गप्प
आपल्यांची हाक आली!
कुंपणापार ती निरागस
अन् आसामी का निराळी?

तेव्हा पेटले गहिवर वन्हि
झाल्या मेणबत्त्यांच्या मशाली
आज आपुलेच वाहता रक्त
का वाटे व्यथा निराळी?

तुम्हा न गोड लागे
तेव्हा अन्न अन् पाणी
गात्रे आज ती थिजली
अन् बसली दातखीळ साली!

ना शब्द करुणा ल्याले
ना ओल डोळा आली
आज पुन्हा का तुमची
विवेकबुद्धी नग्न झाली?

ना निषेध दिसला कोठे
ना दिसल्या षंढ चर्चा
का आज शब्द रुसले
अन् मने रिकामी झाली?

माणुसकीचा येता गहिवर
व्हा आपल्यांचेही वाली, अन्यथा...
कळणार नाही दहशत
अंगणात केव्हा आली!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणस्थ,

>> का आज सारे गप्प?

एक उत्तर सापडलंय. हे पहा :

आ.न.,
-गा.पै.

गामा, ते चित्र किंवा जे काही आहे ते दिसत नाही इथे. माबोवरच्या तुमच्या खात्यावरच अपलोड करणार का कृपया?

डिसेंबर २०१४ मध्ये होणार्‍या हत्याकांडाबद्दल राजदीप सरदेसाई यांनी जुलै २०१२ मध्येच ट्विट केलं होतं?

ही त्यांची आताची ट्विट्स आहेत.
rajdeep.png

परफेक्ट मयेकर Happy

बाकी आसाम हत्याकांडाचा निषेध आहे.
असली मानसिकता असणार्‍यांना भर चौकात फाशी द्यायला हवी.

ज्यांना निषेध करायला कमीपणाचे वाटत असेल त्यांनी अ‍ॅक्शन घ्यावीच.

दिदे, उशीरा का होईना, हत्याकांडाचा स्पष्ट शब्दात निषेध केल्याबद्दल अभिनंदन.

उशिर नाही. अ‍ॅक्शनवाले काय करत आहे हे बघत होतो. बाकी जिथे करायचा तिथे वेळेवर केला आहे. इथे अ‍ॅक्शनजॅक्शन आहेत म्हणुन थांबलो होतो

कोकणस्थ, आसाम बर्‍याच वर्षापासुन धगधगतोय, अगदी काश्मिरसारखा. कारण बान्गला देश जवळ आहे. कश्मिरला पाकीस्तान आणी आसाम ला बान्गला देश. कसेही करुन चीन आणी पाकिस्तान याना भारताचे तुकडे झालेले हवे आहेत. यावर नुसतीच चर्चा बरीच झालीय, पण नो रिझल्ट. सिनेमा, सौन्दर्या मुळे कश्मीर चर्चेत राहीला, आसाम मात्र राहु शकला नाही. तुम्ही आज एक घटना वाचली, पण दुर्दैवाने तिथे असे हजारो गेलेत. रोज मरे त्याला कोण रडे अशा घटनानी मने स्वकेन्द्रीत झालीत. मुम्बई असो वा दिल्ली, सन्ध्याकाळी घरी येणारा, आजचा दिवस गेला, मी जिवन्त आहे या समाधानात असतो.

बोडो अतीरेक्याना तिथे परके कुणी नकोत, फक्त असामी च हवेत. तिथे येणार्‍या, स्वस्तात काम करणार्‍या बिहारी-बन्गाल्याना पण त्यानी झोडपलेय. काहीही असो असल्या हत्याकान्डाचा निषेध.

भारताच्या भूमीवर घडणार्‍या अशा प्रकारच्या हत्याकांडांचा, मग ती कुठल्याही राज्यात घडणारी असोत, मनापासून निषेध!! अशा हत्याकांडामधे सामिल असलेल्या सर्व अतिरेक्यांना, त्यांचा धर्म-जात-भाषा ई. बाबींचा मुलाहिजा न ठेवता कठोर शिक्षा व्हावी. अशा घटना पुन्हा घडु नयेत याकरता योग्य त्या उपाययोजना राज्य-केंद्रसरकारांनी समन्वय राखुन कराव्यात.

रश्मी आणि श्रीमान सत्यवादी यांच्याशी सहमत.

आसामच्या भेकड आणि नृशंस हत्याकांडाचा तिव्र निषेध!

कोकणस्थ, कविता मनाला भिडली.

आसाम व एकूणातच पूर्वोत्तर भारताच्या समस्यांचा अभ्यास व उपाययोजना आता युद्धपातळीवर व्हायला हव्या आहेत. लष्करी कारवाई वेगाने करणार अशा बातम्या वाचल्या, पण त्या बरोबरच स्थानिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला जायला हवा. तुम्हा-आम्हा सामान्य लोकांनीही आपले ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. त्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना व इतरांना चायनीज असं हिंणवलं जातं, मग ते लोकही त्यांच्या त्यांच्या राज्यातून भारतातल्याच इतर राज्यात जाताना "इंडिया जा रहे हैं" असं म्हणतात. हे बदलायला हवं.

आम्ही आसाम मधे तिन वर्ष राहिलो आहोत.संध्याकाळी सहा नंतर घराबाहेर पडायचो नाही.फिरायला वगैरे गेलोतर
ग्रुप करुन जायचो."आसाम" खुप निसर्ग सौंदर्याने नटलेले राज्य आहे पण उग्रवाद्यानी सगळा सत्यानाश केला आहे.

कोकणस्थ, पूर्वेकडच्या राज्यात जायला आपल्याला व्हिसा लागतो, त्यामुळे हे लोक भारतात जातोय असे म्हणत असतील. आता हा व्हिसाच रद्द केला पाहीजे, आणी लवकरात लवकर ह्या राज्याना सोयी-सुविधा देऊन प्रगती घडवुन आणली पाहीजे. पर्यटन हा त्यान्चा काश्मीरप्रमाणे मुख्य व्यवसाय आहे. सेव्हन सिस्टर्स माहीत असेलच सगळ्याना.

पूर्वेकडच्या राज्यात जायला आपल्याला व्हिसा लागतो>>>>

रश्मीताई, मी हे पहिल्यांदा ऐकतोय. माझ्या माहितीप्रमाणे भारतातील कोणत्याही राज्यात जायला भारतीय व्यक्तीला व्हिसाची गरज नसते. जम्मु आणि काश्मीर, सिक्कीम ह्या राज्यात सुध्दा नाही.

पूर्वेकडच्या राज्यात जायला आपल्याला व्हिसा लागतो>>>>
हो व्हिसा घ्यायला लागतो.आम्हाला अरुणाचल प्रदेशला जाताना घ्यायला लागला होता त्याला व्हिजिट परमिट म्हणतात.राज्याच्या सिमेतुन आत जाताना तो सिमेवरच देतात.

हे मी साप्ताहीक सकाळमध्येच वाचलेले आहे. मेघालय आणी त्रिपुरा सारख्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीयाना व्हिसा लागतो. एका ट्रॅव्हल क. ने देखील याची पुष्टी केली होती. तारीख वा लिन्क देऊ शकत नाही, क्षमस्व!

व्हिसा नाही इनर लाइन परमीट लागते. एन्ट्री पॉईन्ट / चेक पॉइन्ट जवळ चौक्या आहेत तेथे १५ दिवसाचे ILP सहज मिळते.

सुरेख, अन्तःकरणापासुन धन्यवाद. वेळेवर धावुन आल्या तुम्ही, नाहीतर काही खरे नव्हते.:स्मित:

भरत मयेकर,
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान गावात जायला पण पैसे भरून परमिट घ्यावे लागते. आत कुठेही ते परमिट कुणी ऑथॉरिटीने विचारताच दाखवावे लागते. पण त्याला कुणी माथेरानचा व्हिसा नाही म्हणत.
इनर लाईन परमिट आणि व्हिसा या फार फार वेगळ्या गोष्टी आहेत.

(आणि हो, माथेरानमधल्या माणसाला माथेरानच्या बाहेर नेरळ गावात यायला परमिट्/व्हिसा इ काही लागत नाही हां.

त्याला जर इनर लाईन परमीट म्हणतात, तर सकाळ ( साप्ताहीक) वाल्यानी त्या वेळी असे का छापले माहीत नाही. कदाचीत त्यान्चाही गोन्धळ झाला असेल. पूर्वी गोवा भारतात विलीन व्हायच्या वेळी सुद्धा असेच होते म्हणे.

.

<,जास्त गोड खाल्यामुळे मधुमेह होतो आणि गंमत म्हणजे ते गोड आपणच स्वत: हाताने खातो.>>

इन्सुलिन घ्यायचे त्यात काय..

Pages