अफलातून धंदे

Submitted by रमेश भिडे on 24 December, 2014 - 01:50

नुकत्याच भारत भेटीमध्ये एका मित्राने काही किस्से सांगितले. मुंबईत लोक कायकाय धन्दे करतील याचा नेम नाही :

१) काही लोक अमेरिकेत ट्रस्ट चालवतात आणि अमेरिकेतून वापरलेले कपडे हिंदुस्तानात गरीब लोकांना वाटण्यासाठी घेऊन येतात (विना मुल्य आणि विना इम्पोर्ट ड्युटी) आणि मुंबईत रस्त्यावर `स्वस्त कपडे' म्हणून विकतात.

२) एक माणूस ऑफिस मध्ये आला होता. माझ्या गाडीचा एक्सिडेंट राजेस्थानला झाला, ड्रायवर पळून गेलाय. म्हणून दुसऱ्या एका ड्रायवरला राजेस्थानच्या एका गावात पोलिस स्टेशन मध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातोय, १०,०००/- मागतोय, कारण १ दिवस जेल मध्ये बसावे लागेल. पण ५,०००/- वाला कोणीही मिळत नाही, म्हणून ह्याला झक मारून घेऊन जावे लागणार'
म्हणजे एक्सिडेंट करणारा दुसराच कोणीतरी, हजर होणारा वेगळाच, जो हजर होणार त्याला १०००० आणि पळालाय तो सुद्धा सुखी, `नशीब पोलिसांच्या लफड्या मध्ये अडकलो नाही'

३) काही लोकांचा धंदा म्हणजे आर.टी.आय. फाईल करणे आणि नंतर त्या कंपनीला, त्याच्या मालकाला आर.टी.आय. च्या आधारे मिळवलेल्या माहितीद्वारे ब्ल्याकमेल करून पैसा कमवणे.

४) आर.टी.आय वरून ब्ल्याकमेल करत असणाऱ्यांना बदडवून काढणे आणि पैसे कमवणे

*अभय जोशी ,डहाणू. यांच्या अनुभवांवर आधारित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुद्या ना भिडे साहेब. हे आमच्या देशात चालतं. तुम्ही कशाला त्यावर धागे काढताय? त्यापेक्षा अमेरिकेमध्ये काय धंदे चालतात ते लिहिलंत तर आम्हाला मज्जा येईल वाचताना.

हे आमच्या देशात चालतं. >> तुमच्या देशात नाही, आमच्या मुंबईत... --- मुंबईत लोक कायकाय धन्दे करतील याचा नेम नाही Wink

मध्यंतरी स्वाईन फ्लू की काय कसल्या साथीच्या वेळी नाकाला लावायचे मास्क अव्वाच्या सव्वा किंमतीत पेपर वाटप केल्यासारखे फिरते विक्रेते विकायचे. लोकांची असली झुंबड. विकत घेऊन नाकाला लाऊन पेशंटसारखे फिरायचे.

त्या दिवशी ट्रेनमध्ये एकजण ८ की १६ जीबीचा पेनड्राईव्ह शंभर रुपयांना विकायला आलेला. लोक घ्यायला घाबरत होते जरा. १०० रुपये जाण्यापेक्षा पोपट झाला तर, लाज जाईल याचीच भिती जास्त. मग एकाने लेपटॉप काढून एक-दोन पीस चेक करून पाहिले. लागलीच झुंबड उडाली आणि हातोहात खपले गेले. पुढच्या स्टेशनला तो पेनड्राईव्हवाला आणि लॅपटॉप वाला दोघेही उतरले. एकच असतील तर काही कल्पना नाही.

उल्हासनगरला एक लोकल प्रवाशांचा ग्रुप आहे असे ऐकले आहे.हा ग्रुप रेल्वे प्रवासात टिसीने पकडले तर त्यासाठीचा विमा म्हणून कार्यरत आहे.या ग्रुपचा सदस्य होण्यासाठी जो काही असेल तो "प्रिमिअम" भरायला लागतो. गाडीत किंवा स्टेशनवर टिसीने धरले तर त्या टिसीला कस्पटासमान लेखून अजिबात बोलाचाली न करता आपण दंड भरून टिसीवर फार मोठे उपकार करत आहोत या आविर्बावात रितसर दंड भरून पावती घ्यायची आणि ती पावती या ग्रुपकडे सादर केल्यानंतर संबंधित सदस्याला तेवढे पैसे त्या ग्रुपकडून मि़ळतात. (अर्थात ही सगळी ऐकिव माहिती) यातूनही तो ग्रुप पैसे कमावत असल्यास किती हे माहित नाही...

साभार - क्लिंटन्/मिसळपाव

पण यामधे जर रितसर दंड भरायचा असेल आणि तो ग्रूप जर ते दंडाचे पैसे परत देणार असेल तर यात त्या ग्रूपचा काय फायदा ? Uhoh

आमची माणसे पुढल्या गाडीने निघून गेली, आम्ही मागे राहिलो, पैसे नाहीत तिकिटाचे जरा मदत करो हो!!! असा मध्यंतरी काही लोक गर्दीच्या ठिकाणी धंदा करायचे, केली सुधा अशी मदत, पण हर नाक्यावर एक दोन दिवसाच्या फरकाने अशी लोके भेटायला लागली. आणि यांच्या थापेतला फोलपणा कळला. आताश्या कोणी म्हातारी माणसे असे पैसे मागताना दिसली कि कीव येते.

ह्म्म्म म्हणजे यामधे आधी प्रिमिअम भरावा लागणार आणि जर दंडाची रक्कम ही वाढत गेली तर प्रिमिअम पण वाढत जाणार. आलं लक्षात !

नाही महेश, समजा १० माण्सांनी या गृपकडे वर्षभर प्रिमियम भरला आणि त्यतील २ जणांनाच एकेकदाच र्टिसीने पकडले तर?? बाकीचे पैसे त्या गृपचेच की! Happy

खेडवळ दिसणारा तरुण, त्याच्यामागे गळ्यात काळे मणीपोत गळ्यात बांधलेली एक खेडवळ तरुणी, सोबत असलेच तर एखादे लहान लेकरु, तरूणाच्या खांद्यावर झोपलेले आणि हातात एखादे गठोडे अशा अवतारातले खुप लोक "ताई, तुम्ही मराठी आहात काय? आम्हाला मदत करा, गावी जायचेय, तिकीट काढायचेय, सकाळपासुन खाल्ले नाही" इत्यादी वाक्ये टाकुन मदतीचे आवाहन करतात. मला तर अशा वेळेस काय करावे सुचत नाही. कारण दुर्लक्ष करावे तर ही मंडळी अगदी खरी वाटतात, नेहमीचे हुकमी भिकारी वाटत नाहीत आणि मदत करावी तर ह्यांच्यासारखे लोक महिन्यातुन एकदा तरी भेटतातच.

मी अगदीच जीवावर आले तर १०-२० रुपये देते. मागे असेच एक म्हातारे दांपत्य भेटलेले. त्यांना कुठेच जायचे नव्हते तर फक्त खायला पैसे हवे होते. त्यांना दोन-तिनदा वडापाव घेऊन दिला. तसेही गरज नसताना आपले हॉटेलींग, शॉपिंग इत्यादी चालुच असते. मग अशा ख-या दिसणस-या लोकांसाठी १०-२० रुपये दिले तर फारसे बिघडणार नाही असा विचार करते. काळ सोकावतो वगैरे गोष्टींकडे दुर्लक्ष करते.

अहो श्रीमान, ते बेसिक लॉजिक आहेच की,
पण समजा तुम्ही मेम्बर आहात आणि तुम्ही प्रिमिअम एका महिन्याचा १०० भरलात आणि त्या महिन्यात जर तुम्हाला १०० किंवा अधिक दंड भरावा लागला, तर पुढच्या महिन्यात तो गट तुम्हाला जास्त प्रिमिअम भरायला लावणार.

साधना,
एखादवेळी अशी मदत ठिक आहे, पण सध्याच्या युगात आणखी एक करता येईल. अश्या व्यक्तींचे फोटो काढून फेसबूक, व्हॉट्स अप वर फिरवावेत म्हणजे जर ते खरेच धंदेवाईक असतील तर बाकिचे लोक ओळखू शकतील.

खुप वर्षांपुर्वी एक किळसवाणा प्रकार मुंबईत होत असे. एक बाई तान्ह्या बाळाला घेऊन, जवळजवळ नागव्यानेच फिरत असे. अगदी सकाळी सकाळी गळा काढून रडत फिरत असे. लोक तिला कपडे वगैरे देत... ते कपडे गोळा करत तिच्यामागे अंतर राखून तिचा साथीदार फिरत असे. या नाटकाला बर्‍याच बायका बळी पडत असत. पुढे हा किस्सा लोकसत्ता मधेही आला होता.

मुंबईत तरी कामाची कमतरता नाही. ज्याची श्रम करायची तयारी आहे, त्याला काम करून पोट भरता येते. त्याशिवाय अन्नछत्रेही आहेतच. त्यामूळे....

माझ्यामागे कुणी लागलं असं तर मी अगदी सगळी चौकशी करतो, बरेच जण ढेपाळतात. त्यातूनही माझी खात्री पटली तरच मदत करतो.

मला जपानमधे एका पाश्चात्त्य (युरोपिअन किंवा अमेरिकन होती आता आठवत नाही) बाईने रेल्वे स्टेशनवर धरूनच ठेवले होते अगदी, वय साधारण ५० च्यावर, जरासे अस्ताव्यस्त कपडे आणि जपानी भाषा अजिबात येत नाही, मला कसा प्रॉब्लेम आहे, खायला सुद्धा पैसे नाहीत, इ. इ. सांगत होती. मी तिला सांगितले की पोलिसांकडे जाऊन तुमच्या एम्बसीशी संपर्क कर, तर म्हणे नको पोलिस मला विनाकारण त्रास देतील, इ. इ.
मग मी रेल्वे स्टाफच्या माणसाला बोलावू लागलो तर झटकन गर्दीत पसार झाली. Sad

तात्पर्य : असे उद्योग फक्त देशातच होतात असे नाही. आता तिची केस नक्की काय होती हे कळायला मार्ग नाही.

मला वाटते उडन खटोला यानी सान्गितलेल्या बातमीत गोम अशी आहे, की ती उल्हासनगरवाली सुमारे १००० मंडळी नेहमी विनातिकिट प्रवास करतात . आणि त्या पासचा पैसा वाचवुन पासच्या निम्मी अथवा १/४ रक्कम मन्थली प्रिमियम म्हणून त्या ग्रुपच्या म्होरक्याकडे जमा करतात . म्हणजे महिनाभर विनातिकीट प्रवास करून एखाद्या दिवशी पकडले गेल्यास ती दण्डाची पावती दाखवून ती रक्कम त्याना परत मिळते. रेल्वे ला नुकसानीत टाकणारा हा पूर्णपणे बेकायदेशीर विमा आहे हा

रेल्वे ला नुकसानीत टाकणारा हा पूर्णपणे बेकायदेशीर विमा आहे हा

लोक असे बेकायदेशीर प्रवास करताहेत हे जर बाहेर तुम्हाला कळालेय तर ते अजुन ब-याच जणांना माहित असणार आणि पर्यायाने रेल्वेच्या त्या भागातील टिसीजनाही माहिती असणार. त्यांना जर हे थांबवायचे असेल तर ते रोजच्यारोज तिकिटे तपासु शकतात. जर प्रत्येक पॉलिसीहोल्डर पॉलिसीचे पैसे मागायला लागला तर विमा कंपनी बंद पडणार. ती कंपनी अजुनही बंद पडली नाहीये याचा अर्थ टिसीजनाही हप्ता जात असणार.

भीक मागणे हा धंदा एकंदरीत जगभरात तेजीत आहे. लंडनमध्ये तर चांगल्या कपड्यातले तरूण / तरूणी / जोडपी भीक मागताना दिसतात. मोक्याच्या जागी बसून दिवसभराच्या बीअर / क्लबिंगचे पैसे जमले तरी पुरे होतात.

पुर्व युरोपातून येणारे बरेच जण भीक मागून उदरनिर्वाह करताना दिसत आहेत इथे. आता त्यांना पकडून पकडून पुन्हा माघारी पाठवत आहेत.

मदत मागणाऱ्या व्यक्तीचे फ़ोटो सोशल नेटवर्क वर टाकण्याने ती व्यक्ति जर गरजू असेल तर तिला कसे वाटेल? तसेच अगदी बनवाबनवी करून पैसे उकळत असेल तरी असे फोटो टाकन्याबद्दल शंका वाटते.

bhhik magane haa garaju lokanni karanyacha dhandaa naahi naa... garaju aahe tar nidaan kaam tari maga, tasehi mumbait kaam bharapur aahe.

२/३ वर्षांपुर्वी एका दिवाळी अंकात या लोकांबद्दल एक फिचर होते. त्यात काहींनी सांगितले होते कि "मागून" जास्त कमाई होते. ( भिक असा शब्द ते वापरत नव्हते. )

सोशल मिडीयावर आपला फोटो बघू शकतात ते त्याच मिडीयावर मदतीसाठी आव्हानही करू शकतात कि !

गाव कुठला ? मुंबईत कुणाकडे आलात ? वगैरे प्रश्न मी विचारले कि ते लगेच माघार घेतात. चला जवळच्या पोलिस स्टेशनवर जाऊ, ते मदत करतील असे म्हणालो तर पळूनच जातात.

सेनापती म्हणतोय तसा अनुभव तर मला झुरीकमधेही आला, फार नाही एका सिगरेट पुरते पैसे दे असा एक सुस्वरुप दिसणारा मुलगा सांगत होता.
इथे अंगोलात मात्र मला अजून एकही भिकारी दिसलेला नाही.

रोम ( इटली) च्या टर्मिनस वर पाकिटमार व भुरटे चोर याची भिती असते. त्यामुळे काही लोक तिकडे coffee money घेउन तुम्हाला रेल्वे स्टेशन वरुन बस/ टैक्सी पर्यन्त सुरक्षित घेउन जातात. त्यासाठी ते १ ते ५ युरो चार्ज करतात.

मुंबई पुणे हायवे व्हायच्या आधीची गोष्ट. खाडी पूलही नव्हता. त्यावेळी एस टी कळवा पूलावरून जात असे. पुण्यापर्यंत रस्त्याने जायला ५ तासही लागत. त्या मानाने रेल्वे लवकर जात असे. एक माणूस मुंबईहून पुण्याला वृद्ध व्यक्तींना सोबत करत असे, अर्थात थोडे पैसे घेऊन. विश्वासू माणूस होता तो.

मागे कुठेतरी वाचलेले की भीक मागण्यासाठी तान्ही बाळे फिरवतात ती भाड्याने मिळतात आणि त्यांना कसलासा अमली पदार्थ वा नशा वगैरे देऊन १२-१४ तासासाठी ठार झोपवले असते. यात जीवाला धोका असतोच पण असेही हे दुर्दैवीच आहे.

जादा अक्कलहुशारी चालवत कोणी फ्रॉड केलेला एकवेळ परवडला, पण हे क्रूर प्रकार करणार्‍यांना पकडून फटकावले पाहिजे.

मी काही वर्षांपूर्वी पुण्याहून बंगलोरला स्लीपरने जात होतो. दोन गरीब बिचारी ८ ते १० वर्षाची मुले एका ब्रशने डब्यात पडलेला कचरा गोळा करून डबा स्वच्छा करत होती नि पैसे मागत होती. मी मनात म्हंटले व्वा, काय पण छान मुले. नुसती भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करताहेत, त्यांना त्याचा मोबदला द्यायलाच पाहिजे.म्हणून दिले काही रुपये.

चार एक तासांनी पाहिले तर तीच मुले, तोच कचरा डब्याच्या दुसर्‍या टोकाकडून पहिल्या टोकाकडे नेत होती!.

झक्की हो, भले तोच कचरा नसला तरी गोळा केलेला कचरा विल्हेवाट न लावता कुठेही टाकून जातात. बरेचदा ते साफ करण्यालाही काही अर्थ नसतोच. नेहमीचे लोकलने प्रवास करणारे अश्यांना काहीच देत नाहीत, पण इतर लोक वाह निदान काम तरी करताहेत म्हणून फसतात.

बाकी काम न करता कामाचा दिखावा हा एक व्यवसायच झाला, कैक करतात.

>>>चार एक तासांनी पाहिले तर तीच मुले, तोच कचरा डब्याच्या दुसर्‍या टोकाकडून पहिल्या टोकाकडे नेत होती!.<<<

त्यांनाच पुढे भाजपची तिकिटे मिळाली असावीत.

Pages