एक दिवस !

Submitted by snehavinay on 23 December, 2014 - 02:11

एक दिवस

रोजची धावपळ,कसलीतरी धडपड, त्यातून होणारी पळापळ..
आणि मग शेवटी पडणारा विसर..असाच काहीसा असतो एक दिवस...

एक प्रवास,
अचानकपणे झालेली ओळख, मनमोकळ्या झालेल्या गप्पा..
क्षणात विसरून सगळे हसत घालवलेले हलके क्षण अन मग त्यातून होणारी कायमची ओळख..
घेऊन असे किस्से येतो एखादा दिवस..

घर.....
त्यातील प्रेम, बालपणीचे दिवस, एक छोटासा आयुष्य..
हसणार, बागडणार, कसलीही बंधनं नसणार..
आज ते आठवताना..ते फोटो पाहताना, नकळतपणे उमटणारे हास्य..
अशाही आठवणी स्मरणारा असतो एखादा दिवस...

नाती-मैत्री-प्रेम...
आणि मग त्यांना एकत्रितपणे जपताना होणारी दमछाक..
कधी अपेक्षा तर कधी इच्छा, कधी हट्ट तर कधी जिद्दीपणा ;
कधी चिडचिड तर कधी आपलेपणा...
कधीकधी आलेला वैताग तरी हवासावासा...
सहन करायला शिकवणारा असतो एखादा दिवस..

नवीन गोष्टी, नवे अनुभव,नवे विचार, बदलणारे जग आणि त्याला असणारी आपली साथ...
यातही मग होणारी धावपळ, कसलीतरी धडपड,अनपेक्षित पळापळ..
तरीही पुन्हा विसरायला बरेच काही तयार असतो अजून एक नवीन दिवस..

Group content visibility: 
Public - accessible to all site users