विनाशकाले विपरीत बुद्धी..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 December, 2014 - 11:47

...

भाग १ इथे वाचा - http://www.maayboli.com/node/51814

भाग २ ईथे वाचा - http://www.maayboli.com/node/51894

....

आता भाग अंतिम

---

बोलावणे थेट प्रिन्सिपल सरांच्या केबिनमधून आले होते.. काय आणि कश्यासाठी याची ट्यूब पेटायला जास्त वेळ लागला नाही. पण हे घडले कसे???

आम्हाला आठवत होते की आम्ही सकाळी स्वत: रौशनला उठवून, त्याला ती रंगलेली भिंत दाखवून, त्याच्या हातात कापडाचा बोळा कोंबून, आंघोळ करायला हॉस्टेलचा रस्ता धरला होता. त्यानंतर त्याने आम्हाला खूप शिव्या घालत ते काम इमानईतबारे निभावले असावे अशीच आमची कल्पना होती. पण घडले होते ते भलतेच!..

रौशनने आमच्यावर डूख धरत ती भिंत न पुसता, थेट मुख्य कार्यालयात तक्रार केली होती. सोबत आमची नावेही स्वत:च दिली होती. बहुधा त्याला आधी घडलेल्या प्रकरणातही आमचाच हात असावा अशी शंका होती. त्याचाही हिशोब त्याने एकदमच सेटल करायचे ठरवले होते. काहीही का असेना, मित्रामित्रांमधील भांडणाला आता गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. शेवटचा पेपर लिहित होतो आम्ही,.. पण आता आमची सारी शैक्षणिक कारकिर्दच पणाला लागली होती!.

"रुनम्या, ते मी लिहिलेय, मीच जबाबदार आहे त्याला, जे काही होईल ते मी बघून घेईन. तू टेंशन घेऊ नकोस, आधी पेपर पुर्ण लिही" .. जित्याने मला परीक्षागृहातच आवाज दिला.

"बस काय जित्या,! मी नाही लिहिले कारण माझे अक्षर खराब आहे. पण यात आपण दोघेही सामील होतो. तर, आता जे काय होईल ते दोघांचेही" .. बस्स, आमच्या या संवादाने दोघांनाही तात्पुरता हुरूप आला आणि त्या हिंमतीवर आम्ही कसाबसा पेपर पुर्ण केला.

पण प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोर उभे असताना आम्हा दोघांचेही पाय लटपट कापत होते,..
"लाज वाटतेय मला आज तुमची... कॉलेजच्या दिडशे वर्षांच्या ईतिहासात कधी असे घडले नव्हते.." त्याही परीस्थितीत आम्ही चमकून एकमेकांकडे पाहू लागलो. कानांवर विश्वास बसत नव्हता. दिडशे वर्ष?? म्हणजे १८५७ चा उठाव आमच्याच कॉलेजातच झाला होता की काय?.. काही का असेना, पण हे प्रकरण पसरले तर यात कॉलेजची बदनामी होती एवढे मात्र खरे. आणि तसे झाल्यास आमची पिसे काढली गेली असती हे हि नक्की होते.

तिथून पुढच्या घडामोडी फार वेगाने घडल्या. आमचे आधीचे रेकॉर्ड चेक करण्यात आले. त्यात आम्ही दोघेही बरेपैकी हुशार मुले निघालो. पण त्याचबरोबर आमची हजेरीपटावरची दयनीय उपस्थिती देखील सामोरी आली. त्यानंतर आम्हाला शिकवणार्‍या इतर प्राध्यापकांना बोलावण्यात आले. दुर्दैवाने ज्यांना बोलावणे धाडले ते नेमके आमच्यावर डूख धरणारे निघाले. त्यांनी जित्याच्या व्यसनांचा आणि आमच्या एकंदरीत ग्रूपच्या टवाळकीचा पाढा वाचला. आता हि लढाई स्वत:ला सिद्ध करायची असल्याने मग मीच पुढाकार घेऊन प्रिन्सिपल सरांना ईतर काही शिक्षकांची मतेही घ्यायला सांगितली जी आम्हाला अनुकूल असण्याची शक्यता होती. आणि सुदैवाने तसेच घडले. मात्र ते शिक्षक देखील आम्ही असे कृत्य केले म्हणून व्यथितच झाले. पण त्याला आता ईलाज नव्हता. अखेरपर्यंत आम्ही नेटाने आमची हिच बाजू मांडत होतो की आम्ही हे रौशनला त्रास द्यावा याच हेतूने केले होते, जे तो सकाळी मेहनत घेऊन पुसेल अशी आम्हाला अपेक्षा होती, तसेच आधी घडलेल्या प्रकरणाशीही आमचा काहीही संबंध नव्हता. अखेरीस आमच्या गेल्या चार वर्षांचा लेखाजोखा आणि चारीत्र्याची माहिती घेतल्यावर प्रिन्सिपल सरांनी आमच्या या हेतूवर विश्वास ठेवायचे ठरवले आणि तसे आमच्याकडून एका कागदावर लिहून घेतले. खाली स्वाक्षरी करायच्या आधी मात्र त्यांनी एक वाक्य फेकले जे आम्हाला पुन्हा हादरवून गेले....

"जर त्या मुलीने पोलिस कम्प्लेंट केली.......... तर मात्र या प्रकरणात कॉलेज तुमची काहीही मदत न करता त्या मुलीचीच बाजू घेणार."... अर्थात हे योग्यच होते. आमचा हात दगडाखाली अडकला होता आणि तो दगड आम्हीच आमच्या हातावर ठेवला होता.

सुझायना!.. नाम तो याद रहेगा.. हे नाव आता आमच्या आयुष्यभरासाठी लक्षात राहणार होते. प्रिन्सिपल सरांच्या केबिनबाहेर पडल्यावर सर्वप्रथम आम्ही सुझायनाच्या कानावर हे प्रकरण गेले की नाही याचा शोध घेतला. पण त्यांचा पेपर उद्या असल्याने हे आता तिला उद्याच समजणार होते. पण कोणाच्या ना कोणाच्या मार्फत समजणार होते एवढे नक्की. अगदी कोणाच्या नाही तर आमच्याच क्लासमधील तिच्या मावसबहीण सेलिनाच्या मार्फत तरी नक्कीच समजणार होते.... मग का नाही सेलिनालाच विश्वासात घेऊन तिच्यामार्फतच हे सुझायनाच्या कानावर सौम्य पद्धतीने जाईल हे बघावे आणि सोबत आमचा माफीनामाही पोहोचवावा. तसेही आता वेळ पडल्यास पुर्ण कॉलेजसमोर सुझायनाचे पाय पकडायलाही आम्ही तयार होतो!..

रौशन मात्र या सर्वात कुठेही नव्हता. रौशनचा बदला घ्यायला म्हणून त्याला मारहाण केली तर त्याचे परीणाम वाईट होतील असा सज्जड दम आधीच आम्हाला प्रिन्सिपल सरांनी भरून झाला होता. अर्थात तसा काही आमचा विचारही नव्हता वा त्याच्याशी आता कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायची इच्छा नव्हती. आमच्या पुर्ण ग्रूपसाठी तो केव्हाच एक गद्दार म्हणून घोषित झाला होता!..

पण आम्ही सेलिनाच्या शोधात पोहोचलो तर तिथे आम्हाला वेगळेच चित्र बघायला मिळाले. रौशन आणि सेलिना आधीच कॅंटीनच्या आवारात चर्चेत मग्न होते. अर्थात या विषयावरच त्यांचे बोलणे चालू असावे. साहजिकच होते, एकदा का हे प्रकरण चिघळले तर ते रौशनलाही जडच गेले असते. तो देखील यात फसला असता. कारण सुझायनाच्या मागे मागे तो स्वत:ही आजवर लागला होता. सुझायनाला जर रागच काढायचा झाल्यास तिच्या द्रुष्टीने आम्ही दुय्यम ठरून तिने रौशनलाच सर्वप्रथम टारगेट केले असते. आणि या उपर हे प्रकरण आम्हा सर्वांच्या घरापर्यंत जाणे जसे आम्हाला परवडणार नव्हते तसे रौशनलाही मुळीच परवडणार नव्हते, कारण त्याचे वडील हे सामान्य सरकारी कर्मचारी होते.

ईतक्यात रौशनची नजर आमच्याकडे गेली. सेलिनानेही आम्हाला पाहिले. आम्हाला एक विखारी नजर देत रौशन तिथून सेलिनाला घेऊन निघून गेला. काय, कुठे, याचा पत्ता नाही लागला. संध्याकाळपर्यंत आमचा त्या दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही.

दुसरा दिवस आमचा कमालीच्या तणावाखाली गेला. किंबहुना पुढचे चार-पाच दिवस तसेच गेले. कधीही कॉलेजमधून फोन येईल आणि आम्हाला बोलावणे धाडण्यात येईल अशी सतत भिती वाटत होती. अजून आमचा निकाल लागायचा बाकी होता, अजून आमच्या हातात लिविंग सर्टीफिकेट पडणे बाकी होते. आमच्या पश्चात या प्रकरणात काय घडामोडी घडत होत्या याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो. आणि अनभिज्ञ राहण्यातच धन्यता मानत होतो. उगाच ज्यादा हुशारी दाखवत खबर काढायला जायचो आणि शांत झालेले प्रकरण पुन्हा उकरून निघायची भिती होतीच.

पुढे दिवस गेले, महिने गेले. ईंजिनीअरींग झाल्याचे सर्टीफिकेट हातात पडले. नोकर्‍या लागल्या. वर्षे सरली. आणि आज अचानक ते प्रकरण भूतकाळात कुठेतरी विस्मरणात पडले असताना रौशन समोर उगवला होता. हसत होता, खिदळत होता. मजा घेत सारे सांगत होता. त्याच्या चेहर्‍यावर ना झालेल्या प्रकाराची खंत होती, ना कसला आकस होता. त्यानेही तो भूतकाळ मागे सोडला होता आणि या वर्तमानकाळात तो खूश होता!..

...

अखेर औपचारीक हस्तालोंदन करत आम्ही उपहारगृहातून उठलो. ते दोघे आपल्या रस्त्याला, आणि आम्ही आपल्या रस्त्याला लागलो. परतताना माझी विचारमग्न मुद्रा पाहून माझी ग’फ्रेंड मला म्हणाली, "जो होता है अच्छे के लिये होता है,.. रब ने बना दी जोडी,.. अखेर त्याचे लग्न सुझायनाशीच झाले ना...."

मी फक्त हसलो!...
उत्तरादाखल म्हणालो, "अंह, विनाशकाले विपरीत बुद्धी,.. ती सुझायना नव्हती, तर सेलिना होती!.."

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तळटीप - सदर कथेतील नावे आणि घटना काल्पनिक असून त्यात योगायोग आढळल्यास त्याला योगायोगच समजा.

सदर कथेतील नावे आणि घटना काल्पनिक असून त्यात योगायोग आढळल्यास त्याला योगायोगच समजा. >> ही सत्य घटना नाहीये ? पहिल्या भागात विलक्षण सत्य घटना लिहिलेलेस ना ? ह्या लेखनावरची प्रतिक्रिया त्यानुसार बदलेल.

असामी,
पहिला भाग सत्यघटनेचाच होता, पुढच्या भागांमध्ये काही असत्यघटना घुसवल्या आहेत, मग नेमक्या कोणत्या सत्य आणि कोणत्या असत्य हे फोडून फोडून दर्शवण्यापेक्षा खाली सरसकट असत्यघटना म्हणून घोषित करणे सोयीचे पडते ना..
ज्या दिवशी आत्मचरीत्र लिव्हायला घेईन तेव्हा एकूण एक सत्यघटना हे नक्की Happy

हस्तालोंदन >>>> चुकले काय परत माझे व्याकरण?

ह्या लेखनावरची प्रतिक्रिया त्यानुसार बदलेल.
>>>>>>
हा प्रतिसाद सत्यघटना समजूनच येऊ दे, खास करून माझ्यासंबंधित असल्यास, जर तो सत्यघटनेच्या भागावर असेल तर तो तसा मी स्वत: स्विकारेल.

हा प्रतिसाद सत्यघटना समजूनच येऊ दे >> तसे असेल तर तुझी त्यांना पाहून दिलेली reaction योग्य वाटली नाही. ज्या घटनेची संपूर्ण जबाबदारी तुझी आहे हे तुलाही मान्य आहे त्या घटनेबद्दल तू मित्राला "हरामखोर... तू हिच्याशीच लग्न केलेस!.. कुठल्याही मजाकमस्करीच्या टोनमध्ये नसून अस्सल रागाच्या आवेशात! " म्हणणे पटले नाही. (का म्हटले असे तेही कळले नाही खरंतर )
नंतर तू त्याबद्दल कुठे मित्र किंवा सेलिनाकडे दिलगिरी व्यक्त केलेली दिसली नाही (कमीत कमी तसे लिहिले नाहियेस).

हस्तालोंदन >>>> चुकले काय परत माझे व्याकरण? >> नाही रे, हस्तांदोलन असा शब्द आहे. हस्त = हात आंदोलन= हेलकावा अशा दोन शब्दाने बनलेला हा हँडशेक साठी पर्यायी मराठी शब्द आहे.

काही कळले नाही. सेलिनाशी लग्न केलं तर त्यात विनाशकाले विपरीत बुद्धी काय ?
तसेच त्याला झाल्या प्रकाराची खंत का असावी ?

असामी, मैत्रेयी
आपल्या प्रश्नांची उत्तरे बहुधा या पोस्टमध्ये मिळतील.

सर्वप्रथम त्या रंगरंगोटीचे कुठलेही समर्थन करायचे नाही, जे घडले ते चूकच होते. पण त्याचबरोबर त्या वेळची परीस्थिती आणि मनस्थिती पाहता ते बस्स घडले. आणि त्याचा हेतू फक्त रौशनला त्रास देत ते सकाळी पुसायला लावणे हाच होता. मात्र त्याने तसे न करता थेट तक्रार करणे तेव्हा सर्वांनाच धक्का देऊन गेले. कारण याचे परीणाम काय होतील याची त्यालाही कल्पना असावीच. अगदी आमच्या ग्रूपमधील त्याच्या खास मित्रांनीही त्याच्या या कृत्याला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे गद्दार हरामखोर हि विशेषणे त्याला तेव्हाच पडली. मी दिलेली नसून सर्वानुमते पडली.

आणि एका द्रुष्टीने पाहता हे प्रकरण जगजाहीर करायचे श्रेयही त्यालाच जाते.

विनाशकाले विपरीत बुद्धी हे शिर्षक खरे तर त्या दिवशी आम्ही जी घोडचूक केली त्यासाठी आहे. त्याऐवजी रौशनला त्रास द्यायला काहीतरी वेगळे केले असते, तर ते परवडले असते. पण आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती.

सेलेनाशी रौशनने लग्न केले याच्याशी या शिर्षकाची ओढूनताणून सांगड घालता येईल, जसे की आता रौशनही स्वत:च तक्रार करून फसला आणि या प्रकरणात गुंतला असल्याने तो यातून बाहेर पडण्यासाठी सेलेनाला पटवायला गेला पण मुळात तिलाच रौशन आवडत असल्याने तिनेच त्याला गटवले वगैरे वगैरे....... पण असो, कारण मूळ घटनेत मात्र रौशन आणि सुझायनाचे लग्न झाले आहे Happy

कधी कधी आपण काही गोष्टी, काही व्यक्ती, काही नाती गृहीत धरतो.. आणि मग फसतो!

हे वाक्य माझे नसून आम्हाला त्या प्रकरणातून सोडवणार्‍या एका शिक्षकांचे आहे.

आणि एका द्रुष्टीने पाहता हे प्रकरण जगजाहीर करायचे श्रेयही त्यालाच जाते.>> तुम्हाला पण जाते की. तुम्ही लिहीले नसते तर आम्हाला हे आधुनिक रामायण कसे समजले असते. धन्यवाद.

सेलेनाशी रौशनने लग्न केले याच्याशी या शिर्षकाची ओढूनताणून सांगड घालता येईल, जसे की आता रौशनही स्वत:च तक्रार करून फसला आणि या प्रकरणात गुंतला असल्याने तो यातून बाहेर पडण्यासाठी सेलेनाला पटवायला गेला पण मुळात तिलाच रौशन आवडत असल्याने तिनेच त्याला गटवले वगैरे वगैरे....... पण असो, कारण मूळ घटनेत मात्र रौशन आणि सुझायनाचे लग्न झाले आहे > ह्या वाक्याला बर्‍याच प्रकारे वाचायचा प्रयत्न केला, पण ओढूनताणूनच काय, उसवून, फाडून, चिंध्या करून, चिंध्यांची गोधडी शिवूनसुद्धा सांगड लावता आली नाही. Proud 'वगैरे वगैरे' लिहून आपण काहीतरी स्पष्ट करून सांगितले आहे, हे दाखवायची युक्ती त्या इंजिनीयरींगच्या पेपरामध्येच चालते हो. Light 1

अमा, पण नावगाव बदलले आहे..
तसेच आता कालापरत्वे संदर्भ देखील बदलले आहेत, त्या काळी आम्ही छापलेली पत्रिका गेल्याच महिन्यात खरी झाली आहे.

भास्कराचार्य,
अहो मग इग्नोर मारा,
आधीच्या पॅरामध्ये शिर्षकाचा खरा अर्थ दिलाच आहे, आणि नंतरच्या लाईनमध्ये खरे काय घडलेय ते देखील सांगितले आहेच Happy

बाकी ते वगैरे वगैरे मागचे लॉजिक बरोबर ताडलेत Proud

हो, पण मग उगाच ती अजून एक सांगड घालायची धडपड कशाला? जे आधी सांगितलेले ते मान्य आहेच. Happy

कबूल!
काय केवढे लिहावे की लिहू नये या नादात ते तसे झाले .. कारण प्रश्न माझ्या एकट्याचा नसून या कथेत ईतरही पात्रे आहेतच, त्यामुळे थोडा कन्फ्यूज होतो.

आता नवीन धागा कोणता येणार आहे? आपल्या सिद्धहस्त कीबोर्ड्मधून स्त्रवणारे अमृत पिण्यास सर्व माबोकर आतूर झाले आहेत.

लग्नाआधी दिवस गेलेली मुलगी दरीत उडी टाकून जीव देऊ पाहात आहे असा एखादा स्मायली कोणाकडे आहे का?

Light 1

अवांतराबद्दल क्षमस्व!

माझ्याकडे (एकुण सगळ्यांचा)स्त्रीयांचा आणि त्यांच्या निर्णयांचा रिस्पेक्ट करणारी स्माईली आहे. हवीय का?

बेफिकीर,
हे आपले पहिल्या भागातील प्रतिसादाचा भाग देतोय,
<<<<ज्यात काही स्मृती, किंचित 'सगळ्या जगाचे असते तसेच' आणि विषय अगदी ' आम <<<<>>
आता कोणीही सांगा, अशी घटना आम इन्सानच्या आयुष्यात सहजगत्या अन आमरीत्या घडते का? माझ्या आयुष्यात घडली तर सांगितली. गंमतीचा भाग म्हणजे मीठमसाला न लावता उलट आणखी अळणी स्वरूपात पेश केली.

केवळ रोशन शुभविवाह सेलिना इतके लिहिल्यानं प्रिन्सिपल एवढा भडकला????

एकदा गोजो कॉलेजमधून त्याला चक्कर मारून आणायला हवी होती. ग्राफिटी वॉल ही संकल्पनाच क्लीअर कट समजली असती. Proud

नंदिनी,
अहो पण एका मुलामुलीच्या संमतीशिवाय त्यांच्याविषयी असे पब्लिकली लिहिणार तर कोणीही भडकणार नाही का?

जर आपली समजण्यात गल्लत होत नसेल आणि आपल्यामते हे असे कुठल्या कॉलेजमध्ये चालत असेल तर मी पुन्हा नोकरी सोडून तिथे अ‍ॅडमिशन घ्यायला तयार आहे Happy

Pages