क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॉस झाल्यावर शास्त्रीने धोनीला बिनदिक्कत विचारलं, ' अमेरिकेत सामना आहे; या नविन मार्केटबद्दल काय वाटतं ? '. या प्रश्नातच या छोट्या मालिकेचं सार दडलेलं असावं.

भाऊ Happy

प्रेक्षकांतले बॅनर्स मस्त होते. एकाने २०१६ ला हिलरी, ट्रम्प आणि धोनी तीन पर्याय लिहून धोनीला निवडले होते :). एकाने साक्षी व सिंधू चा बॅनर धरला होता.

<< हिलरी, ट्रम्प आणि धोनी तीन पर्याय लिहून धोनीला निवडले होते >> मीं यातला जाणकार नाहीं पण बरेच अमेरिकन्सही तिसरा पर्यायच नाही म्हणून चुकचूकताहेत [असं वाटतं * ] आणि इथल्या मिडीयाला धोनीच्या निवृत्तिची काळजी पडलीच आहे ! एका दगडात दोन पक्षी !! Wink
[* या निवडणूकीबाबत कुणा अमेरिकनची कॉमेंट वाचनात आली - Which lunatic should run the asylum ! ]

"या नविन मार्केटबद्दल काय वाटतं ? '. या प्रश्नातच या छोट्या मालिकेचं सार दडलेलं असावं." - परदेशातल्या भारतीयांकडे पैसा आहे, वेळप्रसंगी ते तो खर्च सुद्धा करतात (ह्या मॅच ची तिकिटं किमान $१०० पासून होती ह्याआधी झालेले क्रिकेट सामने $४० च्या तिकीटात बघितलेले लोक्स आहेत). पण भारतीय लोकं हा खर्च अमेरिकेत क्रिकेट बघायला मिळणार ह्या नवलाईपोटी आणी क्रिकेट च्या वेडापायी करतात. बीसीसीआय सोन्याची कोंबडी कापायची चूक करणार नाही अशी अपेक्षा आहे. अती ताणलं तर बरेच सशक्त पर्याय ईथे उपलब्ध आहेत. खर्च करण्याची तयारी असलेले देसीच वेळप्रसंगी 'फुकट तिथं चिकट' वृत्तीचा अतिरेक सुद्धा करून दाखवतात.

अती ताणलं तर बरेच सशक्त पर्याय ईथे उपलब्ध आहेत. खर्च करण्याची तयारी असलेले देसीच वेळप्रसंगी 'फुकट तिथं चिकट' वृत्तीचा अतिरेक सुद्धा करून दाखवतात. >> Happy

इथल्या क्रिकेटच्या लीग मॅचेस ला मिळणारा प्रतिसाद बघता मोठे मार्केट untapped ठेवलय हे खरं.

जबरी पोटेन्शियल आहे मार्केटचे. भारतीय तर आहेतच, पण २०-२० वाले सामने बेसबॉल पाहणार्‍यांना जर आवडू लागले तर प्रचंड मोठा कस्टमर बेस आहे, आणि भरपूर खर्च करणारा. एरव्ही क्रिकेट हे बेसबॉल पेक्षा स्लो आहे पण २०-२० वाला फॉर्मॅट तितकाच फास्ट आहे, कदाचित जास्तच.

"जबरी पोटेन्शियल आहे मार्केटचे." "मोठे मार्केट untapped ठेवलय हे खरं" - दोघांशी सहमत. फरक ईतकाच आहे की ईथे कस्टमर सर्व्हिस / करमणूक व्यवस्थित द्यावी लागेल. 'चलता है' अ‍ॅटीट्यूड / प्रेक्षकांना गृहीत धरणं काही दिवस चालू शकेल, फार नाही.

बेसबॉल च्या गेम्स ना फॅमिली एंटरटेनमेंट हा मोठा भाग असतो. मॅस्कॉट्स बरोबर मुलांना ग्राऊंडवर फिरायला, फोटो काढायला मिळणं, अधून मधून छोट्या छोट्या गोष्टी प्रेक्षकांत भिरकावणं (टी-शर्ट्स/ स्ट्रेस बॉल्स ई.), गेम संपल्यावर प्रेक्षकांसाठी फटाके / कुठल्या तरी छोट्या छोट्या स्पर्धा ह्या प्रकारांमधून प्रेक्षकांची involvement खूप असते. एकंदरीतच अमेरिकेत कुठलाही ईव्हेंट प्रेक्षकांसाठी एंटरटेनिंग आणी ईंटरॅक्टीव्ह करणं हा फोकस मोठा असतो. तो सांभाळला गेला तर क्रिकेट च काय, जोडी-साखळी / विषामृत वगैरे खेळ सुद्धा लोकप्रिय होतील.

हो बरोबर आहे फेरफटका. भारतात पूर्वी भर उन्हात कॉन्क्रीट च्या स्लॅब्ज सारख्या सीट्स वर पाण्याबिण्याची फारशी सोय नसताना सुद्धा प्रेक्षक दिवसभरात २००-२५० रन्स बघायला मैदान भरवत :).

"भारतात पूर्वी भर उन्हात कॉन्क्रीट च्या स्लॅब्ज सारख्या सीट्स वर पाण्याबिण्याची फारशी सोय नसताना सुद्धा प्रेक्षक दिवसभरात २००-२५० रन्स बघायला मैदान भरवत" - पुण्याचं नेहरू स्टेडियम आठवलं. (त्याला गरवारे बालभवन च्या बाजुनं जायची एक चोरवाट पण होती). हेच जर रणजी वगैरे च्या मॅचेस असतील तर वर क्लब हाऊसच्या गारव्यातून सुद्धा फुकट बघता यायच्या. क्रिकेट बघण्यासाठी काय वाट्टेल ते करायचो तेव्हा. Happy

एक्झॅक्टली, फेरफटका. नेहरू स्टे च्या इस्ट का वेस्ट ष्टॅण्ड मधे "शेकत" बघितलेल्या मॅचेस आठवल्या.

पराग - नाही - मी त्या "चलता है" किंवा प्रेक्षकांना गृहीत धरण्याबद्दल लिहीले आहे. पूर्वी फार भीषण अवस्था असे. विशेषतः जर गर्दी असेल तर - जी सहसा असायचीच. पण त्यामानाने रणजी/दुलीप वगैरे आरामात पाहता येत असत.

अमेरिकेत बेसबॉलशीं किंवा तिथल्या बास्केटबॉलसारख्या इतर लोकप्रिय खेळाशीं स्पर्धा करणं क्रिकेटसाठी जरा अवघडच वाटतं. कारण, जो खेळ प्रत्यक्ष तिथं खेळला जात नाहीं तो खेळ नवलाई म्हणून लोक पहातीलही पण ती 'क्रेझ' होणं कठीणच. भारतीय उपखंडातले प्रथम पिढीतले तिथले रहिवासी उत्साह दाखवतील पण त्यांच्या नंतरच्या पिढीला क्रिकेटचं तसंच आकर्षण असणंही जरा शंकास्पदच. [ अर्थात, अमेरिकेकेबद्दल अधिकारवाणीने बोलूं शकतील असे इथं बरेच जाणकार आहेत. त्यांचा याबाबतचा अंदाज महत्वाचा ].
पण मला खरं आश्चर्य वाटतं तें वे.इंडीजचं. या दौर्‍यात कसोटी सामन्याना स्टेडियम रिकामे दिसायचे. निदान टी-२० सामने तिथंच खेळवून क्रिकेटकडे प्रेक्षकाना आकर्षित करायचं सोडून, तेही निघाले 'अमेरिकन मार्केट' काबिज करायला !!!

अमेरिकेत व्हॉल्युम मार्केट नाही. व्हॅल्यु मार्केट आहे. दोन्हीत फरक आहे. त्यामुळे तिकिट महाग. पण देशासारखे २ महिने इथे आयपिल घेतले (रोज) तर लोकं येणार नाहीत असे वाटते.

नेहरू स्टे च्या इस्ट का वेस्ट ष्टॅण्ड मधे "शेकत" बघितलेल्या मॅचेस आठवल्या.>>>

एकदा एक रणजी सामना बघितलेला सौराष्ट्रा विरुद्ध राजू भालेकर ने द्विशतक झळकावलेले.. तेंव्हा. 'बाबू टांगेवाला' हे .आपला हार घेऊन धावत त्याच्या गळ्यात घालायला आलेले पाहिले!

डेल स्टीन सुटलाय न्यूझीलंडविरुद्ध! जबर स्पेल! स्टीन इक्वल्स वासिम अक्रम विथ ४१४ टेस्ट विकेट्स नाऊ. व्हॉट अ बोलर.

स्टेन सध्याचा माझ्या मते सध्याचा सर्वात चांगला द्रुतगती गोलंदाज! जरी आजकाल धार जरा कमी जाणवत असली तरी दहशत निर्माण करु शकतो केंव्हाही!

<< स्टेन सध्याचा माझ्या मते सध्याचा सर्वात चांगला द्रुतगती गोलंदाज! >> हें अगदीं खरं असलं तरीही उपखंडातल्या विकेटसवरही तसेच बळी घेण्याचं कसब तो आत्मसात करूं शकलेला माहीं ही त्याचीही खंत असावी.

रीही उपखंडातल्या विकेटसवरही तसेच बळी घेण्याचं कसब तो आत्मसात करूं शकलेला माहीं ही त्याचीही खंत असावी.>>>

भाऊ, तुम्ही म्हणताय ते सत्य आहे.. परंतु जुना इतिहास बघितला तर इंग्लंड ऑस्ट्रेलियाचे तिकडे खोर्‍याने बळी ओढणारे गोलंदाज आपल्या खेळपट्यांवर फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत.. मला आठवतेय रॉडनी हॉग नावाचा बोलर ज्याने ऑस्ट्रेलियात एका दौर्‍यात भारतियांची दाणादाण उडवलेली इथे मात्र दमछाक झालेली त्याची..
अशी बारीच उदाहरणे देता येतील..

जबरी बोलिंग केलेली दिसते स्टेन ने.

ट्रेण्ट बोल्ट ला स्विंग सपोर्ट मिळालेला दिसत नाही. २०१५ च्या वर्ल्ड कप ला त्याचे बनाना स्विंग्ज भन्नाट होते.

गेल चा पोपट केलेला पाहा. आधी बघताना वाटते हा यॉर्कर आहे. नंतर कळते की मिडल वर पडलेला बॉल स्विंग होउन ऑफ घेउन गेला आहे.
https://www.youtube.com/watch?v=4bKAD7KfJpM

बोल्ट ची क्लिप जबरदस्त आहे. स्विंग आहे की बॉल्स स्पिन होताहेत तेच कळत नाहीये.

स्टेन ४१६ विकेट्स. क्या बात है! तुफान बॉलर!

फा, IMO बोल्ट मे हॅव बीन ट्राइंग टू हार्ड. इन्ज्युरीचाही परिणाम झालेला असू शकतो.

फक्त बोल्टच नाही तर किवीज ची फास्ट बॉलिंग डॉनल्ड नि मग बाँड आल्यापासून सुधारली आहे.

वर डेल स्टेन च्या भारतीय उपखंडातील खेळाबद्दल बोलणे आले म्हणून त्याची आकडेवारी बघितली. फक्त ९ इनिंग्स आहेत पण जेव्हढी वाटते तेव्हढी वाईट नक्कीच नाहीये. तिथला average करीयर average च्या बरोबर आहे. strike rate अधिक सरस आहे. त्याच्या पहिल्या सिरीजमधे चांगला खेळलेला. त्याने २ मॅचेस मधे एकहाती दुसर्‍या मधे नागपूर मधे सिरीज reverse swing वर धुमाकूळ घातलेला आठवतो. तिसरी तो दुखापतग्रस्त होता त्यामूळे एकच सामना खेळलाय.
http://stats.espncricinfo.com/ci/engine/player/47492.html?class=1;templa...
http://stats.espncricinfo.com/ci/engine/player/47492.html?class=1;host=6...
कदाचित त्याच्याबद्दलच्या expectations अधिक असाव्यात म्हणून हेही कमी वाटतेय. Happy अ‍ॅंडरसनपेक्षा उपखंडातल्या विकेटसवरही तसेच बळी घेण्याचं कसब स्टेन ने कमी दाखवले हे नक्कीच.

पाकिस्तानचे सुमार क्षेत्ररक्षण आणि ढिसाळ बॉलिंग चे खूप साहाय्य मिळाले इंग्रजांना सर्वोच्च स्कोर 444 बनविताना!! चांगली फलंदाजी!!

वहाब रियाझची सेंच्युरी!

१०-०-११०-०

Pages