क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< सचिन पुढे ब्लँक ठेवली असतीस तरी चालली असती. त्याचा मैदानावरचा वावरच जणु क्रिकेट personify करायचा. >> नि:संशय ! कारण सर्व प्रचलीत फटक्यांसोबत अप्पर-कट, पॅडल शॉट, रिव्हर्स फ्लिक/शॉट अशा नव-नविन फटक्यांवरही सचिनने हुकमत मिळवलीच होती.
<< 1 रन अश्विनला काढून दिली नाही तेवढे अश्विन वरचे प्रेशर कमी झाले असते >> अहो, साहा स्वतःच्या सेंच्यूरीत गुंतलाय !! Wink

आता अजून लुटा म्हणावं. >>

तुला असं म्हणायचं आहे का? " आता कासव होणे बंद करा, अन ससा होऊन गिधाडांवर तुटून पडा ! "

तुला असं म्हणायचं आहे का? " आता कासव होणे बंद करा, अन ससा होऊन गिधाडांवर तुटून पडा ! " >> बरोबर, पण सहा आऊट! (पन इंटेंडेड)

फेरफटका, छान पोस्ट, फारेण्ड छान लिस्ट .. सगळे डोळ्यासमोर उभारले

म्याच मजेदार चालूय, जरा पेशन्स ठेवले की टेस्ट बघायला मजा येते.
दोन शतकवीरांनंतर आता आपला त्रित्रिशतकवीर फलंदाजीला आलाय Happy

जडेजा चा बॅटींग चा अ‍ॅप्रोच च कळत नाही मला टेस्ट मधे (तो का असतो टेस्ट मधे ते सुद्धा कळत नाही पण ते आता जाऊ दे). झहीर सुरूवातीला बर्याबैकी बॅटींग करायचा. नंतर नंतर त्याने, 'मी प्रमुख बॉलर आहे, बॅटींग वगैरे फुटकळ कामं मी करत नाही' असा काहीसा अ‍ॅप्रोच घेतला होता. जडेजा चा अ‍ॅप्रोच त्यातला अर्धा भाग खरा करून दाखवतो ('बॅटींग वगैरे फुटकळ कामं मी करत नाही' हा). साहा नंतर जडेजा, भुवनेश, शामी, ईशांत च्या बरोबर अश्विन ४०० पर्यंत खेचेल असं वाटलं होतं.

जडेजा हा इंटरनॅशनल लेवलचा बॅटसमन नाही. पिरिएड. असाम्याला वाईट वाटले तरी. Happy अपवाद त्याने इंग्लंड मध्ये ६२ की ६५ केले तो एक. टेस्ट मध्ये तर सोडा वनडे मध्येही तो डिपेंडेबल बॅट्समन नाही. त्याच्यापेक्षा अश्विन आणि भुवनेश कुमार टेस्ट मध्ये खूप चांगले आहेत. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहेच. ते तर सोडा, श्रीलंकेत लक्ष्मणसोबत इशांत जसा खेळला, तसेही त्याला कधी येईल की नाही, ह्यावर माझा डाउट आहे. देशी आखाड्यामध्ये त्याला विकेट भेटतात, परदेशात तो फारसा यशस्वी अजूनतरी नाही.

केदार शी बहुतांशी सहमत. बहुतांशी अशासाठी की 'जडेजा हा इंटरनॅशनल लेवलचा बॅटसमन नाही.' ह्या वाक्यात मी बॅट्समन च्या जागी खेळाडू हा शब्द घालीन. धोनी चा लोभ जडला नसता, तर सौराष्ट्राचा सितांशु कोटक नंतर आणखी एक डोमेस्टीक स्टॉलवर्ट म्हणून नाव कमावलं असतं त्यानं.

त्याच्यापेक्षा चांगला लेफ्ट आर्म / लेगी आहे तरी कोण सध्या? ओझा/चावला/मिश्रा त्याच्यापेक्षा काही फार बरे वाटत नाहीत आणि कोहली लाइक्स हॅविंग टू स्पिनर्स अमंग फाईव बोलर्स असे वाटते.

मागची टेस्ट लेफ्ट आर्म बॉलर शिवायच जिंकली होती की. धोणीने उगाच लेफ्ट आर्म, राईट आर्म चा गवगवा केला आहे. ( जडेजा प्रेमाखातर) आधीही प्रत्येक मॅच मध्ये कूठे आपल्याकडे लेफ्ट अन राईट आर्म स्पेशालिस्ट होते? माझ्या लहाणपणी तरी लेफ्ट आर्म बॉलर सोडा, बॅटसमन पण खूप कमी होते. Happy अर्थात बॅटिंगला ते कॉम्बो चांगले आहे हे मान्यच. पण केवळ लेफ्ट आर्म बॉलर आहे म्हणून अट्टहास नको असे म्हणतो.

मागची टेस्ट लेफ्ट आर्म बॉलर शिवायच जिंकली होती की. >> लेगी होता अमित मिश्रा त्यात. धोणीचं जाऊ दे, कोहलीला आश्विनबरोबर एक स्पिनर अजून हवा आहे, हेच पाच बोलर्स खेळवण्याचं कारण आहे. नाहीतर चार फास्ट बोलर्स (आणि एक स्पिनर) खेळवण्याएवढे कोण फास्ट बोलर्स नंबर लावतायत? तो स्पिनर मिश्रा असेल नाहीतर जाडेजा. मिश्राऐवजी जाडेजाला आत्ता का आणला ह्यापेक्षा जास्त बॅफलिंग सिलेक्शन्स ह्या मॅचमध्ये झाली असल्याने त्याबद्दल काही कल्पना करता येत नाही.

धोणीने उगाच लेफ्ट आर्म, राईट आर्म चा गवगवा केला आहे. >> Lol

तात्या तुला मी मागच्या argument च्या वेळी सांगितले होते कि 'जाडेजाने तीन त्रिशतके कशी काढलीस; ह्याचे लॉजिकल explanation दे. बर ते जाऊ दे, जडेजाच्या left arm बॉलिंग बद्दल काय problem आहे नक्की तुला ? मिश्राने मागच्या दोन सामन्यांमधे काय दिवे लावलेले कि जाडेजा त्यापेक्षा वाईट करेल असे वाटतेय ?

मी ह्यावेळी आर्ग्युमेंट करत नाहीये. दरवेळी आपण वाद घालतो आणि जडेजा जे काही करायचे तेच करतो. ही इज जस्ट प्रुव्हिंग माय पाँईट डे इन डे आउट.

जाडेजाने तीन त्रिशतके कशी काढलीस >> क्षणभरासाठी मान्य केले तरी मग आजपर्यंत जडेजा का नाही चालला ह्याचेही लॉजिकल एक्सप्लनेशन तुझ्याकडे असेल का बरं? आणि ते काय?

त्याच्या बॉलिंग बद्दल देशात मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी वर लिहिले आहे की तो आखाड्यात मस्त बॉलर आहे. परदेशी अजून ( ही) चालला नाही हे ही खरेच आहे. वर तेच लिहिले आहे.

मिश्राने मागच्या दोन सामन्यांमधे काय दिवे लावलेले >> अरे काय सांगतोस. अगदी गावस्कर पण म्हणत होता की मिश्रा प्रेशर टाकतोय अन त्यामुळे दुसर्‍या बॉलरला विकेटस मिळत आहेत.

असामी, दुसर्या टेस्ट च्या पाचव्या दिवशी एक संधी निर्माण झाली होती आणी ती मिश्रा च्या बॉलिंगवर झाली होती.

गेल्या दोन टेस्ट मधे मिश्रा ने ६९.५ ओव्हर्स, १६ मेडन्स, २३२ रन्स आणी ६ विकेट्स काढल्या आहेत. झालच तर दोन ईनिंग्ज मधे ७४ (५३ + २१) रन्स पण काढल्या आहेत. त्याची बॅटींग आणी आजची जडेजा ची बॅटींग बघून फरक सुद्धा लक्षात येतो अ‍ॅप्रोच मधला.

त्रिशतकांचं कौतुक एका मर्यादेत ठीक आहे- कॉन्संट्रेशन, शारिरीक क्षमता वगैरे. पण राजकोट ची विकेट, प्रतिस्पर्ध्यांचा दर्जा, अंपायरिंग चा - त्यातून स्टार खेळाडूंविरुद्ध असणार्या अंपायरिंग चा दर्जा वगैरे गोष्टींचे caveat पण आहेत त्याला.

अगदी गावस्कर पण म्हणत होता की मिश्रा प्रेशर टाकतोय अन त्यामुळे दुसर्‍या बॉलरला विकेटस मिळत आहेत. >> आणि हेच जेंव्हा जाडेजा करतोय बॉलिंग करताना तेंव्हा का चालत नाहि ? तिथे डबल ढोलकी का रे बाबा ? आफ्रिका नि लंकेविरुद्ध अश्विनला perfect साथ दिली होती त्याने. तुझे वाक्य " देशी आखाड्यामध्ये त्याला विकेट भेटतात, परदेशात तो फारसा यशस्वी अजूनतरी नाही." ह्यातून त्याला क्रेडीट दिलय असे तू म्हणत असशील तर माझे मराठी नक्कीच कच्चे आहे असे म्हणतो नि सोडून देतो. Happy

त्रिशतकांचं कौतुक एका मर्यादेत ठीक आहे- कॉन्संट्रेशन, शारिरीक क्षमता वगैरे. पण राजकोट ची विकेट, प्रतिस्पर्ध्यांचा दर्जा, अंपायरिंग चा - त्यातून स्टार खेळाडूंविरुद्ध असणार्या अंपायरिंग चा दर्जा वगैरे गोष्टींचे caveat पण आहेत त्याला. >> मान्य फे.फे. पण तो बॅट्समनच नाहि वगैरे कमेंट कितपत रास्त आहेत ? मी कधीही तो कपिलच्या दर्जाच्या अष्टपैलू खेळाडू आहे वगैरे सुचवलेले नाही फक्त त्याची बॅटींग टाकाऊ नाही असे म्हणत आलोय. (त्रिशतकांचे उदाहरणही त्यावरूनच आले होते.) कदाचित ती असेलही टाकाऊ, किंवा/आणी तो त्या कॅलीबरची बॅटीम्ग करत नाही हेही मान्य. (का ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही. तो लिमिटेद ओव्हरस मधे खेळल्यासारखाच टेस्ट मधे का खेळतो जेंव्हा तो टेस्ट टेंपरामेंट दाखवून खेळू शकतो हे पाहिलेले असतानाही, ह्याचे उत्तर नाही) पण मिश्रा नि जाडेजा मधे एक खेळाडू म्हणून डावे उजवे करायला फारसा फरक मला तरी दिसत नाही. मिश्रा जबाबदारीने बॅटीम्ग करतो पण त्याचा मूळ रोल बॉलिंग आहे त्यानुसार ठरवायला नको का ? मिश्रा एक लेग स्पिनर असून जर defensive mode मधे असेल तर तो काय कामाचा ? माझ्या समजूतीनुसार, लेग स्पिनर attacking wicket taker असतो. जडेजा ची फिल्डींग हा त्याचा प्लस पॉईंट ठरतो जो मिश्राचा नाही. again my point is very simple. Between these 2, you can pick any one and it will not change your game plan or strategy. They will be just feeder to main balling unit and that's all. Jadeja gets criticized because he got more chances, that's all.

आजचं पहीलं सेशन आपलं होतं, पण दुसरं आणी तिसरं सेशन्स विंडीज ने गाजवली. कालसुद्धा ३ पैकी २ सेशन्स विंडीज ने गाजवली. आत्तापर्यंत झालेल्या ६ सेशन्स मधे विंडीज ४ - भारत २. खूप चांगला खेळ करण्याची गरज आहे भारताला.

डबल ढोलकी >> मी कधी वाजवली डबल ढोलकी? भारतीय उपखंडात जडेजा चालतो. बाहेर चालत नाही. ( अजूनही) इतके स्पष्ट लिहिले आहे की !

पण तो बॅट्समनच नाहि वगैरे कमेंट कितपत रास्त आहेत >> च्च च्च. इंटरनॅशनल बॅटसमन असे वाच. मी मागेही उदाहरण दिले होते की सचिन ऑसी विरुद्ध १७५ धावा काढून आउट झाला. तेंव्हा फक्त २०-२५ धावा हव्या होत्या. (वनडे) आणि जडेजाला तेंव्हा बॅटसमन म्हणून घेतले होते. तो गल्लीतल्या खेळाडू सारखा खेळला. तिथपासून ते आज पर्यंत इंटरनॅशनल लेवलला त्याने कधीही चांगली बॅटिंग केली नाही. अनेक उदाहरणे आपण सगळ्यांनी पाहिली आहेत. (मोजके अपवाद वर आणि मागे मी लिहिले आहेत)

जसे मी, तो चांगला आंतरराष्ट्रीय बॅट्समन नाही हे नेहमी मांडतो तसे तू, तो कसा चांगला बॅटसमन आहे. हे तू नक्कीच मांडू शकतोस. पण आजपर्यंत का मांडले नाहीस?

तो टेस्ट मध्ये परत आला ते ही दुसरेंदा ३०० काढल्यामुळे. बॉलिंगच्या जोरावर नाही आला. त्यामुळे जर संधी ज्यामुळे मिळतीये, ती प्राईम गोष्ट करून दाखवावी. गेलाबाजार एक दोन शतक ठोकून दाखवावेत ह्या लेवलला. मग मी ही जयजयकार करेल. आणि इनफॅ़ट ऑस्ट्रेलिया विरुद्ध (भारतात) जयजयकार बॉलिंग मुळे केलाही आहे. मागेच कुठे तरी पोस्टी असतील. तसेच त्या ६२ धावांचाही.

माझा मुद्दा टेस्ट मध्ये ११ च्या स्पॉट मध्ये तो बसत नाही इतकेच मी म्हणतो. त्याला संधी खूपदा दिली आहे.

again my point is very simple. Between these 2, you can pick any one and it will not change your game plan or strategy >> असे म्हणून इनफॅक्ट तो तसा हुकमी एक्का नाही हे तू ही मान्य करतो आहेस हे वाचून आनंद झाला. Happy

इतक्याउपर त्याने उरलेल्या दोन टेस्ट मध्ये धावा काढल्या अन विकेट घेतल्या तर जयजयकार करूच. तो माझा पर्सनल दुश्मन थोडी आहे. प्रश्न ११ मध्ये तो हवा का आहे. निदान मिश्राजी धावाही काढत आहेत. उद्या मिश्राजी चालेनासे झाले तर ओझाला किंवा आणखी नविन कोणी आणावा का? असेही मी म्हणेल.

तात्या बघ मी वरच लिह्लय जे परत एकदा quote करतो (तुझे वाक्य " देशी आखाड्यामध्ये त्याला विकेट भेटतात, परदेशात तो फारसा यशस्वी अजूनतरी नाही." ह्यातून त्याला क्रेडीट दिलय असे तू म्हणत असशील तर माझे मराठी नक्कीच कच्चे आहे असे म्हणतो नि सोडून देतो)

तो टेस्ट मध्ये परत आला ते ही दुसरेंदा ३०० काढल्यामुळे. बॉलिंगच्या जोरावर नाही आला. >> Happy नि म्हणून तो second spinner म्हणून खेळतो नि सहाव्या सातव्या क्रमांकावर बॅटींग करायला येत होता ? तेही धोनीसारखा त्याची पाठराखण करणारा असताना ? काहिही राव !

तो तसा हुकमी एक्का नाही>> 'तो हुकुमी एक्का आहे' हे मी कधी लिहिलय नक्की ? मी धोनीच्या team strategy मधे तो परफेक्ट बसतो नि त्याला योग्य स्थान मिळतेय असेच लिहिलेले मला आठवते. वर मी मिश्रा नि जडेजा हे current strategy मधे interchangeable वाटतात असेच लिहिलेय.

तूला माझा मिश्रा नि जाडेजा बद्दलचा मुद्दाच कळत नाहिये हे तुझ्या वरच्या पोस्टमधल्या शेवटच्या दोन पॅरांमधून लक्षात येतेय. माझ्यासाठी दोघेहि एकसमान आहेत तर तुझ्या मते जडेजा निरुपयोगी नि मिश्रा उपयोगी आहे हा आहे. तेंव्हा Lets agree to disagree.

खूप चांगला खेळ करण्याची गरज आहे भारताला. >> बरोबर. आपल्या दुसर्‍या इनिंगमधल्या बॅटींगला प्रचंड महत्व येणार आहे असे दिसतेय.

कुंबळेचा एक सन्माननीय अपवाद सोडला, तर कसोटी पातळीवरच्या स्पीनरकडे चेंडूला फ्लाईट देवूनही फलंदाजाला चकवण्याची क्षमता असणं अपरिहार्य असतं/असावं. म्हणून, धडधडीत 'स्पीनींग ट्रॅक' वर जडेजा उपयुक्त स्पीनर ठरूं शकतो पण इतर विकेट्सवर तो भेदक ठरणार नाही, असं माझं मत आहे. मिश्राला वग़ळून जडेजाला घेणं यामुळेच मला पटलं नाहीं. कालची वे.इंडीजच्या चेसची गोलंदाजी 'फ्लाईट'चं महत्वच अधोरेखीत करत होती. [ अक्षर पटेल हा लेफ्ट आर्म स्पीनर असूनही तो 'फ्लाईट'चाही छान उपयोग करतो व म्हणून मला आवडतो. तो कसोटी दर्जाचा आहे कीं नाहीं, हा मुद्दा वेगळा]

कालचा साहाचा अ‍ॅप्रोच अजिबात आवडला नाही. स्वतःचे शतक पुर्ण करण्याच्या नादात त्याने फोकस गमवला. आणि शतक पुर्ण झाल्याच्या नंतर घाईघाईत विकेट गमावून बसला. उलट अजुन शांतपणे खेळला असता तर भारत किमान ४५० तरी नक्कीच पोहचला असता. नंतरच्या लोकांनी नुसती हजेरी लावण्याचे काम केले अवघ्या ३-४ धावांमधे ३-४ विकेट गमवल्या. जे नक्कीच कौतूकस्पद नाही. अश्विनला एकाने जरी साथ दिली असती तरी अश्वीन चे १५० क्रॉस झाले असते.

<< कालचा साहाचा अ‍ॅप्रोच अजिबात आवडला नाही. स्वतःचे शतक पुर्ण करण्याच्या नादात त्याने फोकस गमवला >> मीं साहाचं समर्थन करत नाही पण कदाचित हें कारण असूं शकेल - विकेटकिपरला ताबडतोब पुन्हा पॅड बांधून विकेटमागे उभं राहून उठाबशा काढायच्या असतात व तेंही प्रत्येक चेंडूवर फलंदाजाइतक्याच एकाग्रतेने.लक्ष देत. हें भान फलंदाजी करत असताना सततच कोणत्याही विकेटकिपर- बॅटसमनला असणं स्वाभाविक आहे व तें त्याच्या खेळात प्रतिबींबीत होणंही.

साहाचा फोकस निव्वळ धावा करण्यावर होता कारण पुजारा आणि मुरली नंतर त्याच्यावर टांगती तलवार होती. एका बाजुला राहूल जबरी बॅटींग करत होता आणि मुख्य म्हणजे त्याने आयपीएल मधे चांगली विकेटकिपिंग केली होती. त्यामुळे साहावर फलंदाजीचे दडपण होते जे शतक झाल्यानंतर अचानक निघून गेले. आता जागा पक्की झाली या आनंदात कदाचित त्याचा फोकस निघाला या अर्थाने म्हणालो. कारण शतक झाल्यावर त्याच्या देहबोलीत फरक आला. आता मी फटकेबाजी करण्यास मोकळा, हु इज बेस्ट, वगैरे अ‍ॅटीट्युट दाखवायला सुरुवात केली. या नादात आऊट झाला.

<< त्यामुळे साहावर फलंदाजीचे दडपण होते जे शतक झाल्यानंतर अचानक निघून गेले.>> साहा साधारण ८०-८५ धांवा झाल्यापासूनच आक्रमक खेळत होता, त्याचं शतक अश्विनच्या शतकाआधींच होईल असं वाटण्या इतपत. शिवाय, परिस्थिती बिकट असताना त्याने अतिशय संयमी, परिपक्व फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. त्याची किपींग तर चांगलीच होतेय. 'जागा पक्की होण्याचं ' टेंशन त्याला असण्याची असण्याची गरज नसावी. इतक्या सुंदर खेळीनंतर<< हु इज बेस्ट, वगैरे अ‍ॅटीट्युट दाखवायला सुरुवात केली.>> हें तर त्याच्यावर फारच अन्याय केल्यासारखंच होईल

मला वाटतेय कि थोडे फास्ट खेळण्याची सूचना दोघानांही आली असावी. एकंदर आपल्या संघाचा तो अ‍ॅप्रोच दिसतो आहे.

Pages