क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूट प्लेइंग यासीर शाह राईट नाऊ लाईक अ चार्म. Happy

डाऊन अंडर बॉल लॅटरली मूव्ह इतका होत नाही, त्यामुळे ती त्या विकनेसची टेस्ट कशी होशील? तसेच रिसेंटली ऑस्ट्रेलियाची स्ट्रॅटेजी ट्रू पीचेस बनवून वॉर्नर आणि स्मिथच्या साहाय्याने बॉलर्सना बॅटर करण्याची आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बॅटिंग इतकी टफ राहिलेली नाही गेल्या दोन तीन वर्षांत. ह्यावर क्रीकइन्फोमध्ये लेखही आला होता एक.

विको ३०० करेल तर मजा येईल राव.

डाऊन अंडर बॉल लॅटरली मूव्ह इतका होत नाही, >> इतका हे मह्त्वाचे आहे. अगदी इंग्लंडमधल्या पहिल्या दोन टेस्ट्स्मधे बॉल फारसा मूव्ह होत नसतानाही ऑफच्या बाहेरचे बॉल चेस करून बाद झाला होता कोहली . त्या नंतर त्याने त्याचा स्टान्स ऑफकडे सरकवलाय हे लक्षात घे. रूट्स आज खेळतोय पण गेल्या मॅच मधे काय झाले ते आठव म्हणून म्हटले कि He is untested. असो, वर्षाखेरीस कळेलच काय ते इंग्लंड इथे आले कि.

विराट कोहली आणि जो रुट मस्तं खेळत आहेत!

कोहलीला अश्विन मस्तं सपोर्ट करतो आहे. रुटच्या जोडीला बॅलन्स असला तरी त्याचा भरोसा देता येणार नाही.

आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मॅच पण होऊ द्या आणि या दोघांपेक्षाही टेस्ट्समध्ये कांकणभर सरस असलेला केन विल्यमसन खेळताना पाहण्यास मिळू दे म्हणजे भरुन पावलो !

"विको ३०० करेल तर मजा येईल राव." - तुझ्या तोंडात तुझ्या आवडीचा खाद्यपदार्थ - पेय पडो. तुझा वीकेंड सार्थकी लागो. डॅलस च्या रणरणत्या उन्हात तुला ग्रोसरी शॉपिंग सारख्या फुटकळ कारणांनी घराबाहेर पडायला न लागता, निवांत घरात बसून मॅच पहायला मिळो अशा सर्व शुभेच्छा!

जबरी कोहली! रिस्पेक्ट.

अगदी इंग्लंडमधल्या पहिल्या दोन टेस्ट्स्मधे बॉल फारसा मूव्ह होत नसतानाही ऑफच्या बाहेरचे बॉल चेस करून बाद झाला होता कोहली >>> स्विंग नसताना आधीच अ‍ॅण्टिसिपेट करून केलेल्या चुका बघितल्या आहेत - वास्तविक ऑफ स्टंप च्या बाहेरचा बॉल पण रिप्ले मधे कळते की लाईनच्या बाहेर बॅट होती - कारण स्विंग होईल असे वाटले पण झाला नव्हता. Playing the pitch/conditions rather than the actual delivery अशा अर्थाचे वाचलेले आहे.

वेंगसरकर्/अझर/गांगुली हे एका बाजूला, तर लक्ष्मण दुसर्‍या बाजूला - ही इंग्लंड व ऑस्ट्रेलिया पैकी एकाच ठिकाणी यशस्वी असलेल्यांची उदाहरणे आठवतात.

आजच्या कसोटी सामन्याला कांहीं भारतीय सोडले तर वे.इंडीजमधला स्टेडियम रिकामा असावा, हें जाम खटकलं. विव्ह रिचर्डस, जेफ्री दुजाँ या पूर्वीच्या वे.इंडियन दादा लोकाना बोलताना पाहिलं व जुन्या आठवणीना उजाळा मिळाला !

इंग्लंड २७३-३. रूटचं शतक. आजच्या पीचला नासीर हुसेनने 'प्रीस्टीन ' [pristine] हें विशेषण वापरलं; ह्याचे दोन अर्थ डिक्शनरी देते १] मूळ अवस्थेतलं व २] नविन, कोरं. बहुधा दुसरा अर्थ इथं लागू होत असावा .

फारएण्ड,

अझर आणि गांगुली ऑस्ट्रेलियात साफ अयशस्वी झाले असं नक्कीच म्हणता येणार नाही माझ्या मते. दोघांचीही ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये शतकं आहेत. लक्ष्मण मात्रं इंग्लंडमध्येच नाही तर इंग्लंडविरुद्ध भारतातही तसा अपयशीच ठरला आहे. याबाबतीत लक्ष्मणच्या तोडीसतोड उदाहरण म्हणजे डग वॉल्टर्सचं! इंग्लंडमध्ये तो कधीच यशस्वी ठरला नाही मात्रं बाकी जगभर अफाट बॅट्समन म्हणून गाजला आणि ऑस्ट्रेलियातही त्याने इंग्लंडची यधेच्छ धुलाई केली!

एकमेव सेंच्युरीचा अपवाद वगळता भारतात कायम अपयशी ठरलेला असाच एक बॅट्समन म्हणजे रिकी पाँटींग!

विराट कोहली आऊट!

वेल, विलीयमसन पाकिस्तानविरुद्ध युएईमध्ये २०१४/१५ साली टेस्ट्स खेळला होता. त्यात त्याचा अ‍ॅव्हरेज ५२.२० आहे. सो नॉट बॅड आय वूड से. रूट पाकिस्तानविरुद्ध युएईमध्ये २०१५/१६ साली टेस्ट्स खेळला होता. त्यात त्याचा अ‍ॅव्हरेज ५७.४० आहे. ह्या दोघांना अनटेस्टेड अगेन्स्ट स्पिन नाही म्हणता येणार.

कोहलीबद्दल - त्या ऑस्ट्रेलिया सीरीजनंतर कोहलीचे सीरीज अ‍ॅव्हरेजेस (चालू सीरीज सोडून) - बांग्लादेश १ टेस्ट १४ (ते द्या सोडून अ‍ॅबीरेशन म्हणून), त्यानंतर श्रीलंकेत ३ मॅचेसमध्ये ३८.८३, त्यानंतर भारतात आफ्रिकेविरुद्ध ४ मॅचेसमध्ये ३३.३३. आणि मग आताची सीरीज. कोहली स्वतःच ह्या देशांमध्ये काही स्टेलार खेळलेला नाही.

कोहलीच्या लिमिटेड मधल्या खेळाने त्याचे टेस्ट्समधले फ्लॉज थोडे कमी उठून दिसतात, असे माझे मत आहे. (दो आय मे गेट सम फ्लॅक फॉर धिस.) अजून कोहलीकडे रूट आणि विलीयमसनच्या लेव्हलचे कॉन्सन्ट्रेशनही दिसलेले नाही, हे अजून एक. ते (ह्या द्विशतकाच्या निमित्ताने) आलेले दिसले, तर मला आनंदच होईल. Happy

अझर आणि गांगुली ऑस्ट्रेलियात साफ अयशस्वी झाले असं नक्कीच म्हणता येणार नाही माझ्या मते >>> हो मलाही तसे म्हणायचे नाही. ते जितके इंग्लंड मधे सहज खेळत तितके ऑस्ट्रेलियात नाही, इतकेच.

कोहलीच्या लिमिटेड मधल्या खेळाने त्याचे टेस्ट्समधले फ्लॉज थोडे कमी उठून दिसतात, असे माझे मत आहे. (दो आय मे गेट सम फ्लॅक फॉर धिस.) अजून कोहलीकडे रूट आणि विलीयमसनच्या लेव्हलचे कॉन्सन्ट्रेशनही दिसलेले नाही, हे अजून एक. ते (ह्या द्विशतकाच्या निमित्ताने) आलेले दिसले, तर मला आनंदच होईल. >>>> +१

कोहली, रुट, विल्यमसन यांच्याच पंक्तीत सहजपणे बसणारा आणखीन एक बॅट्समन म्हणजे स्टीव्ह स्मिथ. त्याचं टेक्नीक कॉपीबूक नसलं तरी चांगलंच परिणामकारक आहे. या चौघांच्या जोडीला डेव्हीड वॉर्नरसारखा धोकादायक बॅट्समनही बसू शकेल.

हो मलाही तसे म्हणायचे नाही. ते जितके इंग्लंड मधे सहज खेळत तितके ऑस्ट्रेलियात नाही, इतकेच
>>>>

हा बहुतेक विकेट्सवर असलेल्या बाऊंसचा परिणाम असावा. शॉर्टपीचवर अझर आणि गांगुली कायम गडबडलेले दिसून येतील. अशा वेळी इंग्लंड, दक्षिण आफ्रीका, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारतीय उपखंडात सारख्याच प्रमाणात यशस्वी झालेल्या सचिन-द्रविड आणि स्टीव्ह वॉ, केविन पीटरसन (आणि काही प्रमाणात अ‍ॅलिस्टर कूक) यांचं मोठेपण उठून दिसतं.

ह्या दोघांना अनटेस्टेड अगेन्स्ट स्पिन नाही म्हणता येणार >> UAE हा स्पिनचा benchmark आहे का रे ? मी वर म्हटले कि भारतात (हेराथ रिटायर झाला म्हणून नाहितर लंकेत पण म्हणता आले असते) खेळत नाहित तोवर स्पिन हँडल करू शकतात का हे धरता येत नाहि. डिसेंबरच्या सिरीज नंतर कळेलच. विलिय्मसन नवखा खेळाडू नाहिये , त्याची consistency गेल्या २-३ वर्षांमधे वाढली आहे तशीच कोहली as a test player गेल्या दोन वर्षांमधे grow झालेला दिसतोय. (लंकेच्या सिरीज ह्या लो स्कोरिंग होत्या ना ?) असो आपण we agree to disagree असे म्हणूया सध्यापुरते.

कोहलीच्या लिमिटेड मधल्या खेळाने त्याचे टेस्ट्समधले फ्लॉज थोडे कमी उठून दिसतात >> हे मी पुढे नेऊन म्हणेन कि ज्या तर्‍हेने त्याने आधी ODI format master केला नि गेल्या IPL पासून तेच transition T20 साठी दाखवले ते बघता, टेस्ट मधले दोष दूर होणे फारसे दूर वाटत नाही.

बेंचमार्क कोणी म्हटलेय? जस्ट दॅट इट इज फार फ्रॉम 'अनटेस्टेड', जे तू म्हटलेस, व्हेन इट इज युएई आणि पाकिस्तान. पन्नासवरचे अ‍ॅव्हरेजेस काहीच सांगत नाहीत का? आत्ता नं. १ असलेला यासिर शाह (जो कदाचित फास्टेस्ट टू १०० विकेट्स होईल) खेळत असलेल्या सीरीजमध्ये (ज्यात त्याने एका मॅचमध्ये ८ विकेट्स काढल्या, आणि दुसरीत ७, तिसरीत तो खेळला नाही) रूटचे पन्नासवर अ‍ॅव्हरेज म्हणजे काहीच अचिव्हमेंट नाही?!

मी तुला जवळपास गेल्या वर्षभरातले अ‍ॅव्हरेजेसचे आकडे दिले आहेत. तू फक्त गट फीलिंगवर म्हणतो आहेस. ऑस्ट्रेलियाच्या त्या एका सीरीजवर ओपिनियन फॉर्म का करावा? त्यानंतर कोहलीने कन्सिस्टन्सी कुठे दाखवलेली आहे? तसेच विलियम्सनचा डेब्यु नोव्हेंबर २०१० मध्ये आहे, कोहलीचा जून ११ मध्ये. असे असताना नवखेपणाचा प्रश्नच कुठे येतो? जर कोहली नीड्स दॅट टाईम टू ग्रो व्हाईल विलियम्सन हॅज ऑलरेडी ग्रोन अप, त्या दोघांमध्ये चांगला कोण आहे? वी कॅन अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री, बट त्याने परिस्थिती फारशी बदलणार नाही. टेस्टमधले त्याच्या खेळातले दोष दूर व्हायला फारसा काळ लागणार नाही, हे खरे असले, तरी सध्या ते दोष आहेत, हे तर तूही मान्य केलेस त्या वाक्याने.

<< कोहलीच्या लिमिटेड मधल्या खेळाने त्याचे टेस्ट्समधले फ्लॉज थोडे कमी उठून दिसतात >> ' फ्लॉज' हा शब्द जर तांत्रिक कमतरता किंवा त्रुटी या अर्थाने वापरला असेल तर मला वाटतं या संदर्भात एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही; जेंव्हां एखादा फलंदाज उच्चतम स्तरावर सातत्याने मोठी धांसंख्या उभी करत असतो, तेंव्हां त्याचं अगदीं स्वतःचं असंही एक तंत्र आकार घेत असतं व त्या तंत्रावरच त्याच्या खेळाची लय विसंबून असते. उदाहरणार्थ , विश्वनाथची अविस्मरणीय 'स्क्वेअर कट'; अतिशय वेगवान गोलंदाजानाही बॅट वर्तुळाकार फिरवतच तो हा अफलातून फटका लिलया अचूक मारत असे. कपिल देव नाकासमोर असलेला चेंडू माशी मारावी तसा 'पुल' करत असे. कोहलीचे बरेचसे फटकेही तांत्रिक अचूकतेपेक्षां तीक्ष्ण नजर, रिफ्लेक्सेस, सततचा सराव व प्रचंड आत्मविश्वास यावर आधारलेले असतात. जिथें त्यालाच आपली लय कांही फटक्यांबाबत समाधानकारक वाटत नाहीं, तिथें तो स्वतःचं तंत्र सुधारेलच. पण केवळ सर्वमान्य तंत्रात त्याचा एखादा हमखास फटका 'फीट' बसत नसेल, तर तो फटका तो बदलणार नाही व त्याने इतक्या उशीरां तसं करूंही नये. कारण, त्यामुळे त्याच्या खेळाची लयच बिघडण्याची शक्यता अधिक असते. सध्या कोहलीला त्याची सर्वोत्तम लय गवसली आहे व त्याला आपला खेळ विशिष्ठ तंत्राच्या चौकटीतच बसवण्याची गरज नसावी .

फक्त टेक्निकल फ्लॉज नव्हेत भाऊ, मी कंसिस्टन्सी आणि एकाग्रता ह्याविषयीही वर म्हटले आहे. Happy तो टॉप ५ मध्ये आहे, ह्यावर वादच नाही. पण त्याच्या जोडीचे १-२ जण तरी त्याच्याहून सध्यातरी काकणभर सरस प्रदर्शन करत आहेत, असे दिसते.

bhaa last time I checked, UAE pitches were simply slow wickets. If you have willow subscription you can check UAE matches and see if they were same as rank turners India offer. At best you can say, they are closer to Bangladeshi pitches. So average of 50 over there is only sign of concentration and certainly not technique to handle spin. My comment about Root and Williamson being untested against spin are always in reference with playing in India and to an extent in Lanka (I had mentioned that in first post itself). I will not hail them above anyone else until then. From my perspective (you can call it gut feel) unless 'firang' batsman proves himself on turning track, they are not above any others. (Ref : Ponting)

Regarding Williamson, a kiwi batsman who has honed up his skills on seaming and swinging wicket, I would expect him to be better in SAF or England. Has he ? Since you are checking stats, maybe you can check on that part. In Lanka and India he is not much different than Kohli. Their averages are honorable in their own respective home countries over greater sample space. So I'll definitely hedge my baits on Kohli over Williamson. BTW एकाच वेळी पदार्पण झाले असले तरी williamson कोहलीच्या आधी regular झाला आहे म्हणून कोहली त्याच्यापेक्षा नवखा ठरतोय असे म्हणत होतो.

टेस्टमधले त्याच्या खेळातले दोष दूर व्हायला फारसा काळ लागणार नाही, हे खरे असले, तरी सध्या ते दोष आहेत, हे तर तूही मान्य केलेस त्या वाक्याने.>> हो त्याबद्दल दुमत नाहिये पण ते दोष उघडे ठरल्यानंतर बरेच पाणी वाहून गेलय पुलाखालून हेही लक्षात घ्यायला हवेय.

BTW, I'm not to trying to convince you to change your ranking.

क्रिकेटमधे 'ग्रेटनेस' चा क्रमांक लावण्यासाठी असा तौलनिक अभ्यास खरंच कठीण आहे. << Regarding Williamson, a kiwi batsman who has honed up his skills on seaming and swinging wicket, I would expect him to be better in SAF or England. Has he ? >> असे अनेक वैयक्तीक दाखले देतां येतील. ब्रॅडमन उपखंडातल्या स्पीनर्सविरुद्ध इथं खेळला नाहीं म्हणून त्याच्या ग्रेटनेसपुढें प्रश्नचिन्ह नाहीं येणार. पोंटींग भारतात नाहीं चमकला पण मॅथ्यू हेडनने इथं धांवांचे डोंगर रचले. म्हणून हेडन हा पाँटींगपेक्षां ग्रेट फलंदाज झाला का ? मला वाटतं ,'True greatness is not being faultless but carrying those faults easily & gracefully', असं म्हणणं अधिक योग्य होईल.

तौलनिक अभ्यास करताना आणखी एक महत्वाचा अडथळा म्हणजे फलंदाज किती मजबूत किंवा कमकुवत फलंदाजी असलेल्या संघातून खेळतो. कारण ,यावर त्याला किती दडपण घेवून खेळावं लागतं हें अवलंबून असतं. हा घटक 'क्वांटीफायेबल' नसून प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत भिन्न असतो. गेलीं कांहीं वर्षं कोहली हा भारतीय फलंदाजीचा मुख्य आधारच झाला आहे व तें दडपण घेवूनच तो खेळतो आहे हें लक्षात घेणं आवश्यक आहे.

तिसरा मुद्दा एकाग्रतेचा. एकाग्रता ही देखील प्रत्येकाच्या स्वभावाशी, व पर्यायाने त्याच्या खेळाच्या शैलीशी, निगडीतच असते, असं मला वाटतं. बॉयकॉट हा अत्यंत चिवट व संथ फलंदाज व तो त्या शैलीने खेळताना तासन तास एकाग्रतेने खेळूं शकत असे. पण पूर्वीचा श्रीनाथ, हल्लींचे सेहवाग, धवन या सारख्यानी जर तसं खेळायचं म्हटलं, तर त्याना फार वेळ एकाग्रतेने खेळणं फारच कठीण होईल. कोहली हा जात्याच आक्रमक आहे व म्हणून तसं खेळतानाच त्याची एकाग्रता सहजपणे आलेली व उच्च प्रतिची असेल. तसं खेळताना तो बाद झाला तर तो एकाग्रतेचा दोष मानणं म्हणूनच अनुचित ठरेल. [ कालही तो आक्रमक खेळत राहीला म्हणूनच २०० पार करेपर्यंत एकाग्रतेने खेळला.]

आणि , शेवटी, 'ग्रेटनेस' ठरवण्याचे प्रत्येकाचे निकषही किती तरी भिन्न असूं शकतात. फलंदाजीच्या प्राथमिक तंत्रावर प़कड असून जो फलंदाज स्वतःची अशी आकर्षक, कलात्मक शैली निर्माण करून संघासाठी भरीव कामगिरी करतो
तो ग्रेट, हा आहे माझा वैयक्तीक निकष. म्हणूनच, गावसकर, सुनील, द्रविड कोहली इत्यादींबरोबरच मीं वाडेकर, विश्वनाथ, सलीम दुराणी, अझरुद्दीन इत्यादीनाही 'ग्रेट'च मानतो !

उसेन बोल्ट आनि धोनी जर क्रिकेट खेळायला उतरले तर प्रतिस्पर्धी संघ चौकार जाउ देतील त्याचा पाठलाग करणार नाही. कारण सीमारेषेपर्यंत पोहचून बॉल किपर कडे थ्रो करे पर्यंत दोघांनी ४-५ रन्स आरामात धावून पुर्ण केल्या असतील. Wink

<< उसेन बोल्ट आनि धोनी जर क्रिकेट खेळायला उतरले तर ...>> -

अरे तो फकंदाज रिओसाठी १०० मीटर धांवण्याचा सराव करतोय तर खुळ्यासारखा
तूंही 'डायव्हींग'साठी निवड झाल्यासारखा उड्या कां मारतोयस !!acrick.JPG

Lol

स्पीनर्सविरुद्ध इथं खेळला नाहीं म्हणून त्याच्या ग्रेटनेसपुढें प्रश्नचिन्ह नाहीं येणार. >> भाउ अमका खेळाडू फ्रेट आहे का हा वाद नसून ' ग्रेट खेळाडूंमधे त्यांच्यामधे उजवा कोण आहे?' हा आहे. दडपण नि एकाग्रता ह्या मुद्द्यांबद्दल अनुमोदन. क्वांटीफायेबल असलेल्या गोष्टींचीच तुलना करणे शक्य आहे हे जरी खरे असले तरी दडपण नि एकाग्रता अगदीच क्वांटीफायेबल नसतात असे नाही. NFL असे बरेच weighted and difference इंडेक्स वापरले जातात ज्यायोगे वरकरणी क्वांटीफायेबल नसलेले घटक पण तुलनेसाठी वापरता येतील. ( त्या योगे सचिन विरुद्ध लारा मधे दडपण हा भाग घेऊन अशी तुलना करायची एक इच्छाआहे , कधी जमते का बघूया. भास्कराचार्याने मनावर घेतले तर होउअही शकेल अशी तुलना. )
उदाहरणार्थ हा लेख बघाच ज्यात आसिफच्या बॉलिंग ची quality बघितली गेली आहे :
http://www.espncricinfo.com/ci/content/story/1032865.html

शेवटी, 'ग्रेटनेस' ठरवण्याचे प्रत्येकाचे निकषही किती तरी भिन्न असूं शकतात. >> हे मात्र खरय.

असामीजी, तुम्ही दिलेल्या लिंकवरील लेख मी काळजीपूर्वक वाचला. विश्लेषणासाठी त्यांत वापरलेले निकष अर्थपूर्ण असले तरीही प्रत्यक्ष क्रिकेटशी निगडीत असे अनेक महत्वाचे 'व्हेरिएबल्स' दुर्लक्षित रहातातच .उदा. १] मॅग्राच्या नेमक्या, भेदक गोलंदाजीने हैराण झालेला 'टॉप केटेगरीतला' फलंदाज, इतर कोणत्यातरी दुय्यम गोलंदाजावर धोका पत्करून तुटून पडतो व त्यामुळे बाद होतो; अनेकदां आपण हें पहातो. त्या 'टॉप' फलंदाजाच्या विकेटचं बव्हंशीं श्रेय मॅग्राला असलं तरी वरील विश्लेषणात त्याला कांहीच 'वेटेज' मिळत नाहीं; २] 'टॉप 'फलंदाजाला बाद करायला चांगले गोलंदाज अभ्यासपूर्वक डांवपेंच आंखतात व तसे फलंदाज त्याचा अंदाज घेवून आपला खेळ करतात. हें द्वंद्व खरं तर उच्चतम क्रिकेटचा गाभा आहे. अशाप्रकारे मिळवलेली विकेट याला अनन्यसाधारण महत्व आहे. पण वरील विश्लेषणात त्याला कांहींच 'वेटेज' नाहीं; ३] एखाद्याच्या गोलंदाजीवर सुटलेले झेल, विकेट घेण्यापेक्षां परिस्थितीनुसार फक्त धांवा रोखण्यासाठींच त्याने केलेली अप्रतिम गोलंदाजी, असे अनेक 'व्हेरीएबल्स' वरील विश्लेषणाचे निष्कर्ष 'डिसटॉर्टेड'' ठरवूं शकतात.

"Of course, wickets and bowling averages are the pillars of the bowler career analysis workspace. However, this article conclusively proves that there is life beyond wickets and averages." यावर मला एवढंच म्हणावसं वाटतं कीं - May be. But there is also real cricket beyond all this statistical analysis and the life beyond wickets & averages does not lead us any closer to the real charm& appreciation of that cricket than total number of wickets & bowling averages does !

there is also real cricket beyond all this statistical analysis and the life beyond wickets & averages does not lead us any closer to the real charm& appreciation of that cricket than total number of wickets & bowling averages doe >> Totally agreed भाऊ, फक्त तुम्ही म्हणताय ते प्रकार पण कोणी तरी क्वांटीफायेबल करण्याची पद्द्धत शोधून काढेलच अशा विश्वास आहे. वरचे विश्लेषण सुद्धा काहि वर्षांपूर्वी कुठे कोणी विचाराधीन घेतले होते. भा चॅलेंज घेतोस का ? Happy

<< फक्त तुम्ही म्हणताय ते प्रकार पण कोणी तरी क्वांटीफायेबल करण्याची पद्द्धत शोधून काढेलच अशा विश्वास आहे. >> असामीजी, पण एवढा अट्टाहास करण्यापेक्षां मस्तपैकीं प्रत्यक्ष क्रिकेटची मजाच चाखावी, त्यातलं टेन्शन, आनंद, बारकावे, कलात्मकता, स्पर्धेची ईर्षा इ.इ. अनुभवावं , हा आहे माझ्या मनाचा कल ! Wink

Pages