घेतला असतास थोडा श्वास जाताना

Submitted by जयदीप. on 10 December, 2014 - 03:07

घेतला असतास थोडा श्वास जाताना
तू कुठेही थांबला नसतास जाताना

फक्त थोडा हासला असतास जाताना
बदलला असतास तू इतिहास जाताना

सांग तो नक्की कशाने शून्य झालेला
ठेवला होतास जो विश्वास जाताना

आजही रस्ता घराचा साक्ष देतो की..
केवढा झाला तुलाही त्रास जाताना

उत्तरे नव्हती तुला कळणार प्रश्नांची
घोकला होतास तू अभ्यास जाताना!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त थोडा हासला असतास जाताना
बदलला असतास तू इतिहास जाताना<<< व्वा व्वा

आजही रस्ता घराचा साक्ष देतो की..
केवढा झाला तुलाही त्रास जाताना<<< खूप छान

(तुमची शायरीसुद्धा उर्दूची आठवण करून देते)

एक मोह झाला म्हणून केवळः

तुमचा मतला:

>>>घेतला असतास थोडा श्वास जाताना
तू कुठेही थांबला नसतास जाताना<<<

मला सुचलेला मतला:

सोडला नसतास तू नि:श्वास जाताना
तर कुठेही थांबला नसतास जाताना

क्षमस्व, मोह झाला म्हणून सुचले ते लिहिले. Happy

आजही रस्ता घराचा साक्ष देतो की..
केवढा झाला तुलाही त्रास जाताना...वा व्वा !

इतिहास, अभ्यासही मस्त. Happy

छान