अजून आस एक आहे

Submitted by सुमुक्ता on 9 December, 2014 - 06:42

अजून आस एक आहे
बासरी तुझ्या अधरांवर व्हावे
ओठांवर तुझ्या बरसात राहावे
स्वरमय सतत तुला पाहावे

अजून आस एक आहे
नयनात तुझ्या अश्रु व्हावे
कधी न गालांवर ओघळावे
डोळ्यात तुझ्या सतत राहावे

अजून आस एक आहे
हास्य तुझ्या चेहेऱ्यावर व्हावे
कधी न स्वत:ला ढळू द्यावे
हसताना सतत तुला पाहावे

अजून आस एक आहे
पाउलवाट तुझ्या पायांची व्हावे
स्पर्श तुझ्या पावलांचा
असाच कायम झेलत राहावे

अजून आस एक आहे
शब्द तुज्या मुखात व्हावे
क्षणोक्षणी तू बोलशील जेव्हा
अधर तुझे स्पर्शात राहावे

अजून आस एक आहे
झुळूक वाऱ्याची मी व्हावे
स्पर्शून जावे सर्वांग तुझे
अन रंगांत तुझ्या रंगून जावे

अजून आस एक आहे
तू न मी वेगळे नसावे
सामावून जावे एकमेकात आपण
मी तुझ्यातच सदा एकरूप राहावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users